agricultural news in marathi Value added products of ginger | Agrowon

आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती

चंद्रकला सोनवणे
शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021

आले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून ओळखली जाते. आल्यामध्ये अनेक औषधी तत्व असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संक्रमणापासून बचावासाठी आले रस आणि आलेयुक्त चहा फायदेशीर ठरतो. आले सुकवून त्याचा सुंठ म्हणून वापर केला जातो.
 

आले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून ओळखली जाते. आल्यामध्ये अनेक औषधी तत्व असल्यामुळे आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याचा वापर होतो. थंडीच्या दिवसांत होणाऱ्या संक्रमणापासून बचावासाठी आले रस आणि आलेयुक्त चहा फायदेशीर ठरतो. आले सुकवून त्याचा सुंठ म्हणून वापर केला जातो.

औषधी गुणधर्म

  • मळमळ, उलटीच्या त्रासावर गुणकारी मानले जाते.
  • भूक लागत नसेल तर आल्याचे नियमित सेवन करावे त्याने पोट साफ होते व भूकही लागते- पचनासंबंधी पोटातील समस्या दूर करते.
  • पावसाळ्याच्या दिवसांत आले रसाचे नियमित सेवन केल्यास, कफ, सर्दी-खोकल्यापासून बचाव होतो.
  • थंडीच्या दिवसांत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी मदत करते. सांधेदुखीवर आले गुणकारी मानले जाते.

प्रक्रियायुक्त पदार्थ 
सरबत व स्क्वॅश

प्रथम आले स्वच्छ धुऊन त्यावरील साल काढून टाकावी. त्याचे लहान तुकडे करावेत. आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्‍सरच्या साह्याने ज्यूस तयार करून घ्यावा. ज्यूस गाळून घ्यावा. तयार रसाचा वापर सरबत किंवा अन्य मिक्स पेय तयार करण्यासाठी होतो. आल्याच्या रसात ४० ते ४५ टक्के साखर टाकावी. सरबत करायचे असेल तर त्यामध्ये २५० मिलि रसात १.३० ग्रॅम साखर ३० ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ८ लिटर पाणी टाकावे. अशा प्रकारे तयार झालेला स्क्वॅश आणि सरबत निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या जागी साठवावे.

पेस्ट 
घरगुती पदार्थ बनविण्यासाठी आले पेस्ट मोठ्या प्रमाणात वापरली जाते. यासाठी प्रथम आल्याचे बारीक तुकडे करून कुकरमध्ये १०-१५ मिनिटे शिजवून घ्यावे. तुकडे थंड करून त्यात पाणी टाकून पेस्ट तयार करावी. आम्लता नियंत्रित करण्यासाठी सायट्रिक आम्लाचा वापर करावा. तयार केलेली पेस्ट ८० अंश सेल्सिअस तापमानास गरम करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावे. पेस्टची गुणवत्ता आणि साठवणक्षमता वाढवण्यासाठी सोडिअम बेंजोएट या संरक्षण रसायनाचा वापर करावा.

लोणचे 
फायदे 

१) हे लोणचे नियमित खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
२) रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
३) सांधेदुखी आणि सर्दी-खोकला यासारख्या आजारांपासून बचाव होतो.
४) मधुमेहींसाठी आले आणि लसणाचे लोणचे अत्यंत फायदेशीर ठरते.
५) थंडीच्या दिवसांत रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.

साहित्य 
अर्धा किलो आले, लसूण १५० ग्रॅम, हळद १० ग्रॅम, लाल तिखट १० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम, मीठ ७० ग्रॅम, गरजेनुसार तेल.
कृती 
प्रथम आले स्वच्छ धुऊन कोरडे करून घ्यावे. सोललेल्या लसणाची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. बेडगी मिरची आणि वरील सर्व सामग्री एकत्रित करून कढईमध्ये तेलात शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर तयार लोणचे निर्जंतुक बाटलीमध्ये भरावे.

सुंठनिर्मिती 
आल्यापासून सुंठ तयार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सुंठ निर्मितीसाठी उत्तम प्रतीचे आले निवडावे. आले स्वच्छ करून ८-१० तास पाण्यात भिजत ठेवावे. भिजलेल्या आल्याची साल काढून २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवावे. नंतर एका छोट्या बंद खोलीत आले कंद पसरून १२ तास गंधकाची (प्रमाणः १० ग्रॅम) धुरी द्यावी. कंद बाहेर काढून पुन्हा २ टक्के चुन्याच्या द्रावणात ६-७ तास भिजत ठेवून १२ तास गंधकाची धुरी द्यावी. अशाप्रकारे ही प्रक्रिया तीन वेळा करावी. त्यामुळे आल्याच्या कंदास पांढरा शुभ्र रंग येतो. प्रक्रिया केलेले आले सूर्यप्रकाशात १० टक्के पाण्याचा अंश राहीपर्यंत वाळवावे. तयार सुंठ स्वच्छ करून विक्री करावी.

आल्याचा मुरंबा
पूर्व प्रक्रिया केलेले आल्याचे तुकडे कुकरमध्ये १० ते १५ मिनिटे शिजवून घ्यावेत. समप्रमाणात साखर आणि पाणी घेऊन पाक (७० अंश ब्रिक्स) करावा. एक किलो आल्यासाठी दीड किलो साखर वापरावी. शिजवलेले आले पाकामध्ये २ तास ठेवावे. थंड झाल्यावर निर्जंतुक बाटलीमध्ये मुरंबा भरून कोरड्या जागी साठवून ठेवावे.

- चंद्रकला सोनवणे, ७९७२९९९४६४
(के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)


इतर कृषी प्रक्रिया
दर्जेदार पनीरनिर्मितीचे तंत्रउत्तम दर्जाचे पनीर बनविण्याकरिता म्हशीचे दूध...
पास्ता, शेवया, कुरडयासाठी गव्हाचे नवे...नाशिक : राज्यात रब्बी हंगामात गहू हे प्रमुख पीक...
आलेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मितीआले ही कंदवर्गीय वनस्पती असून बहुऔषधी म्हणून...
पौष्टिक आहारासाठी क्विनोआक्विनोआ हा धान्याचा एक प्रकार असून एखाद्या...
जाणून घ्या अंडी खाण्याचे फायदेशरीराला अत्यंत आवश्यक असणारी आणि आपले शरीर स्वतः...
अ‍ॅक्रिलामाइड कमी करण्यासाठी...विशिष्ट प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
लिंबापासून प्रक्रियायुक्त पदार्थलिंबाच्या सालीमध्ये सर्व प्रकारचे जीवनसत्त्वे,...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटसद्यःस्थितीत भारतामध्ये ड्रॅगन फ्रूटचे उपलब्ध...
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...