पेरूपासून बनवा लोणचे, चीज, जेली

पेरूमधीलजीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि अ जीवनसत्त्व त्वचा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. पेरू रसामध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्त्व क असते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करते.
value added products of guava
value added products of guava

पेरूमधील जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि अ जीवनसत्त्व त्वचा, डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. पेरू रसामध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्त्व क असते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करते. पेरूमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्त्व क आणि अ असते. जीवनसत्त्व क रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास आणि अ जीवनसत्त्व त्वचा तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. तसेच पेरूमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या पोटॅशिअम मुळे सोडिअमची पातळी योग्य स्तरावर राखली जाते. पेरूमधील कॉपर, मॅग्नेशिअम रक्तनिर्मितीसाठी फायदेशीर ठरते. पेरू रसामध्ये संत्र्यापेक्षा चारपट जास्त प्रमाणात जीवनसत्त्व क असते. पेरू पाचक आणि नैसर्गिक रेचक म्हणून उत्तम कार्य करते. आरोग्यदायी गुणधर्म

  • पेरूमधील लाइकोपीन, क्वेरेसेटिन, जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरात कर्करोगास कारणीभूत पेशींना प्रतिबंधित करतात. लाइकोपीन स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करते.
  • पेरूमध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असून ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. पेरू खाण्यामुळे डोळ्याचे स्नायू मजबूत राहून त्यांची चमक वाढते.
  • गर्भवती महिलांसाठी पेरू खाणे चांगले असते. त्यामध्ये असलेले फॉलिक आम्ल किंवा जीवनसत्त्व ब-९ मुलांची मज्जासंस्था विकसित करण्यास मदत करते. पेरू लहान मुलांना मज्जासंस्थेच्या विकारापासून वाचवते.
  • दररोज एक पेरू खाल्याने चयापचय क्रिया नियंत्रित राहते.
  • विविध प्रक्रियायुक्त पदार्थ रस साहित्य ताजा सोलून चिरलेला पेरू १, साखर १ कप, थंड पाणी १ चमचा, अर्धा कप बर्फाचे तुकडे, पुदीना पाने. कृती ः प्रथम ताजे पेरू सोलून त्याचे लहान तुकडे करा. त्यात साखर व पुदिना घाला. त्यामध्ये बर्फाचे तुकडे घालून मिक्सर मधून बारीक करावे. लोणचे साहित्य  कच्चा पेरू, मोहरीचे तेल, बडीशेप, मेथी बियाणे, मोहरी, हिंग, लाल तिखट, मीठ. कृती  पेरू चांगले धुऊन कोरडे करावेत. सुरीच्या साह्याने मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. कापलेल्या फोडी पुन्हा कोरड्या करून घ्याव्या (कोरड्या न केल्यास लोणच्यास पाणी सुटते). सर्व पावडर मसाले एकत्र करून फोडीवर टाकावेत. अखंड मसाले चांगल्या गरम तेलात करपू न देता तळून घ्यावे. शेवटी तळलेले मिश्रण पेरूच्या फोडीवर टाकावे. तयार लोणचे थंड झाल्यावर निर्जंतुक डब्यात भरून कोरड्या जागी ठेवावे. चीज साहित्य  पिकलेले पेरू ३ (उकडून घेतलेले), साखर १ कप, तूप ३ ते ४ चमचे, सजावटीसाठी पिस्ता, काजू, बदाम, मनुके. कृती  उकडलेले पेरू मिक्सरमधून पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यावी. तयार पेस्ट चाळणीने चाळून घ्यावी. एका पातेल्यात तयार पेस्ट आणि तूप टाकून मंद आचेवर शिजवायला ठेवावे. मिश्रण थोडे गरम झाल्यावर त्यात साखर घालून चांगले ढवळत राहा. मिश्रण घट्ट झाले की, त्यात थोडे तूप टाकावे. गॅस बंद करून घट्ट झालेले गरम मिश्रण पसरट भांड्यामध्ये काढून घ्यावे. तयार चीज भांड्यामध्ये व्यवस्थित पसरून त्याचे हवे त्या आकाराचे तुकडे करावेत. जेली  साहित्य पेरू अर्क १ किलो, साखर ७५० ग्रॅम, सायट्रिक आम्ल ३ ग्रॅम. कृती पूर्ण परिपक्व झालेले पेरू स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावेत. नंतर त्याचे लहान तुकडे करून घ्यावेत. फळाच्या दीडपट पाणी घेऊन फोडी मंद आचेवर २० ते ३० मिनिटे शिजवण्यास ठेवावे. एक किलोच्या फोडी अर्कासाठी ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. शिजलेला अर्क मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. त्यामध्ये साखर मिसळून मंद आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवावे. आवश्‍यकतेनुसार त्यामध्ये रंग टाकून निर्जंतुक बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवावे. नेक्टर साहित्य पेरू रस १ लिटर, साखर ६०० ग्रॅम, सायट्रिक आम्ल १३ ग्रॅम, पाणी ३ लिटर. कृती  प्रथम पेरू रस गाळून घ्यावा. स्टीलच्या भांड्यात पेरू रसामध्ये साखर, सायट्रिक आम्ल घालून मंद आचेवर ठेवावे. मिश्रण विरघळेपर्यंत चांगले ढवळत राहावे. तयार मिश्रण निर्जंतुक केलेले झाकण लावून हवाबंद करावे. संपर्क- पल्लवी कांबळे, ८३२९३७५३९० (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com