agricultural news in marathi value added products of guava | Agrowon

पेरूपासून जेली, जॅम, सरबत

व्ही. आर., चव्हाण, डॉ. काळे आर. व्ही.
शुक्रवार, 16 जुलै 2021

पेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून त्याची विक्री करणे गरजेचे असते. जास्त परिपक्व झालेली फळे जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी पेरू फळाचे मूल्यवर्धन करून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करणे फायद्याचे ठरते.

पेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून त्याची विक्री करणे गरजेचे असते. जास्त परिपक्व झालेली फळे जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यासाठी पेरू फळाचे मूल्यवर्धन करून विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करणे फायद्याचे ठरते.

पेरूपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारात चांगली मागणी आहे. पेरूपासून जेली, पोळी, जॅम, सरबत आणि टॉफीसारखे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.

जेली 
जेली तयार करण्यासाठी पूर्ण वाढ झालेले कच्चे पेरू घ्यावेत. प्रथम पेरू थंड पाण्याने स्वच्छ धुऊन त्याच्या लहान आकाराच्या फोडी करून घ्याव्यात. स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यामध्ये सर्व फोडी पूर्ण बुडतील एवढे पाणी घ्यावे. त्यामध्ये २ ग्रॅम सायट्रिक आम्ल प्रति किलो पेरू फोडी या प्रमाणात मिसळून फोडी चांगल्या शिजवाव्यात (किमान अर्धा तास). फोडी चांगल्या शिजल्यानंतर त्याचा लगदा करून घ्यावा. लगदा थंड झाल्यानंतर मलमलच्या कापडातून गाळून रस काढून घ्यावा. निवळलेल्या स्वच्छ रसापासून जेली तयार करण्यासाठी रसाची पेक्टीनसाठी तपासणी करून घ्यावी. तयार झालेल्या रसाचे वजन करून घ्यावे. रसामधील पेक्टीनच्या प्रमाणानुसार प्रति किलो रसासाठी एक किलो साखर (जास्त पेक्टीन असेल तर किंवा ३ ते ४ किलो किलो पेक्टीन कमी असेल तर) मिसळून घ्यावी. तयार मिश्रण मंद आचेवर उकळी येईपर्यंत शिजवून घ्यावे. मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झाल्यानंतर जेलीमधील एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण रिफ्रॅक्टोमीटरच्या साह्याने मोजावे. एकूण विद्राव्य घटकांचे प्रमाण ६७ अंश ब्रिक्सपेक्षा जास्त असेल तर जेली तयार झाली असे समजावे. तयार जेली गरम असतानाच निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करून कोरड्या जागी ठेवावी.

पोळी 
आंब्याच्या पोळीप्रमाणेच पेरूच्या गरापासून उत्तम प्रतीची पोळी तयार करता येते. यासाठी पेरूच्या गरामध्ये १ः१ या प्रमाणात साखर टाकून घ्यावी. हे मिश्रण ९० अंश सेल्सिअस तापमानात थोडा वेळ गरम करून घ्यावे. एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये मिश्रण पसरून वाळवून घ्यावे. असे एकावर एक थर देऊन थराची जाडी १.५ सेंमी येईपर्यंत थर द्यावेत. वाळल्यानंतर पोळी कापून कोरड्या जागी साठवून ठेवावी.

जॅम 
पेरू जॅममध्ये पेरूचा गर ४५ टक्के आणि साखर ६८ टक्के असते.
प्रथम एक लिटर पेरू गर गाळून घ्यावा. एका पातेल्यामध्ये गर घेऊन त्यात ७५० ग्रॅम साखर आणि ५-६ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर शिजवून घ्यावे. मिश्रण चांगले विरघळून घट्ट होईपर्यंत चांगले हलवत राहावे. नंतर घट्ट झालेले मिश्रण निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

सरबत 
एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो साखर, १-३ ग्रॅम सायट्रिक आम्ल आणि ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. तयार मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे गरम करून लगेच थंड करून घ्यावे. थंड झालेला सरबत निर्जतुक बाटल्यांमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा.

टॉफी 
साहित्य 

पेरू पल्प १ किलो, साखर ४५० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ८० ग्रॅम, दूध पावडर ६० ग्रॅम, सायट्रिक आम्ल २ ग्रॅम आणि वनस्पती तूप १०० ग्रॅम.

कृती 
प्रथम पिकलेले पेरू फळाचा गर काढून घ्यावा. गर भांड्यामध्ये घेऊन त्यात वनस्पती तूप मिसळून घ्यावे. मंद आचेवर गर चांगला शिजवून आटवावा. वरील साहित्य मिसळून मिश्रण चांगले एकजीव करावे. मंद आचेवर मिश्रण चांगले ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज घालावे. मिश्रणाचा ब्रिक्स ७० ते ७२ अंश दरम्यान आल्यावर गॅस बंद करावा. तयार मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून थंड होण्यास ठेवून द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याचे काप करावेत. तयार टॉफी बटरपेपरमध्ये पॅक करावी.

- चव्हाण व्ही. आर. ९५१८३४७३०४
डॉ. काळे आर. व्ही., ९४०३२६१४५०
(एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, जि. औरंगाबाद)


इतर कृषी प्रक्रिया
आवळ्यापासून लोणचे, सुपारी, मुरंबाआवळ्यापासून तयार केलेल्या मूल्यवर्धित पदार्थांना...
कोकोओपासून प्रक्रियायुक्त पदार्थकोकोओचे अनेक प्रकार असून, प्रत्येक प्रकारातील...
पेरूपासून जेली, जॅम, सरबतपेरू हे नाशवंत फळ असल्यामुळे योग्यवेळी काढणी करून...
आरोग्यवर्धक योगर्टयोगर्ट हे कॅल्शिअम, रायबोफ्लेविन, फॉस्फरस, झिंक,...
पेरूचे आरोग्यदायी गुणधर्मपेरू हे नाशवंत फळ असून ते जास्त काळ टिकत नाही....
आहारात असावेत ग्लुटेन मुक्त पदार्थग्लुटेन हा गहू, राई आणि बार्ली यांसारख्या ठरावीक...
तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थतुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो....
आहारात असावेत मोड आलेली कडधान्येप्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि कर्बोदके यांचा एक...
अन्न प्रक्रियेसाठी कंपित विद्युत...पारंपरिक अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये...
आहारामध्ये असावा तंतुमय पदार्थांचा...बदलती जीवनशैली आणि नेहमी जंक फूड खाण्यामुळे...
ऊसरसापासून इम्युनिटी शॉट, गन्ना पन्नामाहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या...
केळीपासून व्हिनेगार, टॉफी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...
जीवनसत्त्वयुक्त शेवगाशेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे आहेत....
आहारात समाविष्ट करा पौष्टिक पदार्थरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक...
ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधीशरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
प्रक्रियेद्वारे आल्याचे मूल्यवर्धनआले हे महत्त्वाच्या मसाला पिकांपैकी एक आहे....
टोमॅटोपासून केचअप, सूप, प्यूरीटोमॅटो अत्यंत नाशवंत फळभाजी असून काढणीनंतर लगेच...
आरोग्यदायी व्हर्जीन कोकोनट ऑइलव्हर्जीन कोकोनट ऑइल तेल उत्कृष्ट पौष्टिक पदार्थ...
अंड्यापासून जॅम, पनीर निर्मितीसर्वांत स्वस्त, उत्तम पोषणतत्त्वे असणारा पदार्थ...
बहुगुणी राळाराळा साधारणपणे हलक्या पिवळसर रंगाचे आणि मोहरीच्या...