तुतीपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

तुती फळांचा पांढरा, काळा आणि लाल रंग असतो. फळांना गोडी किंवा आंबट-गोड चव आहे. तुती फळापासून विविध खाद्यपदार्थ तयार करतात.
value added products of mulberry
value added products of mulberry

तुती फळांचा  पांढरा, काळा आणि लाल रंग असतो. फळांना गोडी किंवा आंबट-गोड चव आहे. तुती फळापासून विविध खाद्यपदार्थ तयार करतात.  तुती (मलबेरी) हे आंबट गोड चव असणारे पोषक फळ आहे. तुतीमध्ये ‘क’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व, बीटा केरोटीन म्हणजेच जीवनसत्त्व ‘अ’ आणि लोह अशी पोषणतत्त्वे आहेत. यातील अँटी ऑक्सिडंट्स हृदयविकार, रक्तातील वाढलेले कोलेस्ट्रेरॉलपासून आपले संरक्षण करतात. तुतीमध्ये डोळ्यांच्या कार्यक्षमतेसाठी उपयुक्त असे ल्युटीन व झियाझानथीन हे घटक आहेत. तुती फळांना पांढरा, काळा आणि लाल रंग असतो. फळांच्या विविधतेनुसार आंबट-गोड चव आणि सुगंध आहे. तुतीच्या ताज्या फळांचे सेवन केले जाते. या फळापासून विविध खाद्यपदार्थ तयार करतात. तुतीची फळे, पाने, साल, बिया आणि मुळे उपयुक्त आहेत. तुतीमधील घटक  प्रथिने ...................................... १.४४ ग्रॅम. संतृप्त चरबी .............................. ०.०२७ ग्रॅम. मोनोअनसॅच्युरेटेड फॅट ................. ०.०४१ ग्रॅम.  कार्बोहायड्रेट ............................... ९.८ ग्रॅम. पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट .................. ०.२०७ ग्रॅम. जीवनसत्त्व क ................................ ८६% कॅल्शिअम .................................... ६१% तंतुमय पदार्थ ................................. ६०% लोह .............................................. ६०% अल्फा कॅरोटीन ................................ ५८% उपयुक्त गुणधर्म

  • तुती रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते, जीवनसत्त्व कमतरता आणि सर्दीपासून संरक्षण करण्यास मदत करते. 
  • हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली आणि रक्त निर्मितीवर तुतीचा सकारात्मक परिणाम होतो. हृदय आणि रक्तवहिन्यासंबंधी आजारांवर प्रतिबंध म्हणून कार्य करते, रक्ताची रचना सुधारते, सूज कमी करते. 
  • कच्ची तुतीची फळे अतिसारावर उपयुक्त आहेत. 
  • मज्जासंस्था आजार, तणाव, नैराश्य आणि निद्रानाशावर उपयुक्त आहे.  
  • तुतीमुळे भूक कमी होण्यास मदत होते. तुती त्वचेची समस्या असलेल्या लोकांसाठी  उपयुक्त आहे.
  • प्रक्रियायुक्त पौष्टिक पदार्थ   रस  

  • रस काढण्यासाठी तुतीचे देठ काढून घ्यावे, कारण देठाची चव तुरट असते.
  •  तुतीमध्ये रसाळ भाग जास्त असतो. यामध्ये बिया नसल्याने आपण मिक्सरमधून रस काढू शकतो. मिक्सरमधून फळांचे पेस्ट सारखे मिश्रण मिळते. ही पेस्ट एका स्वच्छ कापडामध्ये ओतावी आणि ते कापड पिळावे. 
  • कापड पिळल्यानंतर पेस्टमधून रस निघतो. हा रस स्वच्छ स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घ्यावा. पातेले मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवावे. रस ७० ते ८० अंश सेल्सिअस तापमानाला १५ ते २० मिनिटे गरम करावा. रस निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरावा. 
  • सरबत   

  •  तुतीच्या फळांपासून सरबत तयार करण्यासाठी रस काढावा. यासाठी पूर्ण पिकलेली तुतीची फळे निवडून स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुवून घ्यावीत. त्यानंतर एक किलो फळामध्ये १ लिटर पाणी मिसळून त्यांना भेगा पडेपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर हे द्रावण मलमलच्या कापडातून गाळून घ्यावे. मोठ्या प्रमाणावर रस काढण्यासाठी हायड्रोलिक बास्केट प्रेस यंत्राचा वापर करावा. स्वच्छ कापडामधून रस पिळून घ्यावा. हा काढलेला रस विविध पेये तयार करण्यासाठी वापरतात. 
  • एक किलो रस घेऊन त्यामध्ये ४०० ते ५०० ग्रॅम साखर आणि १२०० मिलि पाणी मिसळावे. हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. हा रस मुळातच आंबट असल्याने यात सायट्रिक आम्ल मिसळण्याची गरज भासत नाही. चवीसाठी थोडेसे मीठ व जिऱ्याची पावडर मिसळून चांगले ढवळावे. थंड झाल्यावर याचा आस्वाद घ्यावा.
  • सरबत जास्त काळ साठवून ठेवायचे झाल्यास ७० अंश तापमानास पंधरा-वीस मिनिटे गरम करावे. गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावे. बाटल्या क्रोकीन यंत्राच्या साहाय्याने हवाबंद कराव्यात. हे मिश्रण बाटल्यांमध्ये भरण्यापूर्वी १०० पीपीएम सोडिअम बेन्झॉइट परिरक्षक वापरावे. थंड झाल्यावर लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवाव्यात. 
  • पावडर प्रक्रिया   तुती फळे आणि रसापासून पावडर तयार करता येते. यासाठी तुती फळे स्वच्छ धुवून घ्यावीत. नंतर तुती फळे दोन टक्के मिठाच्या द्रावणात थोडा वेळ ठेवल्यानंतर एका मलमलच्या कापडात घेऊन त्या १०० अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात ३ मिनिटे ठेवावीत. ही तुती फळे कॅबिनेट ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये ३ ते ४ तास सुकवावीत. तुती फळे सुकल्यानंतर ग्राईंडरचा वापर करून त्यांची पावडर करावी. - सुहेल भेंडवडे,   ९८६०७३२८६६ (प्रा.संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर, जि.सातारा)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com