ड्रॅगन फ्रूट प्रक्रियेतील संधी

शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फळ फायदेशीर आहे.यापासून सरबत, जॅम,जेली यांसारखे प्रक्रिया पदार्थ तयार करता येईल असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.
dragon fruit
dragon fruit

शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ड्रॅगन फ्रूट फळ फायदेशीर आहे.यापासून सरबत, जॅम,जेली यांसारखे प्रक्रिया पदार्थ तयार करता येईल असे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. कमी पाण्यात तग धरून उत्पन्न देणारे आकर्षक रंगाचे ड्रॅगन फ्रूट हे मूळचे मेक्सिको आणि अमेरिका देशातील आहे. ड्रॅगन फ्रूटमध्ये प्रथिनांचे चांगले प्रमाण असते. शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठीही मदत होते. ड्रॅगन फ्रूटच्या जातींमध्ये विविधता आढळते. यामध्ये पांढऱ्या रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ, लाल रंगाचे गर असलेले लाल रंगाचे फळ आणि  पांढऱ्या रंगाचे गर असलेले पिवळ्या रंगाचे फळ असे प्रकार दिसतात. आरोग्यदायी फायदे 

  • भरपूर प्रमाणात ‘क’ जीवनसत्वाबरोबर  कॅल्शिअम, पोटॅशिअम, लोह, आणि जीवनसत्त्व-ब तसेच ९० टक्के पाणी असते. अल्प प्रमाणात ‘क’ जीवनसत्त्व असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. 
  • भरपूर प्रमाणात  तंतूमय घटक असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. शरीरात रक्तपुरवठा नीट होऊन सर्व इंद्रिये व्यवस्थित काम करतात. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तातील साखर कमी होते. कोलेस्टेरॉल कमी असल्याने हृदय विकाराचा धोका राहत नाही. यामध्ये बीटा कॅरोटीन असल्याने रक्तदाब, ह्रदय विकारावर मात करता येते.
  • फळामध्ये उपलब्ध असणारे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ वाईट कोलेस्टेरॉलला वाढू देत नाही. यातील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवते आणि ॲनिमिया होऊ देत नाही.
  • फळाचा आहारात समावेश असल्यास संधिवाताच्या वेदना कमी होतात. दात व हाडे मजबूत होतात. फळांचे सेवन केले तर रोगप्रतिकार शक्ती वाढते. 
  • फळांमधील लायकोपेन विकर आणि ‘क’ जीवनसत्त्व असते. फळाच्या  सालीमध्ये पॉलीफेनॉल असते. 
  • चेहऱ्यावरचे फोड, रुक्ष केस, केस गळणे, उन्हाने काळवंडलेली त्वचा उपायांवर हे फळ उपयुक्त आहे. 
  • पदार्थनिर्मिती  जॅम   साहित्य ड्रॅगन फ्रूट पेस्ट, साखर/ गूळ, पेक्टिन, सायट्रिक ॲसिड, पोटॅशिअम मेटाबायसल्फेट   कृती 

  • प्रथम नॉनस्टिक तवा कमी तापमानाला तापत ठेवावा.
  • त्यात ड्रॅगन फ्रूट पेस्ट पसरावी. सतत चमच्याने पेस्ट मिसळावी.
  • पेस्टचा रंग थोडा लालसर झाला, की त्यात साखर मिसळावी. 
  • पेक्टिन, सायट्रिक ॲसिड, पोटॅशिअम मेटाबायसल्फेट मिसळून एकत्रित करावे. साखरेचे प्रमाण ६५ ब्रिक्स येईपर्यंत मंद आचेवर मिसळत रहावे. 
  • मिश्रण स्टरिलाइज्ड काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवावे. 
  • जेली  साहित्य फळाचा गर, साखर, सायट्रिक ॲसिड, पेक्टीन, केएमएस इत्यादी. कृती 

  • गराच्या वजनाएवढे साखर मिसळून त्यात प्रति किलो ५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.
  • मिश्रणाला मंद आचेवर तापवत असताना त्यात चार ग्रॅम पेक्टीन मिसळावे. पेक्टीन हे जेलीला घट्टपणा येण्यासाठी वापरले जाते.
  • मिश्रणाला उष्णता देणे सुरू ठेवावे. मिश्रण तापवत असताना त्यामध्ये दोन ग्रॅम केएमएस मिसळावे. नंतर वारंवार ब्रिक्स तपासून पाहावा.
  • ६७.५ ब्रिक्सचे प्रमाण झाल्यावर जेली तयार झाल्याचे समजून उष्णता देणे बंद करावे.
  • तयार झालेली जेली निर्जंतुक बाटल्यांत भरून त्यात झाकण लावून हवाबंद करावी. बाटल्या थंड व कोरड्या ठिकाणी ठेवाव्यात.
  • सरबत   साहित्य ड्रॅगन फ्रूट, साखर /गूळ, सायट्रिक ॲसिड, पोटॅशिअम मेटाबायसल्फेट   कृती 

  • फळ स्वच्छ धुऊन त्याची साल काढावी. 
  • फळाच्या गरांच्या फोडी करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करावी.
  • १०० मिलिलिटर रसामध्ये साखर/ गूळ, ३:१ प्रमाणात मिसळावे. 
  • थोड्या प्रमाणात सायट्रिक ॲसिड, पोटॅशियम मेटाबायसल्फेट मिसळून रस चांगल्याप्रकारे मिसळावा.
  • तयार झालेले मिश्रण पाश्चराईज करून स्वच्छ बाटलीमध्ये भरून शीत तापमानामध्ये साठवून ठेवावा.
  • - ज्ञानेश्वर शिंदे,  ०७५८८१७९५८० (आचार्य पदवी विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग,सॅम हिगिनबॉटम कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज,उत्तर प्रदेश) -स्नेहल जाधव (आचार्य पदवी विद्यार्थी,अन्न तंत्रज्ञान विभाग, अण्णा विद्यापीठ, चेन्नई, तमिळनाडू)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com