महिला सहकारी संस्थांसाठी विविध योजना

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. याचा शेती, ग्रामविकासाला फायदा होणार आहे.
Employment opportunities for women group from nursery.
Employment opportunities for women group from nursery.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. याचा शेती, ग्रामविकासाला फायदा होणार आहे.  महिला सहकारी संस्थानिर्मिती ग्रामीण भागात महिलांमार्फत विविध व्यवसाय केले जातात. अशा महिलांच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीच्या दृष्टीने महिला सहकारी संस्था निर्मिती, व्यवसायआधारित कौशल्य विकास प्रशिक्षण, व्यवसायाशी निगडित केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना या विषयांवर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत कामकाज करण्यात येत आहे. महिलासाठी बाजाराभिमुख व्यवसायाची निर्मिती होण्यासाठी महिला सहकारी संस्थांची स्थापना करण्याचे नियोजन आहे. स्मार्ट प्रकल्प राज्यात ज्या सामाजिक भांडवल व सुविधा निर्माण होत आहेत. त्याआधारे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतील संधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन शेतीतून अधिकाधिक नफा मिळवून देण्यासाठी नियोजन व संघटित प्रयत्नांची आवश्यकता आहे. सर्वसाधारण महिलांचा कृषी क्षेत्रामध्ये मजूर तसेच तत्सम निम्न स्तरावरील कामामध्ये लक्षणीय सहभाग आहे, परंतु कृषिमूल्य साखळीच्या वरच्या स्तरावर महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढविणे आवश्यक आहे. त्याकरिता राज्यात जागतिक बँक अर्थसाह्याने “मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प” राबविण्यास मान्यता दिली. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ प्रकल्प अंमलबजावणी कक्ष

  • सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून स्मार्ट प्रकल्पांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी कक्षाची निर्मिती करण्यात आली असून, कृषी व्यवसाय विकास आणि बाजारपेठेत प्रवेश आणि जोखीम निवारण्याची व्यवस्था उभी करणे या घटकांतर्गत गोदामांचे नूतनीकरण प्रकल्प या घटकांची अंमलबजावणी करण्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, पुणे नोडल एजन्सी म्हणून कामकाज करणार आहे. 
  •  या प्रकल्पात महिलांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा या उद्देशाने तरतूद करण्यात आली असून, महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत स्थापित महिला बचत गट व त्यांचे फेडरेशन यांना गावामध्येच गोदाम उभारणी करणार आहे. शेतीमालाचे काढणीपश्‍चात होणारे नुकसान टाळून त्यांना धान्य तारण योजनेचा लाभ मिळवून त्यांना महिला शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्याचे नियोजन आहे. यातून कृषिमूल्य साखळीमध्ये महिलांचा सहभाग वाढू शकेल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या माध्यमातून सुमारे २०० गोदामांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त महिलांचा सहभाग असणाऱ्या व महिलाप्रणीत विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे धान्य तारण योजनेच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यात येणार आहे.
  • स्पर्धात्मक कृषिमूल्य साखळीमध्ये महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष धोरण तयार करण्यात आले असून, यामध्ये महिला उत्पादकांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे, स्पर्धात्मक मूल्य साखळीमध्ये सहभागी होण्याच्या अनुषंगाने क्षमता बांधणी करणे, महिलांचा शेतजमिनीमध्ये अधिकार वाढविण्यासाठी पथदर्शी उपक्रम यांसारखे उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
  • कॉपशॉप योजना

  • महामंडळामार्फत मार्केटिंग करण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी विक्री व्यवस्थापन करण्याच्या उद्देशाने राज्यात विविध सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गट, महिला सहकारी संस्था यांच्या माध्यमातून शॉप उभारणी करण्यात येत आहे. यामुळे सहकारी संस्थांनी उत्पादित केलेली उत्पादने स्थानिक पातळीवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.
  • सदयस्थितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राज्यात विविध गृहनिर्माण / सोसायटींच्या माध्यमातून १० शॉप उभारण्यात आले आहेत. सदर शॉपच्या माध्यमातून शेतकरी समुहाद्वारे (सहकारी संस्था/ शेतकरी उत्पादक कंपनी/ बचत गट) उत्पादित कृषी मालाच्या विक्रीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यामध्ये याची व्याप्ती वाढविण्याचा महामंडळाचा मानस आहे.
  • महिला कौशल्य विकास प्रशिक्षण  महाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी उत्पादक कंपनी /महिला बचत गट यांचे सभासदांसाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारित सशुल्क स्वरूपात निवासी / ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. प्रमुख उद्देश

  • महिला शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन व उत्पन्नाचे स्रोत वाढवणे.
  •  ग्रामीण भागात महिलांकरिता उद्यमशीलता व कौशल्य विकासाच्या संधी निर्माण करणे.
  • महिला सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, बचत गट यांचे आर्थिक बळकटीकरण व रोजगारनिर्मिती करणे.
  • सहकारी प्रक्रिया उद्योगांना कर्ज व गुंतवणुकीच्या स्वरूपात वित्त पुरवठ्याबाबत मार्गदर्शन करणे, कृषी मालाची निर्यात वृद्धी करण्याबाबत मार्गदर्शन करणे. 
  • महाराष्ट्र सहकार विकास महामंडळामार्फत महिलांकरिता कृषी, सहकार, प्रक्रिया, सेंद्रिय शेती, शेतकरी उत्पादक कंपनी, पशुसंवर्धन, कृषी विपणन, घरगुती सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
  • - प्रशांत चासकर,  ९९७०३६४१३० (कृषी व्यवसाय पणन व्यवस्थापक, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com