agricultural news in marathi, vegetable crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon

फळवर्गीय भाजीपाला सल्ला
डॉ. एम. एन. भालेकर, सी. बी. बाचकर, एस. ए. पवार
शनिवार, 7 एप्रिल 2018

मिरची
रोगनियंत्रण :
चुरडा- मुरडा नियंत्रण
रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी या किडींमार्फत होतो. त्यासाठी पिकात पांढऱ्या माशीसाठी पिवळे व फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे एकरी १२ या प्रमाणात वापरावेत.
फुलकिडे, मावा नियंत्रण :
फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी
फिप्रोनील (५ ई.सी.) १.५ मि.लि.
वेळ : प्रादुर्भाव दिसताक्षणी फवारणी आवश्‍यक
कोळी नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी  
फेनपायरॉक्झिमेट  (५ ई.सी.) १ मि.लि. किंवा

मिरची
रोगनियंत्रण :
चुरडा- मुरडा नियंत्रण
रोगाचा प्रसार फुलकिडे, पांढरी माशी या किडींमार्फत होतो. त्यासाठी पिकात पांढऱ्या माशीसाठी पिवळे व फुलकिड्यांसाठी निळे चिकट सापळे एकरी १२ या प्रमाणात वापरावेत.
फुलकिडे, मावा नियंत्रण :
फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी
फिप्रोनील (५ ई.सी.) १.५ मि.लि.
वेळ : प्रादुर्भाव दिसताक्षणी फवारणी आवश्‍यक
कोळी नियंत्रण : फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी  
फेनपायरॉक्झिमेट  (५ ई.सी.) १ मि.लि. किंवा
फेनाक्झाक्विन (१० ई.सी.) २ मि.लि.
पानांवरील ठिपके :  
सरकोस्पोरा :
रोगकारक बुरशी : सरकोस्पोरा
लक्षणे : पानांवर गोलाकार, लहान डाग दिसून येतात. पाने पिवळी पडून गळतात. फळांवर पांढरे चट्टे पडतात.
अल्टरनेरिया :   
रोगकारक बुरशी :अल्टरनेरिया सोलॅनी
लक्षणे : बुरशीमुळे तपकिरी रंगाचे आकारहीन डाग पानांवर दिसतात. डागांमध्ये एकात एक गोलाकार अशी वलये असतात. लहान डाग एकमेकांत मिसळून मोठे चट्टे होतात. पाने करपतात अाणि पानगळ होते.
नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा
कॉपरऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम
वेळ : प्रादुर्भाव दिसताच त्वरित

टोमॅटो :
रोगनियंत्रण :
फळसड  :
फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा
मेटॅलॅक्झिल अधिक मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) २.५ ग्रॅम
पर्णगुच्छ व जी.एन.बी.व्ही.
प्रसार : पर्णगुच्छ हा रोग पांढरी माशीमार्फत आणि टॉस्पोव्हायरस हा फुलकिड्यांमार्फत होतो.
पांढरी माशी, फुलकिडे, मावा नियंत्रण
फवारणी प्रतिलिटर पाणी
इमिडाक्लोप्रिड ०.५ मि.लि. किंवा
फिप्रोनील १.५ मि.लि.
लवकर येणारा करपा
प्रादुर्भावाचे ठिकाण : पानांवर किंवा फळांवर
नियंत्रण :
झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त पाने, फळे गोळा करून व्यवस्थित जाळून नष्ट करावीत. ती बांधावर किंवा टोमॅटो प्लॉटशेजारी  टाकू नयेत.
फवारणी प्रतिलिटर पाणी
मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा
कार्बेन्डाझिम १ ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्झिक्लोराईड २.५ ग्रॅम
सूचना : रोगाची लक्षणे दिसताच गरजेनुसार १०-१५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
टीप : फवारणी नॅपसॅक पंपाने करावी.

संपर्क : डाॅ. एम. एन. भालेकर, ०२४२६- २४३३४२
(अखिल भारतीय समन्वयित संशाेधन प्रकल्प, भाजीपाला पिके, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

 

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...