agricultural news in marathi, vegetable plantation in kharip season, Agrowon, Maharashtra | Agrowon

खरीप हंगामातील भाजीपाला लागवड

डॉ. मधुकर भालेकर, कीर्ती भांगरे, ध­नश्री पाटील
बुधवार, 30 मे 2018

आपल्या देशात भाजीपाल्यासाठी योग्य हवामा­न, जमिनीची विविधता, भरपूर सूर्यप्रकाश, पाणी व इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन वर्षभर घेता येते. अल्पभूधारक शेतकरी अल्प भांडवलामध्ये कमी अवधीत अधिक उत्पादन यातून मिळवू शकतात.

सर्वसाधारणपणे अनियमित पाऊसमान असल्याने उपलब्ध पाणीसाठा कमी होत आहे. त्याचप्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक संरक्षणासाठीच्या खर्चात वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये खरीप हंगामातील पोषक वातावरणामध्ये भाजीपाल्यांचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरू शकते.

आपल्या देशात भाजीपाल्यासाठी योग्य हवामा­न, जमिनीची विविधता, भरपूर सूर्यप्रकाश, पाणी व इतर सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन वर्षभर घेता येते. अल्पभूधारक शेतकरी अल्प भांडवलामध्ये कमी अवधीत अधिक उत्पादन यातून मिळवू शकतात.

सर्वसाधारणपणे अनियमित पाऊसमान असल्याने उपलब्ध पाणीसाठा कमी होत आहे. त्याचप्रमाणात कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक संरक्षणासाठीच्या खर्चात वाढ होत आहे. अशा स्थितीमध्ये खरीप हंगामातील पोषक वातावरणामध्ये भाजीपाल्यांचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरू शकते.

जमीन व हवामा­न :
प्रत्येक भाजीपाला पिकास विशिष्ट जमि­नीची आणि हवामा­नाची आवश्यकता असली तरी सर्वसाधारणपणे पाण्याचा चांगला ­निचरा होणारी, मध्यम प्रतीची, गाळाची किंवा पोयट्याची जमीन निवडावी. जमि­नीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. अशा जमिनीमध्ये पिकांची वाढ चांगली होते. त्यांना सर्व अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. तसेच पाऊसमा­न, उष्णता, प्रकाशमा­न आणि आर्द्रता हे हवामा­नातील प्रमुख घटक पिकांच्या वाढीवर परिणाम करत असतात.

जाती :
भाजीपाल्याच्या सुधारित किंवा संकरित जातींचा वापर करावा. सुधारित जाती या अधिक उत्पाद­नाबरोबरच लवकर पक्वता येणाऱ्या असतात. काही जाती रोग व किडीस प्रतिकारक असतात. तसेच काही जातींमध्ये विविध गुणवत्ता असते. त्याचा व बाजारातील मागणीचा योग्य विचार करून शुद्ध व जातीवंत बी वापरावे.

लागवडपूर्व काळजी :
बीज प्रक्रिया - भाजीपाला पिके उदा. कारली, दोडका, दुधी भोपळा, भेंडी यांची लागवड बियांपासू­न केली जाते. लागवडपूर्व बियाणास थायरम किंवा कॅप्ट­न किंवा कार्बेन्डाझिम ३ ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणात प्रक्रिया करावी.
मिरची, वांगी यांची रोपे चार ते सहा आठवड्यात तर टोमॅटो रोपे ती­न ते चार आठवड्यात लागवडीसाठी तयार होतात. परंतु कांदा पिकाची रोपे लागवडीसाठी योग्य होण्यास सहा ते आठ आठवडे कालावधी लागतो.
रोपांवर प्रक्रिया - टोमॅटो, मिरची, वांगी, कांदा यांसारख्या पिकांची रोपवाटिकेत तयार केलेली रोपे पुनर्लागवडीपूर्वी किटक­नाशक आणि बुरशी­नाशकाच्या पुढील द्रावणात बुडवू­न लावावीत.
प्रमाण : प्रति १० लिटर पाणी
इमिडाक्लोप्रीड १० मि.लि. + कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा मॅंकोझेब २५ ग्रॅम  
लागवडी­नंतर हलकेसे पाणी द्यावे.

रोपवाटिका व्यवस्थापन
बियांची टोकणी करून : घेवडा, भेंडी, गवार, वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या, शेंगवर्गीय भाज्या इ.
रोपवाटिका करून पुनर्लागवड : टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा इ.
रोपे तयार करण्यासाठी ३ x २ मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. त्यामध्ये ३-४ किलो चांगले कुजलेले शेणखत, १५ः१५ः१५ हे मिश्रखत २०० ग्रॅम व शिफारशीत दाणेदार कीटकनाशक चांगले मिसळू­न घ्यावे. भाजीपाल्याचे बियाणे ३-४ सें.मी. खोलीवर पेरू­न माती­ने झाकावे. त्यानंतर हलके पाणी द्यावे. रोपांची उगवण झाल्यानंतर त्यामधील तण काढून टाकू­न रोपवाटिका स्वच्छ ठेवावी.

खरीप भाजीपाला पिकांची लागवड
 

भाजीपालापिकाचे नाव    बियाणे
किलो/हेक्टर 
   लागवडीचे अंतर    रासायनिक खते किलो/हेक्टर
नत्रः स्फुरदःपालाश  
 पिकाचा कालावधी
(दिवस)  
 
 उत्पादन प्रति/हेक्टर    सुधारित/संकरित जाती
मिरची      १.००   ६०x४५ सें.मी.   १००ः५०ः५०      १८०-२००     वाळलेली १० ते १५ क्विंटल/हेक्टर, हिरवी १५० ते २०० क्विंटल/हेक्टर  पुसा ज्वाला, फुले ज्योती, पंत सी-१, फुले मुक्ता
वांगी         ०.५००   ९०x९०किंवा ९०x७५ सें.मी.  १५०ः७५ः७५   १८०-२००   २५ ते ३० टन/हेक्टर     कृष्णा (संकरित), मांजरी गोटा, फुले हरीत, फुले अर्जुन (संकरित)
टोमॅटो          ०.४००  ९०x३० सें.मी.   साधे वाण २००ः१००ः१०० संकरित वाण ३००ः१५०ः१५०   १५०-१६०       ४० ते ५० टन/हेक्टर फुले राजा (संकरित), फुले केशरी
भेंडी             १२ ते १५   ३०x२० किंवा
३०x१५ सें.मी. 
१००ः५०ः५०   १००-१२५   १२ ते १५ टन/हेक्टर  परभणी क्रांती, अर्का अनामिका, फुले उत्कर्षा, फुले विमुक्ता
गवार         १४ ते २४     ४५x१५ किंवा
३०x१५ सें.मी.  
३५ः६०ः६०   ९०-११०     ५ ते ६ टन/हेक्टर   फुले गवार
घेवडा        ४० ते ४५     ४५x२० सें.मी.   ५०ः११०ः११०   ९०-११०  १ ते १.५ टन/हेक्टर   कंटेडर, पुसा पार्वती, अर्का कोमल, पंत अनुपमा, फुले सुयश
चवळी  १५ ते २०       ६०x३५ सें.मी  २५ः६०ः६०   ९०-१२०   ७५ ते १०० क्विंटल/हेक्टर    पुसा फाल्गुनी, पुसा बरसाती
कांदा  ८ ते १०    १५x१० सें.मी.   १००ः५०ः५०   ९०-१२०     १५ ते २० टन/हेक्टर         फुले समर्थ, बसवंत ७८०, एन-५३, ए.एफ.डी.आर
दुधी भोपळा         २ ते २.५     १.५ x१.० मीटर   १००ः५०ः५०   १८०-२००   ४०-५० टन/हेक्टर   सम्राट, पुसा नवीन
कारली      २ ते २.५     १.५ x१.० मीटर   १००ः५०ः५०   १८०-२००   २०-२५ टन/हेक्टर     फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी, को-लाँग व्हाईट
दोडका        २ ते २.५      १.५ x१.० मीटर   १००ः५०ः५०   १४०-१५०   १५-२० टन/हेक्टर    पुसा नसदार, कोकण हरिता
घोसाळी   २.५ ते ३.५     १.५ x१.० मीटर   १००ः५०ः५०   १४०-१५०     १५-२० टन/हेक्टर     पुसा चिकणी, फुले प्राजक्ता, फुले काेमल
पडवळ   २.५ ते ३.५     ३ x१ मीटर   १००ः५०ः५०   १४०-१६०   १५-२० टन/हेक्टर       कोकण श्वेता, फुले वैभव
काकडी    १ ते १.५     १.५ x०.५० मीटर   १००ः५०ः५०   १००-१२०   १५-२० टन/हेक्टर     पुना खिरा, हिमांगी, फुले शुभांगी
वाल   उंच जातीसाठी २.५ किंवा बुटक्या जातीसाठी ६.० किलो   २x१ मीटर उंच जातीसाठी ६०x३० सें.मी. बुटक्या जातीसाठी   ६०ः६०ः६०     उंच जातीसाठी १८०-२०० बुटक्या जातीसाठी १००-१२०     उंच जाती २० ते २५ टन,
बुटक्या जाती ८ ते १० टन  
    उंच वाढणाऱ्या जाती - फुले गाैरी, फुले अश्र्विनी.
 बुटक्या जाती - कोकण भूषण, फुले सुरुची

संपर्क :  डॉ. मधुकर भालेकर,  ०२४२६-२४३३४२    
(अखिल भारतीय सम­न्वित भाजीपाला संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)


इतर फळभाज्या
भेंडी पिकावरील किडींचे नियंत्रण भेंडी पिकावरील महत्त्वाच्या किडींची ओळख आणि...
खरीप कांद्यावरील रोगांचे नियंत्रण खरीप हंगामात कांदा पिकावर प्रामुख्याने करपा व मर...
वांग्यावरील शेंडा व फळे पोखरणाऱ्या...वांगी पिकामध्ये येणाऱ्या शेंडा व फळे पोखरणारी...
तंत्र शेवगा लागवडीचेमहाराष्ट्रातील सुमारे ८४ टक्के क्षेत्र कोरडवाहू...
कोबीवरील मावा, चौकोनी ठिपक्याचा पतंगाचे...कोबी व फुलकोबी ही थंड हवामानातील पिके असून,...
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
टोमॅटोवरील फळे पोखरणाऱ्या अळीचे...खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात भाजीपाला...
सुधारित तंत्राने करा बटाटा लागवडबटाटा पीक यशस्वी होण्यामध्ये जमिनीच्या...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
भाजीपाला रोपवाटिका तयार करताना...रोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप...
माळरानावर साकारले फायदेशीर शेतीचे स्वप्नमनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल, तर...
कोरडवाहूसाठी शेवगा लागवड फायदेशीरपावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी व कोरडवाहू...
भाजीपाला सल्ला वेलवर्गीय भाजीपाला : काकडी, कारली फळमाशी :...
खरीप हंगामातील भाजीपाला पिकांतील...भाजीपाला पिकांच्या उत्पादनामध्ये तणांमुळे मोठ्या...
मिरची-ऊस-टोमॅटोतून उंचावला आर्थिक आलेखसुमारे १२ वर्षांपासून मिरची पिकात सातत्य,...
खरीप हंगामातील भाजीपाला लागवडआपल्या देशात भाजीपाल्यासाठी योग्य हवामा­न,...
फळवर्गीय भाजीपाला पीक सल्ला सद्यःस्थितीत मिरचीवर चुरडा-मुरडा...
कांदा, लसूण पीक सल्लासद्यस्थितीत कांदा पिकाच्या बीजोत्पादनासाठी...
कांदा पीक सल्लामे महिन्यात खरीप कांदा पिकासाठी रोपवाटिका तयार...