agricultural news in marathi Village development takes place through women empowerment | Agrowon

महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकास

डॉ. राजा दांडेकर 
शुक्रवार, 26 मार्च 2021

सामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी कोकणातील ग्रामीण भागात गेली सुमारे चार दशके लोकसाधनेचे कार्य चालू आहे. सक्षम समाजाच्या उभारणीसाठी मूलभूत घटक असणाऱ्या कुटुंबाला सक्षम करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे सक्षमीकरण हे कुटुंबातील स्त्रीच्या सक्षमीकरणाशिवाय अशक्य आहे. हे ओळखून संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरवले. 

सामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी कोकणातील ग्रामीण भागात गेली सुमारे चार दशके लोकसाधनेचे कार्य चालू आहे. सक्षम समाजाच्या उभारणीसाठी मूलभूत घटक असणाऱ्या कुटुंबाला सक्षम करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे सक्षमीकरण हे कुटुंबातील स्त्रीच्या सक्षमीकरणाशिवाय अशक्य आहे. हे ओळखून संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरवले. संस्थेची शाळा स्थापन झाल्यापासून पहिली चार वर्षे शाळेतील वर्गामध्ये एकही मुलगी नव्हती. आता मात्र विद्यार्थी संख्येच्या निम्म्याहून जास्त मुली आहेत.

सामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी कोकणातील ग्रामीण भागात गेली सुमारे चार दशके लोकसाधनेचे कार्य चालू आहे. सक्षम समाजाच्या उभारणीसाठी मूलभूत घटक असणाऱ्या कुटुंबाला सक्षम करणे गरजेचे आहे. कुटुंबाचे सक्षमीकरण हे कुटुंबातील स्त्रीच्या सक्षमीकरणाशिवाय अशक्य आहे. हे ओळखून संस्थेने महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करायचे ठरवले. संस्थेची शाळा स्थापन झाल्यापासून पहिली चार वर्षे शाळेतील वर्गामध्ये एकही मुलगी नव्हती. आता मात्र विद्यार्थी संख्येच्या निम्म्याहून जास्त मुली आहेत. अर्थात, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लोकांचा विश्‍वास संपादन करून, विविध युक्त्या लढवून कुटुंबातील या शक्ती स्थानांना, स्त्रियांना साद घालण्यात लोकसाधनेला यश मिळत गेले. त्यामुळे मुली शिकून सबला झाल्या, त्यांनी संस्थेलाही बळ दिले. यातील काही ग्रामीण भागातील उदाहरणे आपल्या समोर ठेवत आहे. 

कुंदा बैकर 
आई, वडिलांना जड झालेल्या कुंदा बैकर या अपंग मुलीला घेऊन तिच्यासाठी संस्थेने सावित्री कन्या छात्रालय सुरू केले. पुढे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने शिवण कला आणि फॅशन डिझायनिंग डिप्लोमा पूर्ण केला. परिसरातील इतर स्त्रियांनाही त्या प्रशिक्षणाचा लाभ मिळण्याकरिता तिने संस्थेकडे आग्रह धरला आणि त्यातून सुरू झाला “निर्मिती शिवणकला वर्ग”. या वर्गाची पूर्ण जबाबदारी घेऊन १५० पेक्षा जास्त मुलींना तिने शिवणकलेचे शिक्षण दिले. शरीराने अपंग असली, तरी कुंदा स्वतःच्या पायांवर उभी राहिली. ज्या एका मुलीला घेऊन सावित्री कन्या छात्रालय सुरू झाले, पुढे दहा वर्षे त्याची अधीक्षिका म्हणून कुंदाने जबाबदारी सांभाळली. आता लीलावती इन्फोसिस फाउंडेशनच्या मदतीने १०० मुलींचे वसतिगृह सुरू आहे. कुंदाचा अपंग मुलाबरोबरच विवाह होऊन त्यांना दोन मुली आहेत. या अपंग कुटुंबाने पोल्ट्री, काजू फॅक्टरी, शेळीपालन असे उद्योगही सुरू केले. शरीर अपंग असले तरी सक्षमीकरणाने त्यांची मने पंगू राहिली नाहीत.

संजना मोहिते 
इंग्रजी भाषेच्या भीतीपोटी शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या या मुलीने पुढे इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली. आता मुंबईत इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी इंग्रजी आणि ग्रामरचे विशेष कोचिंग क्लासेस ती घेते.

कुंदा येसवारे  
संस्थेच्या शाळेत पाऊल टाकणारी कुंदा येसवारे पहिली विद्यार्थिनी. चुणचुणीत आणि धीट व्यक्तिमत्त्वाच्या कुंदाकडून सावित्रीबाई फुले यांच्यावर लिहिलेल्या एकपात्री प्रयोगाची तयारी करून घेण्यात आली. पुढे समाजात प्रयोग करता करता कुंदाने सावित्रीबाईंचे पूर्ण रूप साकारले. मुलींच्या शिक्षणाचा प्रसार करण्यास संस्थेला महत्त्वाचे योगदान दिले.

शेती, पूरक उद्योगाला चालना 
लोकसाधनेने भात उत्पादन वाढीसाठी महिलांसाठी भात लागवडीची सुधारित पद्धतीची प्रात्यक्षिके घेतली. गावागावांत तंत्रज्ञानाचा प्रसार केला. संस्थेने कुटुंबासाठी उपयुक्त अशी पाच झाडे निवडून २२ खेड्यांतील प्रत्येक कुटुंबास दान केली. नारळ, लिंबू, केळी, गवती चहा, कोरफड यांची वनौषधी वाटिका सांडपाण्यावर तयार केली. यामुळे शेतीबरोबरच वनौषधींची औषधी व आर्थिक उपयुक्तता अधोरेखित झाली. संस्थेने महिलांसाठी फार्म मॅनेजमेंट, अन्न प्रक्रिया प्रशिक्षण, बचत गट इत्यादी प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले. संस्थेने परिसरातील खेड्यातील स्त्रियांकरिता एक दिवसापासून एक वर्षापर्यंतच्या कालावधीचे विविध व्यवसाय प्रशिक्षण चालविले. यामुळे स्त्रियांना शेती आणि अन्य उद्योग व्यवसायासाठी प्रशिक्षण आणि दिशादर्शन मिळून आर्थिक सबलीकरणाची बीजे रोवली गेली.

आरोग्यविषयक उपक्रम 
संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये आरोग्य सेवेतून स्त्री सक्षमीकरण करण्यासाठी काही विशेष उपक्रम आम्ही हाती घेतले. त्यासाठी ३२ खेड्यांमधील प्रत्येकी दोन महिलांना ग्रामआरोग्य सेविका म्हणून प्रशिक्षित केले. कुटुंबातील स्वतःचे अस्तित्व विसरलेल्या या महिलांना यामुळे एक वेगळी ओळख मिळाली. या ३२ गावांतून या महिलांनी “गावचा दवाखाना” सुरू केला. एवढेच नव्हे तर त्यांच्या मधला आत्मविश्‍वास जागा झाला. या आरोग्य सेविकांपैकी सौ. राजश्री मोहिते, सौ. शीतल दवंडे, सौ. माधुरी गमरे या स्वबळावर निवडणूक लढवून ग्रामपंचायत सरपंच झाल्या. पुढे काही अंगणवाडी सेविका झाल्या. काही आशा दीदी झाल्या. या आरोग्य सेविका संबंधित गावातील महिलांच्या विश्‍वासाचे, आधाराचे ठिकाण झाल्या आहेत. रक्तदान आणि कुटुंब नियोजनासारखे उपक्रम या सक्षम आरोग्य सेविकांमुळे शक्य झाले आहेत.

- डॉ. राजा दांडेकर  ९४२२४३१२७५


इतर ग्रामविकास
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
कारले म्हणावे तर टाकरखेडचेच’बुलडाणा जिल्ह्यातील टाकरखेड गाव कारले पिकासाठी...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
शेती, पूरक उद्योगावर दिला भरकुडाळ तालुक्यातील पूर्व भागात आमचे निरुखे हे...
महिला सक्षमीकरणातून होतो ग्राम विकाससामर्थ्य संपन्न ग्रामीण भारताच्या उभारणीसाठी...
पाणीपुरवठा, जलपुनर्भरणाच्या कामांना आता...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या...
उच्चशिक्षित महिला सरपंचांनी गावात पेरला...नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मोहगावच्या...
लोक सहभाग हाच विकासाचा पायाकुटुंबाचा विकास म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचा...
ग्राम स्वच्छता, प्रयोगशील शेतीला चालनालोणी बुद्रुक (ता.पाथरी, जि.परभणी येथे ...
पाणलोटाच्या मदतीनं केली दुष्काळावर मातजालना जिल्ह्यातील कायम दुष्काळी नंदापूर गावच्या...
गावामध्ये असावी संयुक्त कुरण व्यवस्थापन...शेती परिवार कल्याण संस्था गावशिवारातील माळरानावर...
गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे प्रयत्नतीन वर्षांपासून मनारखेड गावाचे सरपंचपद सांभाळत...
शिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...
दुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....
प्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...
भाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...