agricultural news in marathi The villagers of Gorwa started a water revolution | Page 2 ||| Agrowon

गोरव्हाच्या ग्रामस्थांनी घडवली जलक्रांती

गोपाल हागे
शुक्रवार, 9 जुलै 2021

अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या छोट्या गावाने लोकसहभागातून जलक्रांती घडवली आहे. कधीकाळी दुष्काळाच्या छायेत वावरणारे हे गाव आता हिरवाईने नटले आहे. 

अकोला जिल्ह्यातील गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) या छोट्या गावाने लोकसहभागातून जलक्रांती घडवली आहे. कधीकाळी दुष्काळाच्या छायेत वावरणारे हे गाव आता हिरवाईने नटले आहे. गावशिवारात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरतो. जलसंधारणासह स्वच्छता व सामाजिक उपक्रम राबविण्यात गावाने जिल्हयात अग्रक्रम स्थापित केला असून, गावाच्या विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे.

अकोला जिल्ह्यात गोरव्हा (ता.. बार्शीटाकळी) गावात सन २०१६ पूर्वी मोजक्या प्रमाणात सिंचन व्हायचे. कायम दुष्काळाशी सामना करावा लागायचा. गावची जमीन मुरमाड, हलकी होती. खरिपात पावसाच्या पाण्यावर येईल तेवढेच पीक उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडायचे.केवळ पाच हेक्टर क्षेत्रात हंगामी ओलिताची सोय होती. गावकऱ्यांना पिण्यापुरते पाणी उपलब्ध व्हायचे. खरिपात सोयाबीन घेतल्यानंतर पुढील पीक घेण्याचा पर्यायच नव्हता. हंगाम आटोपला की रोजगारासाठी ८० टक्के लोक शहरांमध्ये स्थलांतरित व्हायचे. 

कामे नेली तडीस 
डिसेंबर २०१६ मध्ये सरपंचपदी राजेश खांबलकर नियुक्त झाले. त्यांनी पहिल्याच बैठकीत गाव जलयुक्त करण्याचा निश्‍चय केला. ग्रामपंचायत सदस्य, गावकऱ्यांच्या सहकार्यातून मोठी कामे तडीस नेण्यास सुरवात झाली. गावकऱ्यांनी हिवरे बाजार, राळेगणसिद्धी व पाटोदा आदी ठिकाणी भेटी दिल्या. ‘वॉटर कप’ स्पर्धेत सहभाग घेतला. गावकऱ्यांनी दिवसरात्र श्रमदान केले. त्याचे फळ मिळून स्पर्धेत गाव तालुक्यात पहिले आले. गेल्या तीन वर्षांपासून भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने गावात दोन यंत्रे पूर्णवेळ कामासाठी मिळाली. त्यातून नाला खोलीकरण झाले. गावकरी दरवर्षी सहा- सात लाख रुपये वर्गणी गोळा करून जलसंधारणाची कामे करून घेतात. कोरोना संकट ही तर ग्रामस्थांनी संधी समजली. त्या काळात एकही दिवस खंड पडू न देता ‘एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या म्हणीप्रमाणे बांध घालणे, तलावातील गाळ काढण्याचे काम केले.

जलक्रांती घडली

 • वर्षानुवर्षे दुष्काळाने होरपळणाऱ्या गोरव्हा गावाने जलक्रांती घडवली. गावपरिसर दुष्काळमुक्त होऊन शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला. जलसंधारणाचा गोरव्हा पॅटर्न जिल्ह्यात नावारूपाला आला. 
 • १३५ एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर सिंचनाची सोय  झाली. १०० ते १५० एकरात हंगामी सिंचन होते. कधीकाळी कोरडा पडणारा नाला बारमाही वाहतो. जमिनीची पाणी साठवण क्षमता कमालीची वाढली. ४२ विहिरींची पाणी पातळी २० फुटांपर्यंत आली. खरीपासोबत रब्बी हंगाम घेता आला. सहा जणांनी कुक्कुट पालन सुरु केले. सुमारे ३० हजार पक्षी त्यांच्याकडे आहेत. दुग्ध व्यवसाय वाढत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. 

विकासातील ठळक बाबी 

 • कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनातून उन्नत भारत अभियानाअंतर्गत सामुहिक डेअरी उभारण्याचा प्रयत्न. यासाठी नऊ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार. मंजुरी मिळाल्यास गावातील ३२५ कुटुंबांच्या मालकीची प्रत्येकी दोन दुधाळ जनावरे असतील. एकत्रितरीत्या संगोपन होणार. 
 • घरातील सांडपाणी व्यवस्थित नाल्यांमधून एकत्रित करण्यात येणार. त्यासाठी नाले बांधण्याचे काम सुरु.भूमिगत शोषखड्डे बनविले.  
 • शेतापर्यंत जाण्यासाठी दोन शेतरस्त्यांचे एक किलोमीटर अंतराचे काम पूर्ण.  
 • ‘स्मार्ट व्हिलेज’ स्पर्धेत जिल्हास्तरीय ४० लाख रुपयांचे पारितोषिक. सरपंच खांबलकर यांना पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.   मागील वर्षी सामाजिक वनीकरणाच्या क्षेत्रात १८ हजार झाडे  लावली. पैकी ९० टक्के जिवंत. यंदा सात हजार झाडांचे नियोजन. ग्रामपंचायतीकडून दोन हजार फळझाडांचे रोपण.  सन २०१८-१९- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत प्रथम पुरस्कार. पाच लाख रुपये रोख पारितोषिकाने सन्मान. 

गोरव्हा गावाविषयी

 • क्षेत्रफळ ५२५ हेक्टर. पैकी सुमारे १३५ एकर शेती सिंचनाखाली आली आहे. 
 • सुमारे ३२५ कुटुंबे आहेत तर १२७५ लोकसंख्या.
 • स्वच्छतेचे उपक्रम नियमितपणे राबवण्यामध्ये गाव प्रसिद्ध.
 • हंगामी सिंचन- १५० एकर
 • महिला गट- १७
 • शेतकरी कंपनी-१
 • कृषी विकास संस्था-१
 • खोदतळी-दोन (२२५ बाय २०० बाय ३० फूट आकार)
 • विहिरींची सद्यःस्थितीतील पातळी- १५ ते २० फुटांवर

प्रतिक्रिया
गावकऱ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सक्रिय भाग घेत लोकसहभागातून विविध कामे पूर्ण केली. परिणामी, गाव जलसंपन्न बनले. आणखी पुढे जाण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-राजेश खांबलकर, सरपंच पाच वर्षांत गावकऱ्यांनी गावाचा कायापालट केला. शासकीय योजनांचे पाठबळ मिळाले. संपूर्ण विकासाचे मॉडेल उभे राहिले आहे. पुढील टप्प्यात रोजगार निर्मितीसाठी काम सुरू करणार आहोत.

-ज्ञानेश्‍वर बिचारे, ९७६७८९९२८७
ग्रामसेवक, गोरव्हा

गावात पूर्वी सिंचनाची सोय फारच कमी क्षेत्रात होती. जलसंधारणाचे उपचार केल्याने सिंचन क्षेत्र वाढले. रब्बी पिके घेणाऱ्यांची संख्या वाढली. आम्ही शेतकऱ्यांचे गट तयार केले. शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन सातत्याने मिळते. शेतातील कचरा न जाळता त्यापासून खत तयार करणे व जमिनीचा पोत राखण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे. 
- सागर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ता, गोरव्हा


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळी निर्यातीत ‘सुरचिता’चे पदार्पण करकंब (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील सुरचिता ॲ...
फळबागांसाठी प्रसिद्ध झाले सोनोरीपुणे जिल्ह्यात सासवड शहरापासून काही किलोमीटरवर...
पेठमधील मोगऱ्याचा नाशिकमध्ये दरवळनाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात आदिवासी...
सणासुदीच्या आशेवर कोल्हापूरचा फुलबाजार...गेल्या चार महिन्यांपासून अत्यंत कमी दरांवर...
यांत्रिकी पूरक उद्योग ठरताहेत...औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री तालुक्‍यातील आठवडी...
दर्जेदार रेशीम कोष उत्पादनात पाटील...जळगाव जिल्ह्यात देवपिंप्री येथील विकास पाटील...
उपक्रमशीलतेतून महिला झाल्या सक्षमटिमटाळा (जि.अमरावती) येथील सरस्वती स्वयंसाह्यता...
सुरू उसाचे एकरी १२२ टन उत्पादनअभ्यासपूर्ण, शास्त्रीय व्यवस्थापन व तंत्रज्ञान या...
बटाटा चिप्सचा ‘नेचर टॉप’ ब्रॅण्डपुणे जिल्ह्यातील साबळेवाडी येथील आदेश सुदाम काटकर...
आधुनिक तंत्र शेतीच्या लाटेवर मंगरूळपरभणी जिल्ह्यातील मंगरूळ बुद्रूक गेल्या चार...
बारमाही भाजीपाला उत्पादन : ‘गेडेकर...सुसूत्रता, पीक विविधता, तंत्रज्ञानाचा प्रभावी...
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...