फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला वेंगुर्ल्यात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन केंद्रांतर्गत फळ प्रकिया विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे आंबा, काजू, फणस, तसेच अन्य स्थानिक मालापासून सरबत, कॅण्डी, जॅम, पावडर आदींची निर्मिती केली आहे.
Jackfruit Processing
Jackfruit Processing

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन केंद्रांतर्गत फळ प्रकिया विभाग कार्यरत आहे. त्याद्वारे आंबा, काजू, फणस, तसेच अन्य स्थानिक मालापासून सरबत, कॅण्डी, जॅम, पावडर आदींची निर्मिती केली आहे. त्याविषयीचे संशोधन, तंत्रज्ञान व प्रशिक्षणही उपलब्ध करून शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योजक होण्याची दिशा दाखवली आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे फळसंशोधन केंद्र कार्यरत आहे. कोकणातील आंबा,काजू, कोकम, नारळ, सुपारी, आवळा यांसह विविध फळपिकांवर संशोधन, कमी कालावधीत उत्पादन देणाऱ्या कलम रोपांची निर्मिती, फळप्रक्रिया करून विविध उत्पादनांची निर्मिती व तंत्रज्ञान शेतकरी, उद्योजकांपर्यंत पोहोचविणे अशा विविध उद्देशांनी येथे कार्य चालते. काजूच्या वेंगुर्ला १ ते ९ या जातींच्या कलमांची निर्मिती या केंद्राने केली. त्यातील वेंगुर्ला ४ ते ७ या कलमांनी फलोत्पादन क्षेत्रात क्रांती घडवली. कोकणातील हजारो हेक्टर क्षेत्र या जातींच्या लागवडीखाली आले आहे. कोकमाच्या अमृता आणि हातीस या विकसित जातीही लोकप्रिय आहेत. प्रक्रिया उद्योग

  • केंद्रात २०१०-११ मध्ये प्रकिया, प्रशिक्षण व निदान विभाग सुरू करण्यात आला. आंबा, कोकम आदी फळांवर सुरुवातीला व टप्प्याटप्प्याने अन्य फळांवर प्रकिया सुरू करण्यात आली.
  • नवे तंत्रज्ञान, यंत्रसामग्री प्राप्त झाल्यानंतर उत्पादनांची संख्या वाढली.
  • काजू बोंडावर प्रकिया काजू कलमांवरील संशोधनामुळे सिंधुदुर्गसहित रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर जिल्ह्यांतील आजरा, चंदगड या भागांत काजू लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने वाढले. या पिकात बोंड रसाने भरलेला असतो. बियात गर असतो. शेतकरी बियाची विक्री करतात. मात्र मोठ्या प्रमाणात बोंड वाया जाते. त्यातील रस गुणकारी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यावर प्रकिया करण्याचा प्रयत्न केंद्रात सुरू होता. त्यात यश आले. बोंडापासून सरबत यापूर्वी बनविले जायचे. आता कॅण्डी, जॅम, पावडर, पोळी आदी उत्पादनांची निर्मितीही केंद्रात यशस्वी झाली आहे. पावडरीचा वापर विविध बिस्किटांमध्ये करता येणार आहे. काजू बोंडात ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. सध्या कोरोना संकटामुळे त्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. त्यामुळे त्यावर आधारित उत्पादनांना महत्त्व प्राप्त होण्यास मदत मिळेल. प्रशिक्षण

  • स्वयंरोजगार निर्मिती व उद्योजकता वाढावी यासाठी प्रकिया उद्योगांविषयी केंद्रात प्रशिक्षण दिले जाते.
  • आतापर्यंत २५ शिबिरे झाली असून, ५०० हून अधिक तरुण-तरुणींना प्रशिक्षण देण्यात आले आहे. काहींनी उद्योग सुरू केले आहेत.
  • फळ संशोधन केंद्राची वैशिष्ट्ये

  • काढणीपश्‍चात व्यवस्थापन, फळप्रकिया, जैविक कीड-रोगनियंत्रण, उती व पाने पृथक्करण, पीक चिकित्सालय प्रयोगशाळा या सुविधा
  • फळांची काढणी, प्रतवारी, साठवणुकीचे तंत्रज्ञान आदी बाबीवर संशोधन
  • डॉ.मंगल कदम या प्रकिया, प्रशिक्षण व निदान विभागात कार्यरत आहेत. त्या व्यतिरिक्त डॉ. विजयकुमार देसाई, डॉ. मोहन दळवी, डॉ. नीता देशमुख आदी कार्यरत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांचे मार्गदर्शन.
  • उत्पादने

  • आंबा-पोळी, लोणचे, पल्प, चटणी
  • काज बोंड- सरबत, जॅम, कॅण्डी, पावडर
  • आवळा- सिरप, कॅण्डी, चूर्ण, मावा, लोणचे, पावडर
  • कोकम- सरबत, आगळ, गोड सोल (स्थानिक भाषेत कोकम खजूर)
  • जायफळ सालीपासून- कॅण्डी, लोणचे, सिरप
  • बेलफळ- सरबत, जॅम
  • केळी- वेफर्स
  • चिकू- पावडर,
  • फणस- वेफर्स
  • अननस- सरबत
  • फणस- फणसपोळी
  • पॅकिंग व किंमत बहुतांश उत्पादनांचे पॅकिंग ग्राहकांच्या मागणीनुसार १०० ग्रॅम, २०० ग्रॅम ते ५०० मिली या स्वरूपात ठेवले आहे. त्यांच्या किमती ५० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत आहेत. यंत्रसामग्री

  • पल्पिंग तसेच कार्बोनेशन युनिट, मिनी ऑइल एक्सपेलर, कंप्लीट व्रॅपिंग ॲन्ड श्रिंकिंग युनिट,
  • फॉर्म फिल ॲण्ड सील मशिन, कॅबिनेट व व्हॅक्यूम ड्रायर, आवळा ज्यूस एक्सट्रॅक्टर, बास्केट प्रेस आदी. काही मऊ फळांवर प्रकिया करण्याची क्षमता प्रति तास १०० किलो.
  • युनिट पाच लाखांपासून २५ लाख रुपयापर्यंत.
  • केंद्रातच विक्री

  • प्रकिया विभागात २० हून अधिक उत्पादनांची निर्मिती होते. विक्री हा मुख्य हेतू नाही. मात्र
  • येथे विविध भागांतून येणाऱ्या सहली, पर्यटक, प्रशिक्षणासाठी येणारे विद्यार्थी व व्यक्ती
  • उत्पादनांची खरेदी करतात. मागील वर्षी सुमारे सव्वातीन लाख रुपयांची विक्री झाली.
  • दुर्लक्षित पिकांविषयी प्रयोग फळसंशोधन केंद्र आणि लुपिन फाउंडेशन यांच्यात गेल्या वर्षी दुर्लक्षित वनस्पतींची कलमे तयार करून व्यापारी दृष्टिकोनातून लागवड करण्यासाठी सामंजस्य करार झाला. त्यातून सुरंगी, पपई, जांभूळ, वटसोल, वावडिंग आणि त्रिफळ या वनस्पतींची निवड करण्यात आली. पैकी सुरंगी, पपई आणि जांभूळ यांची कलमे तयार करण्यात केंद्राला यश मिळाले आहे. त्रिफळाची कलमे बांधण्यात काही अंशी यश आले असून, वावडिंगाची कलमे तयार करण्यावर भर दिला जात आहे. फळ संशोधन केंद्राने आंब्याच्या सात, काजूच्या नऊ तर फणस, जांभूळ, कोकम, लिंबू, केळी व जायफळ यांची प्रत्येक एक अशा २३ जाती विकसित केल्या आहेत. त्यामुळे केंद्राला जागतिक पातळीवर नावलौकीक मिळाला आहे. - डॉ. बी. एन. सावंत, सहयोगी संशोधन संचालक, फळसंशोधन केंद्र संपर्क : डॉ. मंगल कदम, ८२७५४७३०९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com