पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रावरील आकाश पूर्णतः ढगाळ तर मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पावसात उघडीप राहील. दक्षिण कोकणात मध्यम स्वरूपात प्रतिदिनी १२ मिमीपर्यंत पावसाची शक्यता असून काही काळ उघडीप राहील.
weekly weather by dr. sabale
weekly weather by dr. sabale

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रावरील आकाश पूर्णतः ढगाळ तर मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पावसात उघडीप राहील. दक्षिण कोकणात मध्यम स्वरूपात प्रतिदिनी १२ मिमीपर्यंत पावसाची शक्यता असून काही काळ उघडीप राहील. उत्तर कोकणात मध्यम स्वरूपात प्रतिदिनी ११ ते ३२ मि.मी.पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. सद्यःस्थितीत महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत आहे. उत्तरेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल तर दक्षिणेकडील भागावर १००८ हेप्टापास्कलपर्यंत हवेच्या दाबात वाढ होईल. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्रावरील आकाश पूर्णतः ढगाळ तर मराठवाडा व विदर्भात अंशतः ढगाळ राहील. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पावसात उघडीप राहील. दक्षिण कोकणात मध्यम स्वरूपात प्रतिदिनी १२ मिमीपर्यंत पावसाची शक्यता असून काही काळ उघडीप राहील. उत्तर कोकणात मध्यम स्वरूपात प्रतिदिनी ११ ते ३२ मि.मी.पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिमी घाट भागात काही दिवशी १४ ते १५ मि.मी. तर चंद्रपूर व नंदूरबार जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट भागात २० ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात पूर्णतः पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. धुळे, लातूर, नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात काही दिवशी १० ते १६ मि.मी. तर बुलडाणा, अमरावती, गडचिरोली, कोल्हापूर जिल्ह्यांत १० ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्‍यता तर काही काळ उघडीप राहील. वाऱ्याचा ताशी वेग सामान्यच राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९६ टक्के तर दुपारची ५९ ते ८२ टक्के राहील. कमाल तापमान औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. कोकण  दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात प्रतिदिनी १२ ते १५ मि.मी. तर उत्तर कोकणातील रायगड जिल्ह्यात ११ ते २२ मि.मी., ठाणे जिल्ह्यात ३२ मि.मी.पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. कोकणातही पावसाचा जोर कमी झाला आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८३ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  धुळे व जळगाव जिल्ह्यात काही दिवशी १० ते १२ मि.मी. तर नाशिक जिल्ह्यात १४ ते १५ मि.मी., नंदूरबार जिल्ह्यात ९ ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ९ ते १२ किमी राहील. कमाल तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर नंदूरबार जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ८० टक्के राहील. मराठवाडा  या आठवड्यात उस्मानाबाद जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. तसेच हिंगोली आणि औरंगाबाद जिल्ह्यात आज पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात उद्या (सोमवार, ता.३१) रोजी १९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते १४ किमी राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर बीड व जालना जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत म्हणजेच उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६७ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती जिल्ह्यांत आज आणि उद्या ७ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ९ ते १४ किमी राहील. कमाल तापमान वाशीम जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर बुलडाणा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८३ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.३०,३१) रोजी ५ मिमी आणि २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वर्धा जिल्ह्यात आज ३ मिमी आणि उद्या ११ मिमी तर नागपूर जिल्ह्यात ४ ते १३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १० ते ११ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ७२ टक्के राहील. पूर्व विदर्भ  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आज आणि उद्या (ता.३०,३१) रोजी १३ ते १९ मिमी तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ८ ते ११ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७३ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  नगर जिल्ह्यासह सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्‍यता नाही. कोल्हापूर जिल्ह्यात आज आणि उद्या (ता.३०,३१) रोजी ५ ते १० मिमी तर सांगली आणि सातारा जिल्ह्यात उद्या (ता.३१) रोजी ३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. पुणे व नगर जिल्ह्यात आज (ता.३०) रोजी ३ ते ४ मिमी पावसाची शक्‍यता असून वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १५ किमी राहील. कमाल तापमान सातारा व पुणे जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, नगर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ७० टक्के राहील. कृषीसल्ला 

  • पावसात उघडीप असल्याने मूग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा या पिकांची काढणी करावी. शेंगा उन्हात वाळवून काठीने बडवून दाणे वेगळे करावेत व पोत्यात भरून सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • खरिपातील पिकांची काढणी झालेल्या जमिनीवर नांगराची पाळी देऊन पूर्वमशागत करावी. रब्बी ज्वारी पेरणीसाठी जमीन तयार करावी.
  • तण नियंत्रणासाठी योग्य उपाय योजावेत.
  • -(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com