नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामान
महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आठवडाभर राहील. त्यामुळे सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर आकाश निरभ्र राहून प्रखर सूर्यप्रकाश व दुपारच्या तापमानात वाढ होईल.
महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आठवडाभर राहील. त्यामुळे सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर आकाश निरभ्र राहून प्रखर सूर्यप्रकाश व दुपारच्या तापमानात वाढ होईल.
महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आठवडाभर राहील. त्यामुळे सकाळी थंड व दुपारी उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. आठवडाभर आकाश निरभ्र राहून प्रखर सूर्यप्रकाश व दुपारच्या तापमानात वाढ होईल. त्यामुळे सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कमी होईल. मात्र दुपारी हवामान अत्यंत कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढेल. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. वाऱ्याची दिशा कोकण आणि पूर्व विदर्भात ईशान्येकडून राहील. मात्र उर्वरित महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व नैऋत्येकडून राहील. दिवसाचा कालावधी वाढेल तर रात्रीचा कालावधी कमी होत जाईल.
कोकण
कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअसपर्यंत, तर उर्वरित सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश निरभ्र राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात ५३ टक्के, तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत ६६ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून
राहील.
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात २९ टक्के, नंदूरबार जिल्ह्यात ४१ टक्के, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत ३६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते १७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी आणि दिशा नैऋत्येकडून राहील.
मराठवाडा
कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे सकाळी हवामान थंड व कोरडे राहील. आकाश निरभ्र राहील. दुपारी उष्णता वाढल्याचे जाणवेल. त्यामुळे सकाळची सापेक्ष आर्द्रता बहुतांशी जिल्ह्यांत १८ ते २८ टक्के इतकी कमी राहील. दुपारी तापमानात वाढ होऊन सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण १० ते १७ टक्के इतके कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. त्यामुळे सकाळी थंड, दुपारी उष्ण हवामान राहील.
पश्चिम विदर्भ
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापामन ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते २६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १० टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून आणि ताशी वेग ६ ते ७ किमी राहील.
मध्य विदर्भ
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.
पूर्व विदर्भ
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पूर्व विदर्भात २२ ते २५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता फक्त ९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी तर दिशा ईशान्येकडून राहील.
दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, तर पुणे, नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ५८ टक्के, तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ ते ३८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १३ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील.
कृषी सल्ला
- काढणीस आलेल्या हरभरा, हळद, आले पिकांची काढणी करावी.
- तीळ, बाजरी, भेंडी, दोडका, दुधी भोपळा, काशी भोपळा या पिकांची पेरणी करावी.
- कांदा पिकावरील फुलकिडी आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
- आंब्यामध्ये मोहोर फुलण्याच्या अवस्थेमध्ये शक्यतो फवारणी टाळावी, अन्यथा परागीकरणावर परिणाम होऊ शकतो.
- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)
- 1 of 1096
- ››