agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Page 2 ||| Agrowon

तापमानात वाढ होण्यास सुरुवात

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 7 मार्च 2021

किमान व कमाल तापमानात वेगाने होणारी वाढ ही हवेचे दाब कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. हवेचे दाब कमी होणे, तापमानात वाढ होणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे या बाबी आठवडाभर आधीच होत असल्याने प्रखर उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होत आहे.
 

मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रावरील हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका कमी झाला आहे. मध्य व उत्तर भारतातील हवेचे दाब १००८ ते १०१० हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. किमान व कमाल तापमानात वेगाने होणारी वाढ ही हवेचे दाब कमी होण्यास कारणीभूत ठरत आहे. हवेचे दाब कमी होणे, तापमानात वाढ होणे, आर्द्रतेचे प्रमाण कमी होणे या बाबी आठवडाभर आधीच होत असल्याने प्रखर उन्हाळा सुरू झाल्याची जाणीव होत आहे.

या आठवड्यापासूनच नैॡत्येकडून वारे वाहण्यासाठी हवामान घटक अनुकूल बनत आहेत. त्यामुळे मार्च, एप्रिल व मे महिन्यात प्रखर उन्हाळा जाणवण्याची शक्‍यता आहे. हवामान बदलाचा प्रभाव उन्हाळी हंगामात कमी प्रमाणात जाणवेल. मार्च महिनाअखेरपर्यंत ला निनाचा प्रभाव अल्पशा प्रमाणात राहणार आहे. त्यामुळे एप्रिल, मे महिन्यात अवेळी व अवकाळी पावसाची शक्यता आहे. हवामान स्थिती अशीच राहिल्यास या वर्षाचा मॉन्सून वेळेवर येणे शक्‍य आहे. या आठवड्यात वाऱ्याचा वेग सर्वसाधारणच राहील.

कोकण
सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ तर उर्वरित जिल्ह्यात निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ठाणे व रायगड जिल्ह्यांत ५३ ते ६५ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ८४ टक्के राहील. रायगड व ठाणे जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते २८ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४१ ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी आणि दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३५ टक्के, तर  धुळे, जळगाव जिल्ह्यांत २७ ते २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११  किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा
औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअस, तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, हिंगोली, औरंगाबाद जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी व जालना जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नांदेड जिल्ह्यात ३५ टक्के, लातूर जिल्ह्यात २५ टक्के, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत २२ टक्के राहील. उर्वरित बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ती १४ ते १९ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते ११ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ११ किमी राहील. वाऱ्याची दिशा काही जिल्ह्यांत आग्नेयेकडून तसेच नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, अकोला, वाशीम आणि अमरावती जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १४ टक्के तर दुपारची ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.  वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर नागपूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १४ ते १५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ टक्के राहील. कमाल व किमान तापमानात वाढ झाल्यामुळे आर्द्रतेचे प्रमाणात घट होईल. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ
कमाल तापमान गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, चंद्रपूर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १६ ते २९  टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते १० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी आणि दिशा आग्नेयेकडून  राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे आणि नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ७१ टक्के, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २६ ते ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ किमी आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील. हवामान कोरडे राहील.

कृषी सल्ला 

  • तापमानामध्ये वाढ होत असल्याने दुभत्या जनावरांना तसेच इतर जनावरांना दिवसातून ३ ते ४ वेळा पिण्यासाठी पाणी उपलब्ध करावे. पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे.
  • शेडनेटमध्ये कोथिंबीर, चुका, चाकवत, पालक, चवळी या भाजीपाला पिकांची लागवड करावी.
  • कोंबड्यांना लसीकरण करावे, तसेच स्वच्छ, निर्जंतुक पाणी पिण्यास द्यावे.
  • उन्हाळी बाजरी, तीळ, मूग, नाचणी इत्यादी पिकांच्या पेरण्या पूर्ण कराव्यात.

- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)
 


इतर ताज्या घडामोडी
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...
कोरोनाबाबत डाॅ. सिंग यांनी सूचवलेला...नांदेड : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी माजी पंतप्रधान...
कोरोना व्हॅक्सिनसाठी वयाची अट शिथिल...कोल्हापूर : भाजीपाला, दूध उत्पादक तसेच...
पुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगामपुणे : शहरात कोरोना संसर्गामुळे लावण्यात आलेल्या...
गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे ...चंद्रपूर : प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या...
पुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी...पुणे : गेल्या दीड महिन्यापासून उन्हाच्या झळा...
कोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन...नांदेड : जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती...
पालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या...येवला, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून...