कमाल तापमानात वाढ; उष्ण, कोरडे हवामान

महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. बुधवार व गुरुवार (ता. ७, ८) रोजी हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे कोकण, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांत हवामान ढगाळ राहील.
weekly weather
weekly weather

महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. बुधवार व गुरुवार (ता. ७, ८) रोजी हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे कोकण, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांत हवामान ढगाळ राहील. मराठवाडा व विदर्भाच्या भागात सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे उष्ण लहरी जाणवतील. महाराष्ट्रावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. बुधवार व गुरुवार (ता. ७, ८) रोजी हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होतील. त्यामुळे कोकण, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रासह विदर्भातील काही भागांत हवामान ढगाळ राहील. मराठवाडा व विदर्भाच्या भागात सकाळच्या व दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होईल. त्यामुळे उष्ण लहरी जाणवतील. यापुढील काळात दिवसाचा कालावधी १२ तासांपेक्षा अधिक राहील. सूर्यकिरणे सरळ येण्यामुळे कमाल तापमानात वाढ होत जाईल. वाऱ्याची  दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहण्यामुळे समुद्रावरील बाष्प येऊन ढगाळ हवामान राहण्यास अनुकूल ठरेल. धुळे, उस्मानाबाद, बीड, जालना, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ किमी पेक्षा अधिक राहण्यामुळे उष्ण वारे, उष्ण लहरी तयार होतील. आणि उष्णतेची लाट जाणवेल.  कोकण ठाणे जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअसपर्यंत राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ६ किमी राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, रायगड जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर ठाणे जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअसपर्यंत राहील. किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ५३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५ ते १० टक्के एवढी कमी राहील. हवामान उष्ण व अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १४ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मराठवाडा औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता १० ते ३० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३ ते ७ टक्के  इतकी कमी राहील. त्यामुळे दुपारी अत्यंत कोरडे व उष्ण हवामान राहील. उस्मानाबाद, बीड व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १४ किमी राहील. त्यामुळे उष्ण लहरी किंवा उष्णतेच्या लाटा जाणवण्यास सुरुवात होईल. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ बुलडाणा जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, तर अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७ ते २१ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४ ते ६ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान उष्ण व अत्यंत कोरडे  राहील. उष्ण लहरी आणि उष्णतेची लाट जाणवेल. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किमी व दिशा नैर्ऋत्येकडून राहील. मध्य विदर्भ सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७ ते २१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४ ते ६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहील. हवामान अत्यंत उष्ण व कोरडे राहील. पूर्व विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस राहील. गडचिरोली जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७ ते १५ टक्के, तर दुपारची ३ टक्के इतकी कमी राहील. अत्यंत उष्ण व कोरडे हवामान जाणवेल. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी व दिशा ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, सातारा व पुणे जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर नगर व सांगली जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात ते ४१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर उर्वरित जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ७१ टक्के, तर दुपारची ७ ते १८ टक्के राहील. सोलापूर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १५ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कृषी सल्ला 

  • जनावरे, कुक्कुटपालनास थंड व स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.
  • शेतातील कामे सकाळी व दुपारी ऊन कमी झाल्यावर करावीत.
  • जनावरे सावलीत बांधावीत.
  • नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना सावली करताना चार कोपऱ्यांत चार कांबट्या रोवून वरून किलतान अडकवून सावली करावी.
  • ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा. पाटाने पाणी देताना दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ  व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी  फोरम फॉर साउथ आशिया.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com