विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यता

सकाळ, दुपार व सायंकाळी उष्ण व कोरडे हवामान राहील. मराठवाड्यात कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे अत्यंत उष्ण व कोरडे हवामान राहील. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडूनराहील.
weekly weather
weekly weather

सकाळ, दुपार व सायंकाळी उष्ण व कोरडे हवामान राहील. मराठवाड्यात कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे अत्यंत उष्ण व कोरडे हवामान राहील. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.  महाराष्ट्रावर आज आणि उद्या १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे विदर्भ व मराठवाडा भागावर कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र तयार होऊन पावसाची शक्‍यता निर्माण होईल. बुधवारी (ता.१४) उत्तर भारतातील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी होतील. मात्र मध्य भारतापासून दक्षिण भारतात हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. शुक्रवारी (ता. १६) महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील हवेचे दाब पुन्हा कमी होतील. परिणामी, ढगाळ हवामान व पावसाची शक्‍यता निर्माण करतील. संपूर्ण विदर्भात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे सकाळ, दुपार व सायंकाळी उष्ण व कोरडे हवामान राहील. मराठवाड्यात कमाल तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे अत्यंत उष्ण व कोरडे हवामान राहील. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील.  अरबी समुद्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे वारे नैॡत्येकडूनही वाहतील. सध्या ला निनाचा सौम्य प्रभाव राहण्यामुळे अवेळी व अवकाळी पावसाची शक्‍यता निर्माण होत राहील. वाऱ्याचा वेग बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नगर व सोलापूर जिल्ह्यांत अधिक राहील. कोकण  कमाल तापमान सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८५ टक्के, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत ४२ ते ५० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४० टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात २९ टक्के, रायगड व ठाणे जिल्ह्यांत १५ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  धुळे व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २३ ते २८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ८ ते १२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. मराठवाडा  आज आणि उद्या उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मि.मी., लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४ ते ६ मि.मी., तर नांदेड जिल्ह्यात १५ मि.मी.पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत ३१ ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १५ टक्के इतकी कमी राहील. बीड व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २२ ते २३ किमी, हिंगोली, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १५ ते १९ किमी, नांदेड, जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत ८ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर अकोला, बुलडाणा जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २९ ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १६ टक्के इतकी कमी राहील. बुलडाणा, अकोला जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १९ किमी, तर वाशीम, अमरावती जिल्ह्यांत ११ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.   मध्य विदर्भ  यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १५ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. तसेच ४ ते १२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भ  चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४ ते ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. पावसाची शक्‍यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४२ ते ४८ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ५० ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कमाल तापमान सोलापूर जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस, तर नगर जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, सांगली व सोलापूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर सातारा, पुणे, नगर जिल्ह्यांत ते २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची व दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ७६ टक्के राहील. उर्वरित जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३६ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १४ ते १५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १६ किमी व दिशा आग्नेयेकडून राहील. कृषी सल्ला 

  •  आंबा फळांची काढणी देठासह झेल्याच्या साह्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उन्हाची तीव्रता कमी झाल्यावर करावी.
  • उन्हात वाळत ठेवलेल्या धान्याचे पावसापासून संरक्षण करून ते सुरक्षित स्थळी ठेवावे.
  • द्राक्षाची एप्रिल छाटणी करून घ्यावी.
  • फळबागांमध्ये गंध सापळे लावावेत. त्यामुळे फळांचे किडींपासून संरक्षण होईल.
  • नारळ, आंबा व इतर फळपिकांना योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करावा.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी  फोरम फॉर साउथ आशिया.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com