agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Agrowon

राज्यात उष्ण, ढगाळ हवामान

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 18 एप्रिल 2021

सोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच त्यापुढेही महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. 

सोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच त्यापुढेही महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता आहे.

आज महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील. सोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच त्यापुढेही महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता आहे. कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होणाऱ्या भागात पावसाची शक्‍यता आहे.

संपूर्ण विदर्भात कमाल तापमान ४० अंशांहून अधिक राहील. विशेषतः चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. विदर्भात किमान तापमानही २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उष्ण लहरी आणि उष्णतेच्या लाटा जाणवतील. त्या प्रामुख्याने पश्‍चिम व मध्य विदर्भात तसेच पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत प्रकर्षाने जाणवतील. मराठवाड्यातील बीड, जालना जिल्ह्यांत, पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, नगर व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी १५ ते १६ किमी इतका अधिक राहील. हवामान अत्यंत कोरडे उष्ण व ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. त्यामुळे पावसाची शक्‍यता निर्माण होईल.

कोकण 
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र 
नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ३४ टक्के, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ४९ ते ६१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ टक्के राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील.

मराठवाडा 
कमाल तापमान नांदेड जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी राहण्याची शक्‍यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. वाऱ्याचा ताशी वेग बीड व जालना जिल्ह्यात १५ ते १६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैॡत्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ 
कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. तसेच किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील.

मध्य विदर्भ 
 मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ 
कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस,  गोंदिया जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २६ ते २७ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३७ ते ४८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम-दक्षिण महाराष्ट्र 
कमाल तापमान सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. तर सातारा जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस आणि पुणे, नगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६५ टक्के, तर दुपारची १२ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत १५ ते १९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला 

  • फळबागेतील फळगळ टाळण्यासाठी तसेच फळांचा आकार वाढण्यासाठी गरजेनुसार पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा. पाटाने पाणी देताना पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
  • फळबागेत आच्छादनाचा वापर करावा.
  • हळद व आले लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करा.
  • उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण होण्यासाठी जनावरांना पुरेसा निवारा उपलब्ध करावा. गोठा हवेशीर असावा. गोठ्यामधून गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.

- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)
 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...