agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Page 2 ||| Agrowon

अति उष्ण, ढगाळ हवामान

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 25 एप्रिल 2021

एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा अति उष्ण राहील. त्यामुळेच वातावरणात बाष्पाचे प्रमाण कमी राहील. परिणामी, अत्यंत कोरडे हवामान राहील. 

आठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. वाऱ्याची दिशा मुख्यत्वेकरून नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. वारे समुद्रावरून बाष्प वाहून आणतील आणि त्यातून ढगनिर्मिती होऊन पावसाची शक्‍यता निर्माण होईल. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा अति उष्ण राहील. त्यामुळेच वातावरणात बाष्पाचे प्रमाण कमी राहील. परिणामी, अत्यंत कोरडे हवामान राहील. 

महाराष्ट्रावर आज आणि उद्या १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मंगळवार (ता. २७) रोजी महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होतील. आठवडा अखेरपर्यंत ते १००६ हेप्टापास्कल इतके राहतील. वाऱ्याची दिशा मुख्यत्वेकरून नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. वारे समुद्रावरून बाष्प वाहून आणतील आणि त्यातून ढगनिर्मिती होऊन पावसाची शक्‍यता निर्माण होईल. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा अति उष्ण राहील. त्यामुळेच वातावरणात बाष्पाचे प्रमाण कमी राहील. परिणामी, अत्यंत कोरडे हवामान राहील. 

मराठवाड्यात नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर विदर्भात भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ४५ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. उष्णतेच्या लाटा जाणवतील. बाष्पीभवनाचा वेग वाढेल. किमान तापमानात वाढ होईल. त्यामुळे सकाळच्या वेळीदेखील उष्णता जाणवेल. वाऱ्याचा वेग साधारणच राहील. दिवसाचा कालावधी १२ तासांपेक्षा अधिक व रात्रीचा कालावधी कमी राहील. 

कोकण
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, तर ठाणे जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. ठाणे व रायगड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ७३ टक्के, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ८३ ते ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र
कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ४३ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस आणि धुळे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. नाशिक जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आज धुळे व जळगाव जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २६ ते ४१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

मराठवाडा
नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, उस्मानाबाद जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर लातूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ३२ ते ३४ टक्के, तर नांदेड व बीड जिल्ह्यांत २३ ते २५ टक्के राहील. परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ती १४ ते १७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १७ कि.मी. राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व हिंगोली जिल्ह्यांत १४ ते १७ कि.मी. राहण्याची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. या सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७ ते १९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळीही हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ५ ते ९ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

मध्य विदर्भ
यवतमाळ जिल्ह्यात कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. या सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष  आर्द्रता अकोला, वाशीम व यवतमाळ जिल्ह्यांत १४ ते १५ टक्के राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७ ते ८ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे  हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

पूर्व विदर्भ 
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ते २८ ते २९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७ ते १६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सांगली व सोलापूर जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर नगर, सातारा व पुणे जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअसपर्यंत  वाढेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ७८ टक्के राहील. तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ती २७ ते ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ९ ते १८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला 

  • खरबूज, टरबूज, काकडी, दुधी भोपळा, काशी फळ या पिकांना ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा. पाटाने पाणी देत असल्यास २ पाळ्यांतील अंतर कमी करावे
  • ग्रीन हाउसमध्ये मेथी, पालक, चुका, चाकवत या पालेभाज्यांची लागवड करावी.
  • नवीन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी.
  • फळबागांमध्ये झाडाच्या बुंध्यात पाचटाचे आच्छादन करावे.
  • शेतजमिनीची खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या किडीच्या सुप्त अवस्था वर येऊन उन्हाने मरतील.

- (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ  व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी  फोरम फॉर साउथ आशिया.)


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...