कोकणासह विदर्भात अतिवृष्टीची शक्‍यता

मंगळवार (ता. १५) ते शुक्रवार (ता. १८)पर्यंत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह उत्तर कोकणावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.
weekly weather
weekly weather

महाराष्ट्रावर आजपासून ते शनिवार (ता.१९)पर्यंत हवेचे दाब १००० ते १०१२ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन कोकण व विदर्भात अतिवृष्टीची शक्‍यता राहील. मंगळवार (ता. १५) ते शुक्रवार (ता. १८)पर्यंत उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मुंबईसह उत्तर कोकणावर ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे अतिवृष्टी व मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. हा हवामान बदलाचाच परिणाम आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा पुन्हा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. पुणे व कोल्हापूर भागांतही मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. कोकण  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज ६७ मि.मी., तर उद्या ८२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. आज आणि उद्या रत्नागिरी जिल्ह्यात ९७ व २४९ मि.मी., रायगड जिल्ह्यात १०२ व १०५ मि.मी. तर ठाणे जिल्ह्यात १०२ व १०५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते २१ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात आज २७ मि.मी. आणि उद्या ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नंदूरबार जिल्ह्यात ५ मि.मी. व जळगाव जिल्ह्यात आज ५ मि.मी. आणि उद्या १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १८ ते १९ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के, तर दुपारची ४० टक्के राहील. मराठवाडा  नांदेड, बीड, परभणी या जिल्ह्यांत अतिवृष्टी तर उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत मध्यम स्वरूपात आणि हिंगोली जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. एकूणच या आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर काही काळ अधिक राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत ३१ ते ३५ कि.मी., तर उर्वरित जिल्ह्यात २२ ते २७ कि.मी. राहील. औरंगाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १३ कि.मी. राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, बीड, लातूर व परभणी जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस, तर हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७६ टक्के, तर दुपारची ४० ते ५९ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  आज आणि उद्या बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत प्रतिदिन २४ ते ५४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २२ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ४५ टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १८ ते ७९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २३ ते २५ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७८ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५१ टक्के राहील. पूर्व विदर्भ  आज आणि उद्या चंद्रपूर जिल्ह्यात १३१ ते २०८ मि.मी., तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १६ ते ९५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग चंद्रपूर जिल्ह्यात १६ ते २० कि.मी. तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ८ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ८६ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  आज आणि उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ६४ ते ७१ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यांत ३६ ते ५७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ५ ते २० मि.मी. व पुणे जिल्ह्यात २४ ते ९९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २४ ते ३७ कि.मी. राहील. कमाल तापमान ३० ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ७६ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • जोरदार पावसाची शक्‍यता असल्याने सर्व नवीन लागवड केलेल्या फळबागांतील रोपांच्या बुंध्याभोवती मातीची भर द्यावी. तसेच रोपांना काठीचा आधार द्यावा.
  • वाफसा येताच बाजरीच्या दोन ओळी व तुरीची १ ओळ, तर सोयाबीनच्या ४ ओळी व १ ओळ तुरीची पेरावी.
  • शेताच्या उताराकडील बांधाची उंची एका कोपऱ्यात कमी करून शेतातील पाणी बाहेर काढावे.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य ऍग्रिकल्चर मेटिरॉलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com