agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Page 2 ||| Agrowon

आठवड्यात मध्यम ते हलक्‍या पावसाची शक्‍यता

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 20 जून 2021

या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील उघडिपीचा कालावधी अधिक राहील. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी २० किमी अथवा त्याहून अधिक राहील.

या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील उघडिपीचा कालावधी अधिक राहील. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी २० किमी अथवा त्याहून अधिक राहील.

आज महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४, तर दक्षिणेकडील भागावर १००६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. बुधवार (ता.२३) रोजी हवेच्या दाबात वाढ होऊन तो उत्तरेस १००६, तर दक्षिणेस १००८ हेप्टापास्कल इतका होईल. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होईल. हवेचे दाबात वाढ झाल्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होते. अशी परिस्थिती शनिवार (ता. २६) पर्यंत कायम राहील. एकूणच या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी आणि पावसातील उघडिपीचा कालावधी अधिक राहील. हवामान ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भात वाऱ्याचा वेग ताशी २० किमी अथवा त्याहून अधिक राहील.

कोकण 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२०) ६२ मि.मी., आणि उद्या ५५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. आजवरचा आढावा घेता या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज ६१ मि.मी. आणि उद्या ५४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात आज ५८ मि.मी. व उद्या ४५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. ठाणे जिल्ह्यात आज ३५ मि.मी. व उद्या २९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कोकणात वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ८० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र 
जळगाव जिल्ह्यात बराच काळ उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत काही दिवशी ५ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान २४ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३६ ते ४८ टक्के राहील.

मराठवाडा 
औरंगाबाद जिल्ह्यात ३२ ते ३३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. हिंगोली व जालना जिल्ह्यात पावसात उघडीप राहील. उर्वरित उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यांत आज आणि उद्या ५ ते १३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १७ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस तर नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, तर औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ते २३ अंश सेल्सिअस, तर जालना जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५९ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
अमरावती जिल्ह्यात आज १६ मि.मी., तर उद्या ११ मि.मी. पावसाची
शक्‍यता आहे. बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २० ते २२ कि.मी. राहील. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६२ टक्के, तर दुपारची ३७ टक्के राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ जिल्ह्यात आज १३ मि.मी. आणि उद्या ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नागपूर जिल्ह्यात आज २० मि.मी. आणि उद्या ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वर्धा जिल्ह्यात उद्या ५ मि.मी. पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १४ ते १७ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५३ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
चंद्रपूर जिल्ह्यात आज १९ मि.मी., तर उद्या ४५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज ५५ मि.मी., तर उद्या ७१ मि.मी., भंडारा जिल्ह्यात आज २६ मि.मी., तर उद्या २७ मि.मी. व गोंदिया जिल्ह्यात आज ५८ मि.मी., तर उद्या २९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ८ ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८६ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
आज कोल्हापूर जिल्ह्यात ६२ मि.मी., सांगली जिल्ह्यात १३ कि.मी., सातारा जिल्ह्यात ८ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ५ मि.मी. व नगर जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ४० मि.मी., सांगली जिल्ह्यात ५ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ८ मि.मी., पुणे जिल्ह्यात ५ मि.मी. व नगर जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १५ ते १८ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९१ टक्के, तर दुपारची ४८ ते ७६ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • जमिनीत पुरेसा ओलावा झाल्याशिवाय पेरण्या करू नयेत.
  • पीक लागवडीसाठी आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा.
  • फळबागांच्या कलमी रोपांची लागवड केली असल्यास झारीने किंवा ठिबकने पाणी द्यावे.
  • जमिनीच्या प्रकारानुसार पिकांच्या निवड करावी.
     

 


इतर ताज्या घडामोडी
राज्यात सरासरीच्या २४ टक्के अधिक पाऊसपुणे ः जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसदृश्य...
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार...सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते,...
अकोला झेडपीची सभा ऑनलाइन, तरीही नाश्‍...अकोला ः कोरोनामुळे बहुतांश सभा, बैठका ऑनलाइन होत...
खासगी पदविकाधारक, पशुधन पर्यवेक्षकांचे...मंचर, जि. पुणे : पशुसंवर्धन विभागातील खासगी...
सांगलीत अतिवृष्टीचा १८१ गावांना फटकासांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेली...
पूरग्रस्तांना ठाकरे सरकारने तातडीने मदत...कोल्हापूर : सध्याची पूरस्थिती बिकट आहे,...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार साडेेआठ...नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी खरिपात...
ठाकरे, फडणवीस समोरासमोरकोल्हापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी...
शिरोळमध्ये मुख्यमंत्र्यांचा फक्त पाच...शिरोळ, जि. कोल्हापूर : पूरस्थितीचा जिल्ह्यात...
पंढरपूरला जिल्हा करावासोलापूर ः गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत...
जल, मृद्‍संधारण कामांवर भर द्यावा ः एस...बुलडाणा : गावाची समृद्धी माती आणि पाणी यावरच...
खासगीकरणाविरोधात वीज कामगारांचा...नागपूर ः वीज उद्योगाच्या खासगीकरणाच्या...
युरियाची विषबाधा टाळण्यासाठी काळजी...युरियाची विषबाधा ही सर्व पाळीव प्राण्यांमध्ये...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...