राज्यात आठवडाभर पावसात उघडीपीची शक्‍यता

या आठवड्यात औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा व कोकणातील जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत अल्प ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे.
weekly weather
weekly weather

या आठवड्यात औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा व कोकणातील जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत अल्प ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत आहे. या संपूर्ण आठवड्यात हवेचे दाब उत्तरेस १००४ ते १००६ व दक्षिणेस १००६ हेप्टापास्कल इतके वाढतील. या आठवड्यात औरंगाबाद, गडचिरोली, वर्धा, गोंदिया, भंडारा व कोकणातील जिल्हे वगळता इतर सर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्‍यता आहे. मराठवाड्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता कमी आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत अल्प ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याच्या दिशेतही बदल होत आहे. उत्तर भारतातील राजस्थान, पंजाब आणि हरियाना भागात हवेचे दाब वाढण्यास सुरवात झाली आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत पडलेल्या पावसाच्या सरासरीचा विचार करता, नंदूरबार जिल्ह्यात ३४ टक्के, गोंदिया जिल्ह्यात २४ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात २४ टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बुलडाणा, अमरावती व भंडारा जिल्ह्यांत २४ ते १७ टक्के तर चंद्रपूर, वर्धा, अकोला व हिंगोली जिल्ह्यात ४ ते ५ टक्के सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या भागात अद्याप कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र कायम आहे. तसेच मध्य प्रदेशच्या पश्‍चिमी भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र असून ते वारे मध्य प्रदेश, ओडिशा या भागात ढग वाहून नेत आहेत. त्यामुळे त्याभागात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्‍यता आहे. परतीचा मॉन्सून लांबेल. मात्र, तो पाऊस ऑक्‍टोबर महिन्यातही होईल. कोकण  सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आज १३ मि.मी. तर ठाणे जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या या चारही जिल्ह्यांत ६ ते ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस तर रायगड, ठाणे जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ७५ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  आज व उद्या नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ६५ टक्के राहील. मराठवाडा  औरंगाबाद जिल्ह्यात आज ३५ मि.मी. आणि उद्या ३१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. जालना जिल्ह्यात आज ४ मि.मी. पाऊस तर उद्या उघडीप राहण्याची शक्यता आहे. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाची शक्‍यता कमी झाली आहे. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते २५ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ६० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  आज बुलडाणा, अकोला, वाशीम व जळगाव जिल्ह्यांत ४ ते ५ मि.मी. पाऊस तर उद्या पावसात उघडीप राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची ६० टक्के राहील. मध्य विदर्भ  आज यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६ ते ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ७ किमी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५९ ते ६६ टक्के राहील. पूर्व विदर्भ  आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ११ मि.मी. तर गडचिरोली जिल्ह्यात १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर जिल्ह्यात हवामान कोरडे राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९४ टक्के, तर दुपारची ५६ ते ६६ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  आज कोल्हापूर जिल्ह्यात ९ मि.मी. तर सातारा, सांगली जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ९ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस तर सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस तर सातारा जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९७ टक्के तर दुपारची ५७ ते ६९ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • सोयाबीन पिकाची काढणी, मळणीची कामे उरकून घ्यावीत.
  • विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात कपाशीची वेचणी करावयाची असल्यास ती सकाळी करावी.
  • भाताचे हळवे वाण परिपक्व झाले असल्यास काढणी करून मळणी करावी.किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकांचे वेळोवेळी निरिक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास योग्य त्या उपाययोजनांचा अवलंब करावा.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com