नैर्ऋत्य मॉन्सून अस्ताच्या मार्गावर

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील. ही परिस्थिती गुरुवार (ता.३०) पर्यंत कायम राहील. शुक्रवारी (ता.१ ऑक्‍टोबर) हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतरच नैॡत्य मॉन्सूनचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे.
weekly weather
weekly weather

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील. ही परिस्थिती गुरुवार (ता.३०) पर्यंत कायम राहील. शुक्रवारी (ता.१ ऑक्‍टोबर) हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतरच नैॡत्य मॉन्सूनचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे.  महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १००४ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब ३० सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या उत्तर व मध्य भागावर कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र कायम आहे. वारे चक्राकार फिरत असून, मोठ्या प्रमाणात भारतीय भूपृष्ठावर ढग वाहून आणत आहेत. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहील. ही परिस्थिती गुरुवार (ता.३०) पर्यंत कायम राहील. शुक्रवारी (ता.१ ऑक्‍टोबर) हवेच्या दाबात वाढ होईल आणि त्यानंतरच नैॡत्य मॉन्सूनचा जोर कमी होण्याची शक्‍यता आहे.  रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, पुणे व नगर जिल्ह्यांत आज आणि उद्या ३० ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत १० ते २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. आणि वेग सामान्यच राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.  कोकण  ठाणे व रायगड जिल्ह्यात आज ४० ते ४६ मि.मी. तर उद्या २० ते २१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज १५ ते १६ मि.मी. तर उद्या ७ ते ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेय व नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहील. कमाल तापमान दक्षिण कोकणात ३० अंश सेल्सिअस, तर उत्तर कोकणात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणात २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर उत्तर कोकणात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९६ टक्के, तर दुपारची ७१ ते ७७ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  आज नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत प्रत्येकी ५२ व ३० मि.मी., तर उद्या ६१ व ३० मि.मी. पावसाची शक्यता आहे. नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. नाशिक व धुळे जिल्ह्यांत आज २२ ते २८ मि.मी., तर उद्या ३० ते ३१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९४ टक्के, तर दुपारची ६७ ते ७४ टक्के राहील. मराठवाडा  आज नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २२ ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत १५ मि.मी., तर जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत १६ ते १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या नांदेड जिल्ह्यात २७ मि.मी., तर हिंगोली व जालना जिल्ह्यांत २१ ते २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित बीड, उस्मानाबाद व औरंगाबाद जिल्ह्यांत १३ मि.मी., लातूर व परभणी जिल्ह्यांत १७ ते १८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा उस्मानाबाद, लातूर व हिंगोली जिल्ह्यांत वायव्येकडून, तर औरंगाबाद जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. वाऱ्याची दिशा नांदेड, बीड व जालना जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. कमाल तापमान परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, औरंगाबाद जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९३ टक्के, तर दुपारची ५८ ते ७० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  आज बुलडाणा जिल्ह्यात ३८ मि.मी., अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४८ मि.मी., तर वाशीम जिल्ह्यात १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. या सर्व जिल्ह्यांत उद्या २५ ते ३० मि.मी. पावसाची शक्‍यता राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून व ताशी वेग १०  कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ टक्के, तर दुपारची ७० टक्के राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आज २४ ते ३० मि.मी. पावसाची शक्‍यता असून, सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात ३० मि.मी., तसेच नागपूर व वर्धा जिल्ह्यांत ११ ते १४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील व वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के व दुपारची ७० टक्के राहील. पूर्व विदर्भ  आज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २० ते २४ मि.मी., तर उद्या २६ ते ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज ४० मि.मी., तर उद्या ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ३ ते ४ कि.मी. इतका कमी राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७१ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  पुणे व नगर जिल्ह्यांत आज ४८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत १३ ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या सर्वच जिल्ह्यांत ८ ते २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ८ किमी राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६८ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • करडईची पेरणी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करावी. पेरणीनंतर सारे व पाट पाडावेत.
  • रब्बी ज्वारीची पेरणी करण्यासाठी हवामान अनुकूल आहे. योग्य ओलीवर पेरणी करून सारे पाट पाडावेत.
  • सोयाबीन, मूग, मटकी, उडीद ही पिके परिपक्व झाली असल्यास काढणी करावी.
  • रब्बी कांद्याच्या रोपांची लागवड सपाट वाफ्यात करावी.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम  फॉर साऊथ आशिया)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com