agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Agrowon

ईशान्य मॉन्सूनला अनुकूल वातावरण

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 3 ऑक्टोबर 2021

सद्यःस्थितीत वारे ईशान्येकडून वाहण्यास सुरुवात होत असून, ईशान्य मॉन्सूनला वातावरण अनुकूल बनत आहे. ईशान्य मॉन्सून वारे महाराष्ट्राच्या पूर्व भागावरून दक्षिण दिशेने वाहतील. हे वारे सोबत मोठ्या प्रमाणात ढग लोटून आणतील. जेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे थोड्या वेळात जोराचा पाऊस होईल.

सद्यःस्थितीत वारे ईशान्येकडून वाहण्यास सुरुवात होत असून, ईशान्य मॉन्सूनला वातावरण अनुकूल बनत आहे. ईशान्य मॉन्सून वारे महाराष्ट्राच्या पूर्व भागावरून दक्षिण दिशेने वाहतील. हे वारे सोबत मोठ्या प्रमाणात ढग लोटून आणतील. जेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे थोड्या वेळात जोराचा पाऊस होईल.

महाराष्ट्रावरील व उत्तर भारतातील हवेच्या दाबात बदल होत आहेत. उत्तर भारतातील पंजाब, हरियाना, राजस्थानवरील हवेच्या दाबात वाढ होत असून, तेथे पाऊस थांबला आहे. सलग पाच दिवस पाऊस थांबल्यानंतर ईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीचा मॉन्सून सुरू होत असल्याची घोषणा भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून केली जाईल. सद्यःस्थितीत वारे ईशान्येकडून वाहण्यास सुरुवात होत असून, ईशान्य मॉन्सूनला वातावरण अनुकूल बनत आहे. ईशान्य मॉन्सून वारे महाराष्ट्राच्या पूर्व भागावरून दक्षिण दिशेने वाहतील. हे वारे सोबत मोठ्या प्रमाणात ढग लोटून आणतील. जेथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे थोड्या वेळात जोराचा पाऊस होईल.

परभणी, जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, नगर, धुळे जिल्ह्यांतही अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित सर्वच जिल्ह्यांत सरासरीएवढा पाऊस झाला.

१ जून रोजी पावसाचा अंदाज वर्तवताना, जून व जुलै महिन्यांत पावसात मोठा खंड आणि सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. थोड्या कालावधीत अधिक जोराच्या पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. मात्र मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत फारच अधिक पाऊस झाल्याने दिसून आले. यापुढील काळातही ला निनामुळे सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होणे अपेक्षित आहे.  

कोकण 
आज सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे जिल्ह्यांत ४५ मि.मी., तर रत्नागिरी जिल्ह्यात ७४ मि.मी. म्हणजेच अतिवृष्टीची शक्‍यता आहे. उद्या सिंधुदुर्ग, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३० मि.मी., तर रत्नागिरी जिल्ह्यात ६० मि.मी. पावसाची शक्‍यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून व रायगड जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. ताशी वेग रायगड व ठाणे जिल्ह्यात ३ कि.मी., तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ५ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर ठाणे व रायगड जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९६ टक्के, तर दुपारची ७० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र 
आज नाशिक व धुळे जिल्ह्यांत ४६ मि.मी., नंदूरबार जिल्ह्यात ५५ मि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ३७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या नंदूरबार जिल्ह्यात ८० मि.मी., नाशिक व जळगाव जिल्ह्यांत २५ ते ३० मि.मी., तर धुळे जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील. ताशी वेग ५ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६५ टक्के राहील.

मराठवाडा 
आज उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी जिल्ह्यांत १८ मि.मी., जालना जिल्ह्यात २१ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १३ मि.मी., तर नांदेड जिल्ह्यात ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांत २६ ते ३० मि.मी. तर बीड, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १५ ते २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ती नैर्ऋत्येकडून राहील. ताशी वेग ६ ते ११ कि.मी. राहील. कमाल तापमान बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर, नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान लातूर व औरंगाबाद जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० ते ७० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
आज अमरावती जिल्ह्यात ४६ मि.मी., वाशीम जिल्ह्यात १६ मि.मी., बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या अमरावती, बुलडाणा जिल्ह्यांत २२ ते २९ मि.मी. तर अकोला, वाशीम जिल्ह्यात ५ ते ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.

मध्य विदर्भ 
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत आज आणि उद्या २२ ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७४ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
आज भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १५ मि.मी., चंद्रपूर जिल्ह्यात २५ मि.मी. तर गडचिरोली जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या भंडारा जिल्ह्यात १७ मि.मी., गोंदिया जिल्ह्यात २७ मि.मी., तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात २३ ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान २३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
आज पुणे जिल्ह्यात ७५ मि.मी., सातारा जिल्ह्यात ७० मि.मी., सांगली जिल्ह्यात ६२ मि.मी., नगर व कोल्हापूर जिल्ह्यांत ४० मि.मी., तर सोलापूर जिल्ह्यात १९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या सांगली व सातारा जिल्ह्यांत ६० मि.मी., तर कोल्हापूर, नगर व पुणे जिल्ह्यांत ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सोलापूर जिल्ह्यात ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९६ टक्के, तर दुपारची ६० टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • द्राक्ष पिकाची ऑक्‍टोबर छाटणी १५ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी.
  • हरभरा पेरणीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. पेरणी १५ ऑक्‍टोबरपर्यंत पूर्ण करावी.
  • फळझाडांना योग्य प्रमाणात शेणखत, रासायनिक खते झाडांभोवती गोलाकार चर खोदून द्यावीत. नंतर चर मातीने बुजवून पाणी द्यावे.

 


इतर कृषी सल्ला
शेतकरी नियोजन : पीक सीताफळशेतकरीः विलास तात्याबा काळे गावः सोनोरी, ता...
पीक पैदासकार, शेतकऱ्यांचे हित जपणारा...शेतकऱ्यांनी त्यांच्या वैविध्यपूर्ण वाणांची...
शेतकरी नियोजन : पीक हरभराआमची एकत्रित कुटुंबाची ८५ एकर शेती असून, त्यातील...
राजस्थानातील तीव्र वातावरणात बदलाची भर!राजस्थानमधील हवामान मुळातच तीव्रतेच्या टोकावर आहे...
जमिनीची क्षारता थांबवून वाढवा सुपीकताजमिनीची सुपीकता जपण्यासाठी पीक लागवड रुंद वरंबा...
थंडीत वाढ शक्यमहाराष्ट्रावरील हवेचे दाब आज आणि उद्या १०१२...
‘फूल’ बनवणारं मलेशियन फूलमलेशिया हा बेटांचा देश. मलेशियात उष्ण कटिबंधीय...
शेतकरी कंपन्यांना केळी पिकात...शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना एका विशिष्ट...
कांदा बीजोत्पादनाचे शास्त्रीय तंत्रकांदा बीजोत्पादनासाठी मातृकांद्याची निवड...
शेतकरी नियोजन : पीक काजूशेतकरी : सुशांत मोहन नाईक गाव :  ...
कोरडवाहूमध्ये कवठ लागवड फायदेशीरमजबूत मूळ प्रणालीमुळे कवठाचे झाड दुष्काळ सहन...
बदलत्या वातावरणात द्राक्ष बागेचे...पावसामुळे बागेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढलेले आहे....
भारतातील प्राचीन गहू जातींचा शोध...भारतीय उपखंडात शेतीचा विकास आणि प्रसार यांचा एक...
शेतकरी नियोजन : रेशीमशेतीशेतकरीः राधेश्याम खुडे गावः बोरगव्हाण, ता.पाथरी...
कृषी सल्ला (कोकण विभाग)पालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-...
शेतकरी नियोजन- पीक डाळिंबमी डाळिंबामध्ये प्रामुख्याने हस्त बहर धरतो....
तीन शेतकरी... तीन दिशागुजरातमधील शेतकरीही धडाडीचे... आलेल्या संकटाशी...
राज्यात थंडी वाढण्यास अनुकूल हवामानमहाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२ हेप्टापास्कल, तर...
उशिरा गहू लागवडीचे तंत्र...बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (...
तेलाचं ‘पामर’ जंगलनैसर्गिक जंगलातील जैवविविधतेचा बळी देत हजारो...