agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Agrowon

मॉन्सून परतीचा प्रवास सुरूच...

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 10 ऑक्टोबर 2021

मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत मॉन्सूनचा जोर कमी होत आहे. त्यानुसार कोकणातील काही भागांत विस्तृत स्वरूपात, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता राहील. बुधवार (ता.१३) पासून मराठवाडा, विदर्भात पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे.
 

मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत मॉन्सूनचा जोर कमी होत आहे. त्यानुसार कोकणातील काही भागांत विस्तृत स्वरूपात, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता राहील. बुधवार (ता.१३) पासून मराठवाडा, विदर्भात पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे.

राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाना, जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश या भागातून मॉन्सून परतला असून, त्याचा परतीचा प्रवास वेगाने सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील काही भागांत मॉन्सूनचा जोर कमी होत आहे. त्यानुसार कोकणातील काही भागांत विस्तृत स्वरूपात, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता राहील. बुधवार (ता.१३) पासून मराठवाडा, विदर्भात पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरावर १००४ हेप्टापास्कल, तर अरबी समुद्र आणि महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. यामुळे महाराष्ट्राच्या पूर्व भागातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरूच राहील. मात्र वारे पूर्णपणे परतण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागेल.

सध्या मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र व दक्षिण भारतावर हवेचा दाब समान आहे. शुक्रवार (ता. १५) रोजी बंगालच्या उपसागरावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके कमी होऊन शनिवार (ता.१६) रोजी हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होईल. रविवार (ता. १७) रोजी दक्षिण भारतातील हवेचे दाब आणखी कमी होतील. त्या वेळी मॉन्सूनचा परतीचा प्रवास वेगाने सुरू होईल. सोमवार (ता. १८) रोजी बंगालच्या उपसागरात लहान चक्रीवादळाची निर्मिती होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ मंगळवार (ता. १९) पश्‍चिम बंगालच्या किनारपट्टीजवळ धडकेल.

कोकण 
आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ४० मि.मी., तर रायगड जिल्ह्यात ३० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६२ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात ४० मि.मी. आणि ठाणे व रायगड जिल्ह्यात ३२ ते ३५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३ ते ४ कि.मी. तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के, तर दुपारची ७६ टक्के.

उत्तर महाराष्ट्र 
आज नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ६५ ते ८२ मि.मी. पावसासह अतिवृष्टीची शक्‍यता आहे. जळगाव जिल्ह्यात ३१ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या नाशिक जिल्ह्यात २५ मि.मी. तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैर्ऋत्येकडून राहील. जळगाव जिल्ह्यात ती आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७७ टक्के, तर दुपारची ५० टक्के राहील.

मराठवाडा 
आज बीड जिल्ह्यात ५१ मि.मी, तर उस्मानाबाद, लातूर व परभणी जिल्ह्यांत ४५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. नांदेड, जालना व हिंगोली जिल्ह्यांत २८ ते ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड जिल्ह्यांत ३१ ते ३८ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात ५ मि.मी. जालना जिल्ह्यात १७ मि.मी., परभणी जिल्ह्यात २६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यांत आग्नेयेकडून, तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद जिल्ह्यात १० कि.मी. तर उर्वरित लातूर, नांदेड, बीड, परभणी, औरंगाबाद, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६६ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
आज बुलडाणा जिल्ह्यात ३१ मि.मी., वाशीम जिल्ह्यात २१ मि.मी., अकोला जिल्ह्यात १० मि.मी. आणि अमरावती जिल्ह्यात १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या अकोला, बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील.

मध्य विदर्भ 
आज यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १० ते १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या यवतमाळ जिल्ह्यात ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून आणि ताशी वेग ३ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७२ ते ८० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
आज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २७ ते २९ मि.मी., तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ४ ते ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या गडचिरोली जिल्ह्यात ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग २ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ७२ ते ७४ टक्के, तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत ८१ ते ८२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५२ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
आज नगर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ४१ ते ४७ मि.मी. तर कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत २६ ते २९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १० कि.मी. राहील. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ८८ टक्के, तर दुपारची ६३ ते ७६ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • पावसाची शक्यता लक्षात घेऊन उडीद, सोयाबीन, खरीप ज्वारी, बाजरी इ. पिकांची काढणी व मळणीची कामे उरकून घ्यावीत.
  • रब्बी हरभरा, ज्वारी, जवस, करडई इ. पिकांच्या पेरण्या उरकून घ्याव्यात.
  • भुईमूग उत्पादन वाढीसाठी गादी वाफ्याचा वापर करून त्यावर प्लॅस्टिक आच्छादन तंत्राचा वापर करावा.

 


इतर कृषी सल्ला
उशिरा गहू लागवडीचे तंत्र...बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (...
तेलाचं ‘पामर’ जंगलनैसर्गिक जंगलातील जैवविविधतेचा बळी देत हजारो...
द्राक्ष बागेतील घडकूज, मणीगळीवर...सध्या बागेतील वातावरणातील बिघाडामुळे...
शेतकरी उत्पादक कंपन्यांकरिता केळी...शासन मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये राहते, परंतु...
शेतकरी नियोजन पीक : संत्राशेतकरी नाव ः ऋषिकेश सोनटक्‍के गाव ः टाकरखेडा...
शंखी गोगलगायींचे नियंत्रण शंखी गोगलगायी ही बहुभक्षी कीड रात्रीच्या...
शेतकरी नियोजनः शेळीपालनशेळीपालनास सुरवात करण्यापूर्वी शेळ्यांच्या विविध...
थंडीचा पिकावरील परिणाम कमी करणारे उपायसध्या हिवाळा सुरू असला तरी ढगाळ वातावरणामुळे...
यशाला आवश्यक पैलू पाडणारे गुजरातगुजरात हे भारताच्या प. किनारपट्टीवरील...
थंडीमध्ये घ्या केळी बागांची काळजीहिवाळ्यामध्ये डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात...
आठवड्याच्या सुरुवातीस पाऊस, नंतर थंडीत...हिवाळी हंगामात पाऊस होण्यामुळे आणि ढगाळ हवामान...
करडईमध्ये आंतरमशागत महत्त्वाची...पेरणीनंतर तिसऱ्या आठवड्यात पहिली कोळपणी फटीच्या...
व्हर्जीन कोकोनट ऑइलनिर्मिती तंत्रव्हर्जीन कोकोनट तेल हे नैसर्गिक सर्वश्रेष्ठ...
द्राक्ष बागेत रोगांचा प्रादुर्भाव कमी...सध्या द्राक्ष लागवडीखालील क्षेत्रामध्ये कमी-अधिक...
द्राक्ष बागेत अन्नद्रव्ये कमतरतेची...दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी द्राक्ष वेलीत...
शेतकरी नियोजन - कुक्कुटपालननाव : शत्रुघ्न नामदेव जाधव गाव : विटा...
शेतकरी नियोजन - पीक केळीएप्रिल व मे महिन्यातील केळी लागवडीमध्ये निसवण...
अन्नपदार्थांतील पोषण विरोधी घटक परिणाम...अन्नपदार्थात जसे पोषक घटक असतात. त्याप्रमाणे पोषण...
सूत्रकृमीचा प्रादुर्भाव जाणून त्वरित...विविध पिकांवर सूत्रकृमीच्या प्रादुर्भावामुळे वाढ...
वनशास्त्रातील शिक्षण, व्यावसायिक संधी वने ही जैवविविधतेचे आगर आहेत. हे लक्षात घेता बी....