राज्यभरात थंडीची चाहूल...

गुरूवार आणि शुक्रवार (ता.४, ५) रोजी महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. यावरून थंडी सुरू झाल्याची जाणीव होईल. पहाटेपासून सकाळी ८ पर्यंत किमान तापमानात घट होऊन अल्पशा प्रमाणात थंडी जाणवेल.
weekly weather
weekly weather

गुरूवार आणि शुक्रवार (ता.४, ५) रोजी महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. यावरून थंडी सुरू झाल्याची जाणीव होईल. पहाटेपासून सकाळी ८ पर्यंत किमान तापमानात घट होऊन अल्पशा प्रमाणात थंडी जाणवेल. महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात सातत्याने बदल होत आहेत. महाराष्ट्राच्या उत्तर भागावर १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल, तर दक्षिण भागावर अद्याप १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. गुरूवार आणि शुक्रवार (ता.४, ५) रोजी महाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. यावरून थंडी सुरू झाल्याची जाणीव होईल. पहाटेपासून सकाळी ८ पर्यंत किमान तापमानात घट होऊन अल्पशा प्रमाणात थंडी जाणवेल. संपूर्ण हिंदी महासागर, दक्षिण अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र गुरूवार (ता. ४) पर्यंत कायम राहील. त्यामुळे सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील भागात ढग जमून अल्पशा पावसाची शक्‍यता राहील. शुक्रवार ते गुरूवार (ता.५ ते ११) या कालावधीत सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यातील काही भागांत जोराचा पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण  आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ मि.मी., तर उद्या २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस व किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८१ टक्के, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ६२ ते ७२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५० टक्के रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ३७ ते ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६ ते ८ कि.मी. तर रत्नागिरी, रायगड आणि ठाणे जिल्ह्यांत ताशी १० ते ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  कमाल तापमान जळगाव जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान जळगाव जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर नंदूरबार व नाशिक जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ४६ टक्के, तर दुपारची १८ ते ३२ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. धुळे, जळगाव जिल्ह्यांत ती आग्नेय व ईशान्येकडून राहील. मराठवाडा  जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. लातूर व नांदेड जिल्ह्यांत ते ३२ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, नांदेड व बीड जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर परभणी, औरंगाबाद जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस राहील. हिंगोली व जालना जिल्ह्यांत ते १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्ह्यात ७० टक्के, उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ६१ ते ६५ टक्के, तर बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५२ ते ५८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी.आणि दिशा ईशान्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५ ते १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. दुपारचे हवामान कोरडे राहील. सकाळी थंडी जाणवेल. मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, नागपूर जिल्ह्यात १६ अंश सेल्सिअस, तर वर्धा जिल्ह्यात १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा जिल्ह्यात ५६ टक्के, तर उर्वरित गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत ६० ते ६७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता गोंदिया जिल्ह्यात २७ टक्के, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३३ ते ३७ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात ४२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ६ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात आज ९ मि.मी. आणि उद्या २२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २४ ते २५ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. नगर जिल्ह्यात ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८१ टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ६७ टक्के, तर सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यांत ५४ ते ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३९ ते ५२ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. कृषी सल्ला 

  • पूर्वहंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
  • पुरेसा ओलावा असलेल्या जमिनीत जवस पेरणीची कामे पूर्ण करावीत.
  • भाताचे हळवे व निमगरवे वाण परिपक्व झाले असल्यास कापणी व झोडणी करावी.
  • कपाशीची वेचणी सकाळच्या वेळी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com