ढगाळ हवामान; थंडीवर परिणाम

येत्या दोन दिवसांत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र तसेचगडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून त्याचा थंडीवर परिणाम जाणवेल.
weekly weather
weekly weather

येत्या दोन दिवसांत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून त्याचा थंडीवर परिणाम जाणवेल. अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. हिंदी महासागरावर ढगांचा मोठा समूह जमा झाला आहे. अरबी समुद्रात १००६ हेप्टापास्कल इतक्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरातही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीवृता वाढणार आहे. बंगालचे उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र चेन्नई, तमिळनाडूकडे सरकेल व तेथे जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल. शुक्रवार (ता.१२) रोजी संपूर्ण अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. आणि हवामान बदल जाणवतील. त्याचा प्रभाव पश्‍चिम किनारपट्टी भागात जाणवेल. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून पावसाची शक्यता राहील. येत्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ९ मि.मी, सातारा जिल्ह्यात ८ मि.मी, सोलापूर जिल्ह्यात १६ मि.मी व पुणे जिल्ह्यात ६ मि.मी पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत १७ मि.मी पावसाची शक्यता असून महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून त्याचा थंडीवर परिणाम जाणवेल. कोकण  वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर व ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ९० टक्के, रायगड जिल्ह्यात ८० टक्के आणि पालघर, ठाणे जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५७ टक्के राहील. तर दुपारची २८ ते ३५ टक्के राहील. मराठवाडा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि. मी. राहील. नांदेड, परभणी, हिंगोली, व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान लातूर आणि जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर बीड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात ८० टक्के तर नांदेड व बीड जिल्ह्यात ६२ ते ७० टक्के, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ५४ ते ५८ टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. ​किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १९ ते २० अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३२ ते ३४ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ती २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  वाऱ्याची दिशा पुणे व नगर जिल्ह्यात आग्नेयेकडून तर उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३९ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकारा अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात ९० ते ९५ टक्के तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ८० ते ८६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ताशी ७ किमी राहील. कृषी सल्ला 

  • मोहरी, हरभरा, बागायती गहू आणि ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
  • पूर्व हंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
  • पेरणीनंतर पीक २० ते २५ दिवसांचे होताच कोळपणी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com