agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchadra sabale | Page 2 ||| Agrowon

ढगाळ हवामान; थंडीवर परिणाम

डॉ. रामचंद्र साबळे
मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021

येत्या दोन दिवसांत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून त्याचा थंडीवर परिणाम जाणवेल.

येत्या दोन दिवसांत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र तसेच गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून त्याचा थंडीवर परिणाम जाणवेल.

अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. हिंदी महासागरावर ढगांचा मोठा समूह जमा झाला आहे. अरबी समुद्रात १००६ हेप्टापास्कल इतक्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरातही हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्याची तीवृता वाढणार आहे. बंगालचे उपसागरातील हवेचे कमी दाबाचे क्षेत्र चेन्नई, तमिळनाडूकडे सरकेल व तेथे जोरदार पावसाची शक्यता निर्माण होईल.

शुक्रवार (ता.१२) रोजी संपूर्ण अरबी समुद्र, हिंदी महासागर व बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. आणि हवामान बदल जाणवतील. त्याचा प्रभाव पश्‍चिम किनारपट्टी भागात जाणवेल. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून पावसाची शक्यता राहील. येत्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ९ मि.मी, सातारा जिल्ह्यात ८ मि.मी, सोलापूर जिल्ह्यात १६ मि.मी व पुणे जिल्ह्यात ६ मि.मी पावसाची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत १७ मि.मी पावसाची शक्यता असून महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हवामान ढगाळ राहून त्याचा थंडीवर परिणाम जाणवेल.

कोकण 
वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान पालघर, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पालघर व ठाणे जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ९० टक्के, रायगड जिल्ह्यात ८० टक्के आणि पालघर, ठाणे जिल्ह्यात ७० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४९ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र 
वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५७ टक्के राहील. तर दुपारची २८ ते ३५ टक्के राहील.

मराठवाडा
मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि. मी. राहील. नांदेड, परभणी, हिंगोली, व औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान लातूर आणि जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर बीड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर हिंगोली, जालना, औरंगाबाद जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात ८० टक्के तर नांदेड व बीड जिल्ह्यात ६२ ते ७० टक्के, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ५४ ते ५८ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ 
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर वाशीम व अमरावती जिल्ह्यात ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. ​किमान तापमान यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. दुपारी हवामान कोरडे राहील.

पूर्व विदर्भ 
कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १९ ते २० अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ६३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३२ ते ३४ टक्के राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ती २४ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
वाऱ्याची दिशा पुणे व नगर जिल्ह्यात आग्नेयेकडून तर उर्वरित कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३९ ते ३२ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकारा अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात ९० ते ९५ टक्के तर सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात ८० ते ८६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ताशी ७ किमी राहील.

कृषी सल्ला 

  • मोहरी, हरभरा, बागायती गहू आणि ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
  • पूर्व हंगामी उसाची लागवड १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
  • पेरणीनंतर पीक २० ते २५ दिवसांचे होताच कोळपणी करावी.

 


इतर कृषी सल्ला
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यतामहाराष्ट्रावरील हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके...
जाणून घ्या उसाला तुरा येण्याची कारणे रात्रीचे आणि दिवसाचे तापमान, हवेतील आद्रता,...
बटाटा घाऊक संकलन अन्‌ विक्री शेतकरी उत्पादक कंपनीने बटाटा ...
हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक...हरभऱ्यावरील घाटे अळीचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी...
शेतकरी नियोजनः पीक हरभराआमचे दरवर्षी सुमारे ४० ते ४५ एकरांवर हरभरा...
बटाटा मूल्यसाखळीतील विविध टप्पे..बटाटा बेणे ते बाजारपेठ असा प्रवास गृहीत धरला तर...
मिरची पिकावर नव्या फुलकिडीचा प्रादुर्भावमिरची पिकामध्ये रस शोषक किडीमध्ये महत्त्वाची कीड...
अंजीर पिकातील तांबेरा नियंत्रणअंजीर फळ पिकावर अन्य फळझाडांच्या तुलनेत कमी...
उन्हाळी मूग लागवडीचे तंत्रमुगाच्या वैभव आणि बी.पी.एम.आर.१४५ या जाती...
नारळ पिकावर बोंडर नेस्टिंग पांढरी...डिसेंबर २०११ मध्ये फ्लोरिडा विद्यापीठातील ...
द्राक्ष बागेतील भुरी रोगाची लक्षणे अन्...या वर्षी सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे बागेत एकाच...