राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्‍यता

आज अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीसह कर्नाटक किनारपट्टीवर १००६ हेप्टापास्कल इतक्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच आजपासून पश्‍चिम किनारपट्टीच्या भागातही पावसास सुरुवात होईल. त्याचा प्रभाव अधिक असल्याने दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे.
weekly weather
weekly weather

आज अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीसह कर्नाटक किनारपट्टीवर १००६ हेप्टापास्कल इतक्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच आजपासून पश्‍चिम किनारपट्टीच्या भागातही पावसास सुरुवात होईल. त्याचा प्रभाव अधिक असल्याने दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. कोकण, मराठवाडा, मध्य व पूर्व विदर्भ तसेच पश्‍चिम, दक्षिण, मध्य महाराष्ट्रात शुक्रवार (ता. १९) पर्यंत पावसाची शक्‍यता आहे. बंगालच्या उपसागराच्या पूर्व-दक्षिण भागात आजपासून चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. उद्या बंगालच्या उपसागराच्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन चक्रीच वादळाची निर्मिती होण्यास प्रारंभ होईल. हे वादळ मंगळवार (ता.१६) रोजी उत्तर-पश्‍चिम दिशेने वेगाने सरकेल आणि बुधवार (ता. १७) रोजी आंध्रच्या किनारपट्टीस धडकेल. वादळ गुरुवारी (ता. १७) पूर्व विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागात प्रवेश करेल. आज अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीसह कर्नाटक किनारपट्टीवर १००६ हेप्टापास्कल इतक्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच आजपासून पश्‍चिम किनारपट्टीच्या भागातही पावसास सुरुवात होईल. त्याचा प्रभाव अधिक असल्याने दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे. हिंदी महासागरावरही ढगांची दाटी झाली असून, त्याचा प्रभाव दक्षिणेकडील राज्यांवर होईल. एकूणच हिवाळ्यात पावसाळा अशी स्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम थंडीवर होईल. सौम्य थंडी जाणवेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा वेग साधारणच राहील. कोकण  आज सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५२ मि.मी., तर उद्या ४० ते ६४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. रायगड जिल्ह्यात आज ११ मि.मी., तर उद्या ५१ मि.मी., ठाणे जिल्ह्यात १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता पालघर व ठाणे जिल्ह्यात ४४ टक्के, तर रायगड जिल्ह्यात ५७ टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ७५ टक्के, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ५१ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस इतके कमी राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १७ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ८ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. मराठवाडा  आज नांदेड व बीड जिल्ह्यांत १० ते ११ मि.मी., लातूर जिल्ह्यात ९ मि.मी., उस्मानाबाद जिल्ह्यात ५ मि.मी., परभणी जिल्ह्यात ६ मि.मी., तर हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत ३२ मि.मी., नांदेड व बीड जिल्ह्यांत २५ ते २६ मि.मी., परभणी जिल्ह्यात १५ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात ९ मि.मी. तर जालना जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत ८३ ते ८९ टक्के, नांदेड व बीड जिल्ह्यांत ७० ते ८४ टक्के, परभणी जिल्ह्यात ६५ टक्के, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ५२ ते ५८ टक्के, तर औरंगाबाद जिल्ह्यात ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ४८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २३ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. दुपारी हवामान कोरडे राहील. मध्य विदर्भ  कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ६० टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४३ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. या सर्व जिल्ह्यांत आज ७ ते ९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. पूर्व विदर्भ  आज चंद्रपूर जिल्ह्यात १३ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २१ मि.मी., तर उद्या ३० ते ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज ७ ते १३ मि.मी, तर उद्या ५ ते १५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ ते ५४ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत १५ ते ३० मि.मी. तर उद्या २६ ते ६४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ९ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ८७ टक्के, तर दुपारची २७ ते ५१ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • कोकणात भात कापणी व मळणीनंतर वालाची पेरणी करावी.
  • रब्बी ज्वारी, गहू, मोहरी, हरभरा या पिकांच्या पेरण्या करून सारे व पाट पाडावेत.
  • तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी वेळीच उपाययोजना कराव्यात.
  • फळभाज्या आणि फुलपिकांच्या लागवडीसाठी रोपवाटिका तयार कराव्यात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com