agricultural news in marathi weekly weather by Dr. ramchandra sabale | Agrowon

आठवड्याच्या सुरुवातीस पाऊस, नंतर थंडीत वाढ शक्य

डॉ. रामचंद्र साबळे
रविवार, 21 नोव्हेंबर 2021

हिवाळी हंगामात पाऊस होण्यामुळे आणि ढगाळ हवामान राहण्यामुळे त्याचा विपरीत परिणाम थंडीवर होत आहे. उत्तर महाराष्ट्रातही वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होणे शक्‍य आहे.
 

हिवाळी हंगामात पाऊस होण्यामुळे आणि ढगाळ हवामान राहण्यामुळे त्याचा विपरीत परिणाम थंडीवर होत आहे. उत्तर महाराष्ट्रातही वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होणे शक्‍य आहे.

आजपासून बुधवार (ता. २४)पर्यंत महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके राहण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र कायम राहण्यामुळे महाराष्ट्रात आजपासून बुधवार (ता.२४)पर्यंत पावसाची शक्‍यता कायम आहे. मात्र गुरुवार (ता.२५)पासून हवेच्या दाबात वाढ होऊन तेथून पुढे थंडीच्या प्रमाणात वाढ होईल. थंडीच्या प्रमाणात झालेली वाढ शनिवार (ता.२७)पर्यंत कायम राहील. वाऱ्याची दिशा सुरुवातीच्या काळात आग्नेयेकडून राहील. त्यामुळे तापमानात फारसा फरक जाणवणार नाही. राज्यातील हवामान ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील.

या आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्‍यता कायम राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही ठिकाणी हवेचे दाब कमी होताच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्‍यता राहील. विदर्भात वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीचे प्रमाण जाणवेल. हवेच्या दाबात वाढ होताच थंडीच्या प्रमाणात वाढ होते. हिवाळी हंगामात पाऊस होण्यामुळे आणि ढगाळ हवामान राहण्यामुळे त्याचा विपरीत परिणाम थंडीवर होत आहे. उत्तर महाराष्ट्रातही वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होणे शक्‍य आहे.

कोकण 
आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ५० मि.मी. तर उद्या ४० मि.मी. पावसाची शक्यता राहील. पालघर व ठाणे जिल्ह्यांत आज ३५ मि.मी., तर उद्या ३४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस, तर पालघर, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ७२ टक्के इतकी राहील.

उत्तर महाराष्ट्र 
आज नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत ३५ मि.मी., जळगाव जिल्ह्यात ७ मि.मी, तर उद्या सर्वच जिल्ह्यांत ३५ ते ४० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीचे प्रमाण कायम राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ९३ टक्के, तर दुपारची ५० टक्के राहील.

मराठवाडा 
आज बीड जिल्ह्यात ४० मि.मी., उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १४ ते १६ मि.मी., तर नांदेड व जालना जिल्ह्यांत ६ ते ११ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. आज आणि उद्या औरंगाबाद जिल्ह्यात पावसाची शक्‍यता कमी आहे. मात्र हवामान ढगाळ राहील. उद्या जालना जिल्ह्यात ४० मि.मी. तर उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात ३० मि.मी. तर लातूर व परभणी जिल्ह्यात २० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. हिंगोली व नांदेड जिल्ह्यात १० ते १७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ८ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के राहील. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहण्यामुळे पावसाची शक्‍यता कमी आहे.

पूर्व विदर्भ 
आज अकोला व अमरावती जिल्ह्यात १८ ते १९ मि.मी., तर बुलडाणा जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १० ते २४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्य व आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची ५३ ते ५८ टक्के राहील.

मध्य विदर्भ
अकोला व अमरावती जिल्ह्यात आज १८ ते १९ मि.मी., तर बुलडाणा जिल्ह्यात ७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या बुलडाणा, अकोला, अमरावती व वाशीम जिल्ह्यांत १० ते २३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० कि.मी. आणि दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस व किमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील.

पूर्व विदर्भ 
आज चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात १४ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात १८ मि.मी. तर गोंदिया जिल्ह्यात ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या चंद्रपूर जिल्ह्यात १९ मि.मी., गडचिरोली जिल्ह्यात २१ मि.मी, तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ९ ते १० मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५८ टक्के राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र 
आज कोल्हापूर जिल्ह्यात ६० मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यांत ५१ मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ३५ मि.मी., पुणे जिल्ह्यात ४३ मि.मी. व नगर जिल्ह्यात २७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ४३ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यांत ३४ मि.मी., सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३० मि.मी. तर पुणे जिल्ह्यात ४३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग १० ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ७२ टक्के राहील.

कृषी सल्ला 

  • वातावरण बदलामुळे पिकांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पिकाचे सातत्याने निरीक्षण करून नियंत्रणासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करावा.
  • बागायती गहू लागवडीसाठी शिफारशीत जातींची निवड करावी.
  •  रब्बी पिकांची आंतरमशागत, कोळपणी व खुरपणीची कामे वेळेत पूर्ण करावीत.

 


इतर कृषी सल्ला
उन्हाळी कांदा पिकातील अन्नद्रव्य...रब्बी (उन्हाळी) कांद्याची लागवड साधारणतः...
शेतकरी नियोजन पीक : केसर आंबाशेतकरी : तय्यब हुसेन दारूवाला गाव : ...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
शेतकरी नियोजन पीक : गहू दरवर्षी सेंद्रिय पद्धतीने १० एकर तर...
शेवगा पिकावरील कीड-रोगाचे व्यवस्थापनशेवगा हे पीक तुलनेने काटक असल्याने कीड व रोगांचा...
कमाल अन् किमान तापमानात वाढ शक्‍यमहाराष्ट्रावरील हवेच्या दाबात १०१४...
केवायसी : ओळख खातेदाराची...बॅंकेमध्ये खाते उघडण्यापासूनच आपल्याला ‘केवायसी’...
घरगुती स्तरावर शेंगदाण्यातील...अफ्लाटॉक्सिन या विषारी घटकामुळे शेंगदाण्याला...
कोरडवाहू क्षेत्रात किफायतशीर पीक शेवगाशेवग्या सर्व प्रकारचे हवामान मानवते. शेवग्याची...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बजमिनीतील सेंद्रिय कर्ब हा सुपीकतेचा गाभा आहे....
बटाटा पिकातील मूल्यवर्धन...शेतकरी उत्पादक कंपनीची आर्थिक परिस्थिती, खेळते...
नारळावरील रूगोज चक्राकार पांढरी माशीचे...​रूगोज चक्राकार पांढरी माशी ही बहुभक्षी कीड असून...
थंडीचा केळी बागेवर होणारा परिणाम अन्...राज्यातील केळी लागवड क्षेत्रामध्ये तापमान कमी...
शेतकरी नियोजन पीक : सीताफळशेतकरी ः निखिल तानाजी गायकवाड गाव ः वडकी, ता....
सुधारित बायोगॅसमुळे इंधन अन् खताची...सामान्य रचना असलेल्या संयंत्राच्या तुलनेत ताज्या...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या व फुलोरा...
द्राक्ष घडांना पेपर लावताना घ्यावयाची...साधारणपणे द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्यास...
झारखंड : लढा गरिबीसोबतच अनियमित पावसाशी...भारतीय संघराज्यातील २८ पैकी सर्वांत गरीब अशी ओळख...
कृषी सल्ला (कापूस, रब्बी ज्वारी,...कापूस कापसाची फरदड (खोडवा) घेणे टाळावे....
उसातील तुरा टाळण्यासाठी उपाययोजनाउसाला तुरा आल्यानंतर वाढ पूर्णपणे थांबते. पांगशा...