राज्यात थंडी वाढण्यास अनुकूल हवामान

महाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२ हेप्टापास्कल, तर दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीत अल्पशी वाढ होईल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीत वाढ होण्यास हवामान घटक अनुकूल बनतील.
weekly weather
weekly weather

महाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२ हेप्टापास्कल, तर दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीत अल्पशी वाढ होईल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीत वाढ होण्यास हवामान घटक अनुकूल बनतील. महाराष्ट्राच्या उत्तरेस १०१२ हेप्टापास्कल, तर दक्षिणेस १०१० हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे थंडीत अल्पशी वाढ होईल. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीत वाढ होण्यास हवामान घटक अनुकूल बनतील. बुधवार (ता.१ डिसेंबर)पर्यंत हिंदी महासागरावर ढगांची दाटी कायम राहील. तसेच दिनांक ३० नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे कायम राहतील. त्यानुसार अरबी समुद्रावर व बंगालच्या उपसागरावर चक्राकार वारे वाहतील. हवेच्या कमी दाबाची क्षेत्रे निर्माण होतील, हे प्रकार सुरूच राहतील. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते. अरबी समुद्राच्या व बंगालच्या उपसागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंश सेल्सिअसने अधिक राहण्यामुळे असे प्रकार अधूनमधून पाहायला मिळतील. याशिवाय प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान १ ते २ अंश सेल्सिअसने कमी राहण्यामुळे तिकडे हवेचे दाब सरासरीपेक्षा अधिक राहतील. त्यामुळे वारे मोठ्या प्रमाणावर दक्षिण भारतावर आर्द्रता वाहून आणतील. त्यातून ढगनिर्मिती होऊन हवेचे दाब कमी होताच पाऊस होईल. त्यामुळे हिंदी महासागरावरील वारे प्रशांत महासागराच्या बाजूला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे अशी स्थिती पाहायला मिळेल. या आठवड्यात हवामान ढगाळ राहील. शुक्रवार (ता.३ डिसेंबर) रोजी बंगालच्या उपसागरात लहान वादळ तयार होऊन ते कोलकता दिशेने वाटचाल करेल. मात्र, पावसाची शक्‍यता कमी राहील. कोकण  कमाल तापमान पालघर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, सिंधुदुर्ग, रत्नागिरी ३४ अंश सेल्सिअस तर ठाणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात २१ ते २२ अंश सेल्सिअस तर रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यात २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात ७० ते ७१ टक्के, तर पालघर, ठाणे जिल्ह्यात ५७ टक्के, रायगड जिल्ह्यात ६३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. या सर्व जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४४ ते ५४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते ३० टक्के राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. त्यामुळे तापमानात घसरण होणार नाही. मराठवाडा  कमाल तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर उस्मानाबाद, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड व परभणी जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस तर हिंगोली व जालना जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्‍यता आहे. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६१ टक्के तर उर्वरित नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत ५२ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २८ ते ३० टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे थंडीत वाढ होईल. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर अकोला व अमरावती जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५१ टक्के, तर दुपारची २९ टक्के राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. मध्य विदर्भ  कमाल तापमान यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस तर वर्धा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ५४ टक्के तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात ४४ ते ४५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात १९ ते २० अंश सेल्सिअस तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १६ ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ६१ ते ६६ टक्के तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५१ ते ५४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कमाल तापमान सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस तर सांगली व पुणे जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात ते ३४ अंश सेल्सिअस राहील. सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यात किमान तापमान १९ अंश सेल्सिअस तर सांगली जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५६ ते ७२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ४७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा पुणे व नगर जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर उर्वरित जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. कृषी सल्ला 

  • पाण्याच्या ५ पाळ्या देणे शक्‍य असलेल्या ठिकाणीच उशिरा गव्हाची बागायत पेरणी करावी. वाढीच्या अवस्थेनुसार दोन पाळ्यांमध्ये २१ दिवसांचे अंतर ठेवावे.
  •  कांदा रोपांची पुनर्लागवड पूर्ण करावी.
  • तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव पाहून वेळीच बंदोबस्त करावा.
  •  सूर्यफुलाची पेरणी करून सारे व पाट पाडावेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com