किमान तापमानात घट; थंडीत वाढ शक्‍य

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून ते सोमवार (ता.२४)पासून १०१२ हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्‍यता आहे. किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानातही घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात थंडीचा प्रभाव कायम राहील.
weekly weather
weekly weather

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होत असून ते सोमवार (ता.२४)पासून १०१२ हेप्टापास्कल इतके अधिक राहण्याची शक्‍यता आहे. किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होईल. तसेच कमाल तापमानातही घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात थंडीचा प्रभाव कायम राहील. कोकण, मराठवाडा, विदर्भ व पश्‍चिम महाराष्ट्रात आकाश अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. कोकणात अल्पशा पावसाची शक्‍यता निर्माण होईल. दुपारच्या सापेक्ष आर्द्रतेत घट होऊन हवामान थंड व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग पश्‍चिम विदर्भात १४ ते १५ किमी, तर नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत १६ ते १७ कि.मी. राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता अधिक राहण्यामुळे पहाटे व सकाळी मोठ्या प्रमाणात धुके राहील. हा आठवडा हवामानाच्या दृष्टीने थंड राहील. थंडीचा कालावधी फेब्रुवारी अखेरपर्यंत चालूच राहील. कोकण  आज कोकणात अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून आणि ताशी वेग ६ ते १३ कि.मी. राहील. कमाल तापमान रायगड व ठाणे जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत २८ ते ३० अंश सेल्सिअस, पालघर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस, तर ठाणे, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ ते ३७ टक्के, तर रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ४७ ते ५१ टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात आज अल्पशा पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १७ कि.मी. तर नंदूरबार जिल्ह्यात ताशी ११ कि.मी. राहील. कमाल तापमान नंदूरबार जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. नाशिक जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील. मराठवाडा  औरंगाबाद जिल्ह्यात आज ६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान औरंगाबाद जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस तर जालना, हिंगोली जिल्ह्यात २६ ते २७ अंश सेल्सिअस आणि नांदेड, परभणी जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. बीड जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. किमान तापमान औरंगाबाद जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ११ ते १२ अंश सेल्सिअस, तर उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद जिल्हा वगळता १५ ते २५ टक्के इतकी कमी राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १२ अंशांच्या जवळपास राहील. वाशीम जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ७६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १५ कि.मी. आणि दिशा वायव्येकडून राहील. मध्य विदर्भ  यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यांत १४ अंश सेल्सिअस, तर यवतमाळ जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. आणि दिशा नैर्ऋत्येकडून राहील. पूर्व विदर्भ  आज सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यात १४ ते १५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअस राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ८३ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ६३ ते ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २६ ते २८ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. आणि दिशा वायव्येकडून राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  कमाल तापमान कोल्हापूर पुणे व नगर जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३० ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान पुणे व नगर जिल्ह्यांत ११ अंश सेल्सिअस, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत १२ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत ते १४ ते १६ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, सांगली, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ७० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १४ ते २१ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १२ कि.मी. व दिशा नैर्ऋत्येकडून राहील. कृषी सल्ला 

  • गहू पिकाच्या संवेदनशील अवस्थेत पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
  • हरभरा पिकास फुलधारणा आणि घाटे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
  • उन्हाळी भुईमूग आणि सुरू उसाची लागवड १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com