जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
कडधान्ये
तूर पिकावरील कीड-रोगांचे वेळीच नियंत्रण आवश्यक
मुळकूज :
रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया
खोडकूज :
रोगकारक बुरशी : स्क्लेरोशियम रोल्फसाय
व्यवस्थापन :
मुळकूज :
रोगकारक बुरशी : रायझोक्टोनिया
खोडकूज :
रोगकारक बुरशी : स्क्लेरोशियम रोल्फसाय
व्यवस्थापन :
- शेतातील रोगट फांद्या,धसकटे इ. वेचून त्यांचा नायनाट करावा म्हणजे रोगाचा प्रसार टाळता येईल.
- खोडकूज रोगाचा प्रादुर्भाव व प्रसार टाळण्यासाठी शेतात पाणी साचलेले असल्यास चर खोदून पाणी ते शेताबाहेर काढण्याची व्यवस्था करावी.
- उभ्या पिकात दोन्ही रोगाच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे वापरावी.
मर :
रोगकारक बुरशी : फ्युजॅरियम
व्यवस्थापन :
रोपावस्थेत रोगाची लक्षणे आढळल्यास ट्रायकोडर्माची एकरी १ किलो भुकटी २०-२५ किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीद्वारे द्यावी.
खोडावरील करपा :
कोलेटोट्रीकम करपा :
रोगकारक बुरशी : कोलेटोट्रीकम डिमॅशियम
व्यवस्थापन :
प्रतिबंधक उपाय म्हणून शेतातील रोगट फांद्या व झाडे जाळून नष्ट करावीत. लेबल क्लेम शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
फायटोप्थोरा करपाः
रोगकारक बुरशी : फायटोप्थोरा ड्रेसलेरा
व्यवस्थापन :
- शेतात पाणी साचू देऊ नये. जास्त पाणी झाल्यास चर काढून ते बाहेर काढावे.
- या रोगाची रोपावस्थेत तीव्रता आढळल्यास शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.
कीड नियंत्रण : आगामी दोन महिन्यात तुरीवरील शेंगा पोखरणारी कीड, पिसारी पतंग, शेंगमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो.
एकात्मिक कीड व्यवस्थापन :
- पीक कळी व फुलोरा अवस्थेत असताना आठवड्यातून किमान १ वेळा हेक्टरी १२ ते २४ झाडांचे निरीक्षण करावे. शेतात प्रतिहेक्टरी ५ लिंगाकर्षण सापळे पिकाच्या १ फुट उंचीवर लावावेत. सापळ्यामध्ये सतत ३ दिवस जर नर पतंगाची संख्या ८ ते १० इतकी आढळली किंवा १ अळी प्रति झाड किंवा ५ टक्के कीडग्रस्त शेंगा दिसल्यास किडीचे व्यवस्थापन करावे.
- शेतात पक्षांना आकर्षित करण्यासाठी ३ ते ५ फूट लांबीचे १० ते ५० पक्षीथांबे प्रतिहेक्टरी उभारावेत. तुरीचे झाड वाकडे करून अळ्या खाली पाडाव्यात व नष्ट कराव्यात.
- फुलोऱ्याच्या सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम ५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रासायनिक नियंत्रण :
- एकाच कीटकनाशकाचा वारंवार वापर टाळावा. प्रत्येक फवारणीवेळी कीटकनाशकांची फेरपालट करावी. शिफारशीपेक्षा कोणत्याही घटकाची कीटकनाशकासोबत फवारणी करू नये.
- शिफारशीत कीटकनाशकांची पहिली फवारणी पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना व दुसरी १५ दिवसांनी करावी. गरज असल्यास तिसरी फवारणी करावी.
- पहिली फवारणी : प्रमाण प्रतिलिटर पाणी क्विनाॅलफाॅस (२५ टक्के ईसी) २ मि.लि. किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८५ ईसी) ०.७ मि.लि.
- दुसरी फवारणी : प्रतिलिटर पाणी इमामेक्टिन बेन्झोइट (५ टक्के एसजी) ०.४ ग्रॅम किंवा क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एससी) ०.२५ मि.लि.
- तिसरी फवारणी : प्रतिलिटर पाणी क्लोरअॅन्ट्रानिलिप्रोल ९.३ टक्के अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४.६ टक्के (मिश्र कीटकनाशक) ०.४ मि.लि.
संपर्क : डाॅ. ए. एन. पाटील, ९७६६१७०१९५
(कडधान्य संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)