मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
ताज्या घडामोडी
राज्यशास्त्राच्या उपघटकावरील प्रश्न अन् त्याचे विश्लेषण
लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन १ मधील ‘भारतीय संविधान व राज्यघटना’ म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती व अभ्यासक्रम पाहिला. आजच्या लेखात आपण राज्यशास्त्राच्या प्रत्येक उपघटकावर मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किती प्रश्न आले होते, हे जाणून घेऊ. तसेच त्याबाबतचे विश्लेषण, रणनीती व संदर्भग्रंथ यांची माहिती घेऊ.
उपघटकनिहाय मागील ५ वर्षांतील प्रश्नसंख्या
लेखमालेतील मागील भागात आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा सामान्य अध्ययन १ मधील ‘भारतीय संविधान व राज्यघटना’ म्हणजेच राज्यशास्त्र या विषयाची व्याप्ती व अभ्यासक्रम पाहिला. आजच्या लेखात आपण राज्यशास्त्राच्या प्रत्येक उपघटकावर मागील पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किती प्रश्न आले होते, हे जाणून घेऊ. तसेच त्याबाबतचे विश्लेषण, रणनीती व संदर्भग्रंथ यांची माहिती घेऊ.
उपघटकनिहाय मागील ५ वर्षांतील प्रश्नसंख्या
क्र. | उपघटक | २०१३ | २०१४ - | २०१५ | २०१६ | २०१७ | २०१८ |
१. | घटना निर्मिती व वैशिष्ट्ये | १ | ० | ४ | २ | ६ | ३ |
२. | मूलभूत हक्क/मार्गदर्शक तत्त्वे/मूलभूत कर्तव्ये | २ | २ | १ | १ | २ | १ |
३. | केंद्रशासन | २ | ४ | १ | ४ | ४ | २ |
४. | राज्यशासन | १ | १ | ० | १ | १ | १ |
५. | न्यायव्यवस्था | २ | ० | ० | ० | ० | २ |
६. | पंचायतराज | ३ | ० | ० | ० | १ | १ |
७. | आयोग, लवाद व समित्या | २ | १ | १ | ३ | १ | २ |
८. | घटनादुरुस्ती | ० | २ | ० | १ | ० | १ |
९. | समित्या | १ | १ | ० | १ | - | ० |
प्रश्न संख्यांचे विश्लेषण
वरील तक्त्याचे व्यवस्थित निरीक्षण केल्यास राज्यशास्त्रावर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेत जवळपास ११ ते १५ प्रश्न येत असल्याचे लक्षात येते.
- पहिल्याच उपघटकातील म्हणजेच घटनानिर्मिती व वैशिष्ट्ये यावर बऱ्याचदा जास्त प्रश्न विचारले जातात. विशेषतः घटनासमित्या, त्यांचे अध्यक्ष व सदस्य, घटनेचे स्त्रोत, भारतीय घटनेची वैशिष्ट्ये यावर प्रश्न विचारण्याकडे आयोगाचा जास्त कल असतो.
- नुकत्याच झालेल्या २०१८ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत जवळजवळ सर्वच उपघटकांना समाविष्ट केल्यामुळे प्रश्नांची संख्या समसमान वितरीत झालेली आढळते.
राज्यशास्त्राची रणनीती
- राज्यशास्त्राचा अभ्यास करताना सर्वप्रथम राज्यघटनेतील महत्वाचा तपशील म्हणजेच महत्वाची कलमे, सर्व परिशिष्टे इ. सोबत ठेवावे. राज्यघटनेला विविध भागांमध्ये विभाजित केलेले आहे. हे भाग नीट समजावून घेतल्यास त्यातील कलमांचे आपापसातील संबंध आपोआप लक्षात येतात.
- चालू राजकीय घडामोडींचा राज्यघटनेतील तरतुदींशी नेमका कसा संबंध असतो, याबद्दल उत्सुक असावे. उदा. लोकसभेच्या विविध प्रहरांमध्ये नेतेमंडळींकडून जे ठराव मांडले जातात, ते राज्यघटनेतील संबंधित तरतुदींशी पडताळून पाहणे.
- संविधानिक तसेच वैधानिक संस्था उदा. निवडणूक आयोग, वित्त आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग इ. चा अभ्यास करताना त्यातील महत्त्वाच्या नोंदी एखाद्या तक्त्याच्या स्वरूपात आपल्या नोट्स मध्ये ठेवाव्यात. उजळणी करताना सोपे जाते.
- घटनादुरुस्तीवर किमान एखादा प्रश्न हा अपेक्षित असतो, त्यामुळे महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, क्रमांक व विधेयकांचे क्रमांक यांची नोंद ठेवावी.
- पंचायतराज व्यवस्था हा सुद्धा एक महत्त्वाचा उपघटक ठरतो. त्यासंबंधित ७३ वी व ७४ वी घटनादुरुस्ती सखोल अभ्यासावी. तसेच स्वातंत्र्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास कसा होत गेला, याचाही नीट अभ्यास करावा.
- राज्यघटनेतील विविध अपवादांचा सखोल आढावा घ्यावा. अशा अपवादांना पकडूनच अनेक प्रश्न तयार केले जातात.
संदर्भग्रंथ :
- ८ वी ते १२ वी नागरिकशास्त्र किंवा राज्यशास्त्र विषयावरील - राज्य माध्यमिक मंडळाची पुस्तके / NCERT
- Indian Polity by M. Laxmikant
- आपले संविधान : सुभाष कश्यप
- राज्यघटना : पी. एम. बक्षी
ईमेल : admin@prithvi.net.in
- 1 of 587
- ››