गृहनिर्माण संस्था ग्राहक ते कृषिपर्यटन योजना

कृषी पर्यटन म्हणजे ग्रामीण भागातील शेती संस्कृतीचे प्रामुख्याने दर्शन घडविणे तसेच येथील शेतातील पिके, वातावरण, विशिष्ट कामे, ग्रामीण खेळ याचा अनुभव देण्याची सुविधा निर्माण करणे होय. ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. नवीन पर्यटन धोरणांतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन राबविण्याची संकल्पना समाविष्ट करण्यात आली.
Housing organization customer to agri-tourism scheme
Housing organization customer to agri-tourism scheme

कृषी पर्यटन म्हणजे ग्रामीण भागातील शेती संस्कृतीचे प्रामुख्याने दर्शन घडविणे तसेच येथील शेतातील पिके, वातावरण, विशिष्ट कामे, ग्रामीण खेळ याचा अनुभव देण्याची सुविधा निर्माण करणे होय. ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. नवीन पर्यटन धोरणांतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन राबविण्याची संकल्पना समाविष्ट करण्यात आली. कृषी पर्यटन म्हणजे ग्रामीण भागातील शेती संस्कृतीचे प्रामुख्याने दर्शन घडविणे तसेच येथील शेतातील पिके, वातावरण, विशिष्ट कामे, ग्रामीण खेळ याचा अनुभव देण्याची सुविधा निर्माण करणे होय. ग्रामीण भागामध्ये कृषी पर्यटनाला निश्चितपणे चालना मिळू शकते. नवीन पर्यटन धोरणांतर्गत ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन राबविण्याची संकल्पना समाविष्ट करण्यात आली. शेतकऱ्यांना शेती  पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे, शहरी आणि शहरी पर्यटकांना निसर्गसंपन्न ठिकाणी राहून  पर्यटनाचा आनंद मिळावा यासाठी एक सुनियोजित व्यवस्था निर्माण करुन पर्यटन विकास साध्य करण्यासाठी राज्यात “कृषी पर्यटन धोरण” राबविण्यास मान्यता देण्यात आली. कृषी पर्यटन उद्देश 

  • ग्रामीण विकास आणि  ग्रामीण विकासातून राज्याचा विकास  साधणे. 
  • शेती उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे. 
  • पूरक व्यवसाय म्हणून प्रोत्साहन देणे. 
  • ग्रामीण भागातील लोककला आणि परंपरा यांचे दर्शन घडविणे. 
  • ग्रामीण महिला व तरुणांना गावामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
  • शहरी भागातील नागरिक, विद्यार्थ्यांना शेती आणि शेती पद्धती तसेच कृषी संलग्न व्यवसायांची माहिती उपलब्ध करून देणे. 
  • ग्रामीण भागातील राहणीमान उंचावणे. 
  • पर्यटकांना  प्रदूषणमुक्त, शांत व निसर्गाच्या  सानिध्यात राहण्याचा अनुभव देणे.
  • पर्यटकांना प्रत्यक्ष शेती कामाचा अनुभव देणे. 
  • कृषी मालाच्या प्राथमिक प्रक्रियेस प्रोत्साहन देणे. 
  • ग्रामीण भागातील पडीक, गायरान  आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे.
  • कृषी पर्यटनाचे विविध प्रारुपे

  • वैयक्तिक मालकीचे कृषी पर्यटन केंद्र
  • भागीदारीतील मालकीचे कृषी पर्यटन केंद्र
  • सहकारी कृषी पर्यटन केंद्र    
  • शासकीय / विद्यापीठांनी सुरु केलेले कृषी पर्यटन केंद्र.
  • कृषी पर्यटन केंद्राकरिता पात्र घटक 

  • वैयक्तिक  शेतकरी 
  • शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था 
  • शासन मान्यता प्राप्त कृषी विज्ञान केंद्र 
  • कृषी महाविद्यालये (खासगी व शासकीय) 
  • कृषी विद्यापीठे  
  • शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा  कंपनी.
  • आदर्श पर्यटन केंद्राकरिता आनुषंगिक बाबी  

  • पर्यटन केंद्र शांत, सुंदर,निसर्गरम्य ठिकाणी असावे.
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी एकाचवेळी विविध पीक पद्धतींचा अवलंब असावा.  जेणेकरून पर्यटकांना शेतीतील विविधतेचा अनुभव घेता येईल. उदा. अन्नधान्य,  भाजीपाला, फळबागा, फुलशेती, रोपवाटिका इ. 
  • पर्यटन केंद्रावर घरगुती पद्धतीची रुचकर, शक्यतो महाराष्ट्रीयन भोजनाची व्यवस्था असावी. 
  • ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी बैलगाडी, घोडागाडी, घोडेस्वारी, शेतीवरील विविध हंगामातील कामे दाखविण्याची सोय असावी. 
  •  पर्यटन केंद्रावर ग्रामीण खेळ उदा.विटीदांडू, हुतूतू, लंगडी, झोका, लगोरी इत्यादी खेळण्यासाठी  सुविधा असावी. 
  • पर्यटन केंद्रावर ग्रामीण व पारंपरिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था असावी.  उदा. पोवाडा, गोंधळ जागरण, गजी नृत्य, लेझीम, भजन-कीर्तन, आदिवासी नृत्य. 
  • पर्यटन केंद्राच्या परिसरात गड, किल्ले, गिर्यारोहण, तलाव, नदी इत्यादी निसर्गरम्य  ठिकाण  असल्यास  त्याबाबत केंद्रचालकाने पर्यटकांना मार्गदर्शन करावे. 
  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्राने दरवर्षी १६ मे हा “कृषी पर्यटन दिन”  साजरा करावा. 
  • कृषी पर्यटन केंद्राने शेतीमधील ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य इत्यादी शेतीमाल पर्यटकांच्या विक्रीसाठी उपलब्ध करून द्यावा. 
  • नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रामार्फत  दिशादर्शक  फलक  लावणे आवश्यक आहे. 
  • कृषी  केंद्राचा  उत्तम  दर्जा  टिकून  राहण्यासाठी  प्रतिवर्षी कृषी  पर्यटन  केंद्राची  पर्यटन  संचालनालया  मार्फत  तपासणी  केली  जाईल . 
  • कृषी पर्यटन केंद्रे प्लास्टिकमुक्त विभाग म्हणून ओळखली जातील . 
  • कृषी क्षेत्र कमी आकाराचे असल्यास आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कृषी  संबंधित बाबी संबंधित शेतकऱ्यांच्या  सहमतीने  पर्यटकांना  दाखविता  येतील.
  • सेंद्रिय  शेती संदर्भात  पर्यटकांना  प्राधान्याने  माहिती  देण्यात यावी. 
  • पर्यटन केंद्राच्या ठिकाणी स्थानिक कला, संस्कृती दाखविण्यासाठी साहित्य उपलब्ध  करून द्यावे. 
  • पर्यटन पाणी बचतीचे  नियोजन  करावे  उदा . ठिबक  सिंचन , तुषार सिंचन. 
  • वीजेकरिता सौरऊर्जा, पवनचक्की यांना  प्राधान्य द्यावे. 
  • राज्याबाहेरील  व विदेशी  पर्यटक  येत असल्यास  केंद्र  चालकास  हिंदी / इंग्लिश  भाषेचे  ज्ञान असावे.
  • कृषी पर्यटन केंद्रचालक पर्यटकांना ग्रामीण समाजव्यवस्थेचा अनुभव देतील. 
  • उदा. बहुरूपी,बारा बलुतेदार, वासुदेव, डोंबारी , स्थानिक लोककला  इ.
  • - बाळासाहेब  सोळांकुरे-पाटील,  ९९२२२०४३१७ (कृषी पर्यटन व्यवस्थापक,महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या, साखर संकुल,‍  शिवाजीनगर, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com