प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त यंत्रे

सीताफळाचा गर वेगळा करण्याचे यंत्र
सीताफळाचा गर वेगळा करण्याचे यंत्र

प्रक्रिया उद्योगामध्ये विविध यंत्रांची आवश्यकता असते. ही यंत्रे छोटी असली तरी या यंत्रांमुळे बरीच कामे सोपी होतात अाणि मजुरीवरील खर्च वाचतो. सध्या बाजारात अशी विविध उपयुक्त यंत्रे उपलब्ध झाली अाहेत. या यंत्रांचा वापर करून अापला व्यवसाय वाढवता येतो.   डाळिंबाचे दाणे काढण्याचे यंत्र या यंत्राच्या साह्याने डाळिंबाचे तुकडे करून त्यामधून दाणे वेगळे केले जातात. डाळिंबाचे टरफल चाळणीच्या मदतीने वेगळे केले जाते अाणि डाळिंबाचे दाणे वेगळे मिळतात. ८५-९० टक्के डाळिंबाचे दाणे वेगळे केले जातात व १०.१५ टक्के टरफलाबरोबरच राहतात. जे चाळणीवर वेगळे होतात. एका मिनिटाला साधारणतः ३०-३५ डाळिंबाचे दाणे वेगळे केले जातात. एकूण ९०-९४ टक्के दाणे वेगळे केले जातात. फक्त २-४ टक्के दाण्यांचे नुकसान होते. हे यंत्र एक तासाला ५०० किलो डाळिंबाचे दाणे वेगळे करते. सीताफळाचा गर वेगळा करण्याचे यंत्र सीताफळातील गर वेगळा करणे सोपे नसल्यामुळे औद्योगिक स्तरावर सीताफळाचा जास्त उपयोग होताना दिसत नाही. आइस्क्रीममध्ये सीताफळ गराचा उपयोग होऊ लागला आहे. या यंत्रामध्ये मुख्यत्वे सीताफळ कापणे, गर व बिया काढून घेणे व गर वेगळा करणे असे तीन भाग आहेत. हे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित असून, फळ कापणे व बी व गर वेगळे करण्याची क्षमता ९४ टक्के आहे. यंत्राची क्षमता ताशी १२० किलोग्रॅम आहे. भुईमूग शेंगा फोडणी यंत्र या यंत्रामध्ये शेंगा फोडणे, टरफल अाणि शेंगदाणे वेगळे करण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे. शेंगा फोडण्याची कार्यक्षमता ८७ टक्के असून, क्षमता ६० किलो प्रति तास आहे. हे यंत्र विद्युत मोटारीच्या साह्याने चालवले जाते. आवळा वर्गीकरण यंत्र रोलरच्या साह्याने वर्गीकरण करण्याची व्यवस्था या यंत्रामध्ये आहे. यामध्ये अावळ्याचे मुख्यत्वे तीन ग्रेडमध्ये वर्गीकरण केले जाते. जसे २० मिलिमीटरपेक्षा कमी, २०-४० मिलिमीटर व ४०-६० मिलिमीटर. या यंत्राची कार्यक्षमता ७५ टक्के आहे व ताशी वर्गीकरण क्षमता ३५०-४०० किलो आहे. या यंत्राच्या मदतीने आवळ्याचे वर्गीकरण करून चांगला दर मिळवता येते. काही कंपन्यांना विशेष ग्रेडचे आवळे पाहिजे असतात. त्यांच्यासाठीही हे यंत्र फारच उपयोगी आहे. आवळा टोचणी यंत्र मुरावळा, मुरब्बा तयार करण्यासाठी आवळ्यावर छिद्रे पाडली जातात. यामुळे साखरेचा पाक आवळ्यामध्ये शोषला जातो. हे काम बऱ्याचदा कंटाळवाणे होते. जेव्हा जास्त प्रमाणात आवळ्यांना टोचणी करायची असते. एका आवळ्याला ५०-७० छिद्रे पाडली जातात. यंत्राची कार्यक्षमता ताशी १०० किलो आहे. आवळ्याचा कीस करण्याचे यंत्र आवळ्यापासून सुपारी तयार करणे, मिठाई तयार करण्यासाठी अावळ्याचा कीस व तुकडे करावे लागतात. हे कार्य कंटाळवाणे व त्रासाचे असते. या कामासाठी हे यंत्र उपयुक्त आहे. या यंत्राच्या साह्याने आवळ्याच्या बिया वेगळ्या केल्या जातात. टोमॅटो वर्गीकरण यंत्र या यंत्राच्या मदतीने ३-४ ग्रेडमध्ये टोमॅटोचे वर्गीकरण करता येते. कार्यक्षमता ६६ टक्के अाणि क्षमता ताशी ३००-३२५ किलो आहे. हे यंत्र मोटार किंवा मनुष्यबळावरही चालविले जाऊ शकते. बटाटे सोलणे व धुण्याचे यंत्र या यंत्राची क्षमता ताशी ४०० किलो असून सोलण्याची कार्यक्षमता ९९.५ टक्के आहे. हे यंत्र बटाट्याचे वेफर्स तयार करणाऱ्या लघुउद्योगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. बोर फळ वर्गीकरण यंत्र या यंत्रामध्ये रोलर्स असून ३० मिलिमीटरपर्यंत, ३०-५० मिलिमीटर व ५० मिलिमीटरपेक्षा जास्त अशा तीन ग्रेडसमध्ये बोरांचे वर्गीकरण होते. यंत्राची कार्यक्षमता ९०-९२ टक्के आहे. ताशी क्षमता ५०० किलो आहे. झाडावरची फळे एकत्रित करणे व वर्गीकरण झाडावरची फळे काढतेवेळी जमिनीवर पडतात व त्यांचे नुकसान होते. फळे एकत्रित करण्यासाठी एक यंत्रणा विकसित केली आहे. याच्या मदतीने सर्व फळे सुरक्षितरीत्या एकत्र केली जातात व त्या बरोबरच वर्गीकरणाची ही व्यवस्था आहे. याच्या मदतीने तीन झाडांची फळे एक तासात काढली व एकत्र केली जाऊ शकतात.

संपर्क : डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४ (लेखक प्रक्रिया तंत्रातील तज्ज्ञ आहेत.) भाट्ये, जि. रत्नागिरी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com