agricultural news in marathi,necisity of proper thinking for actuality of biodiversity , Agrowon, Maharashtra | Agrowon

जैवविविधतेच्या नेमकेपणासाठी विचार आवश्यक

वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

जैवविविधता आणि त्यातील बदलांचा नेमका मागोवा घेण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि खंड पातळीवरील बदलांचाही अंदाज घेण्याची आवश्यकता येल विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने उत्तर अमेरिकेतील घरटे करणाऱ्या पक्ष्यांच्या गेल्या ५० वर्षांतील माहितीसाठा आणि आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जैवविविधतेतील बदल आणि त्यातील फरक लक्षणीयरीत्या आढळले आहेत. हे संशोधन ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जैवविविधता आणि त्यातील बदलांचा नेमका मागोवा घेण्यासाठी स्थानिक, प्रादेशिक आणि खंड पातळीवरील बदलांचाही अंदाज घेण्याची आवश्यकता येल विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने उत्तर अमेरिकेतील घरटे करणाऱ्या पक्ष्यांच्या गेल्या ५० वर्षांतील माहितीसाठा आणि आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. त्यातून जैवविविधतेतील बदल आणि त्यातील फरक लक्षणीयरीत्या आढळले आहेत. हे संशोधन ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

मॅक्स प्लॅंक-येल सेंटर फॉर बायोडायव्हर्सिटी मूव्हमेंट अँड ग्लोबल चेंज येथील प्रा. वॉल्टर जेट्झ यांनी सांगितले, की जैवविविधतेमध्ये स्थानिक आणि जागतिक पातळीवर सातत्याने बदल होत आहेत. काही स्थानिक प्रजाती लुप्त होतात, तर काही प्रजाती नव्याने आढळतात. अमेरिकेतील आणि जगभरातील पक्ष्यांचा अभ्यास करताना काही पॅटर्न लक्षात येतात. मात्र, एखाद्या प्रजातीचा स्थानिक किंवा प्रदेशपातळीवर अल्पसा ऱ्हास दिसत असला तरी राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर त्या प्रजातीमध्ये वाढ दिसून येऊ शकते. तरीही जागतिक किंवा खंडात्मक पातळीवर एकूण विचार करता प्रजातीचा ऱ्हास होत असल्याचेही लक्षात येते.
एकूण जैवविविधतेचा विचार करताना संख्यात्मक पातळीपेक्षा स्केलचा विचार आवश्यक असल्याचे मत मार्ता जार्झियाना यांनीही व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, जैवविविधता शास्त्र म्हणून अभ्यासणाऱ्या संशोधकांनी एकाच वेळी विविध पातळ्यांवर विचार करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...