agricultural news in marathi,news about training of honey bee raring, Agrowon, Maharashtra | Agrowon

राहुरी येथे मधमाशीविषयक प्रशिक्षणाचे उद्या आयोजन
कोजेन्सिस वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष महत्त्व आहे. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने रविवारी (ता. २०) महात्मा फुले कृषी विद्यापीठात विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.

राहुरी ः मधुमक्षिका पालनाचे शेती उत्पादनात विशेष महत्त्व आहे. मधुमक्षिका पालनात शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा या उद्देशाने जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगाने रविवारी (ता. २०) महात्मा फुले कृषी विद्यापीठात विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केल्याची माहिती प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी यांनी दिली.

पाच लाख वसाहतींची आवश्‍यकता असताना राज्यात केवळ बारा हजार मधमाशा वसाहती आहेत. विविध कारणाने मधमाश्यांची संख्या कमी होत आहे. मधमाश्या पिकांकडे आकर्षित करण्यासाठी काकडी, कांदा, कारले या पिकांवर साखर पाणी, मध, मळी, गूळ पाणी, उस किंवा फळांचा रस यांची फवारणी उपयुक्त ठरते. प्रशिक्षणात दिनकर पाटील, डॉ. उत्तम सहाणे, नानासाहेब इंगळे मधमाशी पालनाबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा यांच्या कल्पनेतून दोन वर्षांपूर्वी विद्यापीठात मधुमक्षिका पालन प्रायोगिक तत्त्वावर सुरू केले गेले. चाळीस मधपेट्या कांदा बीजोत्पादनामध्ये डिसेंबर ते मार्च या कालावधीत ठेवून तुलनात्मक अभ्यास केला असता मधमाश्यांमुळे कांद्याची फुलधारणा व बियाण्यांचे प्रमाण वाढल्याचे आढळले. बियाणे उत्पादनात २८ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली.मधमाशीपालन ही एक चळवळ व्हावी, असा कृषी विद्यापीठाचा हेतू असून, या बाबतीत सर्व मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाईल.- डाॅ. के. पी. विश्वनाथा

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...