सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता विद्यार्थ्यांची सृजनशीलता पणाला

सफरचंद काढणीमध्ये रोबोटनिर्मितीमध्ये विद्यार्थी संशोधकांचा सहभाग मोलाचा ठरु शकतो.
सफरचंद काढणीमध्ये रोबोटनिर्मितीमध्ये विद्यार्थी संशोधकांचा सहभाग मोलाचा ठरु शकतो.

तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक समस्यांवर मार्ग काढणे शक्य आहे. त्या अनुषंगाने सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीचे आव्हान कॅलिफोर्निया विद्यापीठातील यांत्रिकीकरण विभागाने विद्यार्थ्यांना दिले आहे. त्याला प्रतिसाद देत अमेरिका, कॅनडा आणि चीन येथील महत्त्वाच्या विद्यापीठांतील विद्यार्थ्यांच्या १९ गटांनी भाग घेतला आहे. शेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे आव्हान मोठे आहे. अनेक कामे ही त्यातील कौशल्यांच्या मागणीमुळे मनुष्यबळावरच अवलंबून असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मनुष्यबळाची कमतरता प्रगत देशांमध्ये वेगाने जाणवत आहे. देण्यात आले होते. ‘२०१८ एएसएबीई स्टूडंट रोबोटिक्स चॅलेंज’ या स्पर्धेचे आयोजन कॅलिफोर्निया विद्यापीठातील कृषी यांत्रिकीकरण तज्ज्ञ अॅलिरेझा पौर्रेझा यांनी केले होते.

  • कृषी क्षेत्रावरील लोकसंख्येचा ताण सातत्याने वाढत असून, पर्यावरणपूरक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे आव्हान वाढत आहे. अशा स्थितीमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची आवश्यकताही वाढत आहे. प्रगत देशांमध्ये शेतीतील मनुष्यबळ वेगाने कमी होत असून, कामांसाठी माणसांची उपलब्धता होत नाही. शेतीतील यांत्रिकीकरणाचा, रोबोटिक्सचा वेग आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. यासाठी तरुण, विद्यार्थी यांच्या सृजनशीलतेची मदत घेण्यात येत असल्याचे अॅलिरेझा पौर्रेझा यांनी सांगितले.
  • यात प्राथमिक पातळीवरील पदवीपूर्व आणि पदवीधर अशा दोन प्रकारातील विद्यार्थी गटांनी भाग घेतला. त्यांच्यासाठी आव्हान होते, ते सफरचंदाची स्वयंचलित काढणीचे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये व्यावसायिकरीत्या सफरचंदाच्या फळबागांचे व्यवस्थापन केले जाते. सफरचंद बागेतील काढणीसाठी आवश्यक ती रोबोटिक यंत्रांचे आरेखन व निर्मिती करण्यात येणार आहे. त्यात ८ फूट बाय ८ फूट क्षेत्रामधील बागेमधील चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
  • त्यातील उद्दिष्ट्ये :

  • सुमारे ८ योग्य रीतीने पक्व (गडद लाल रंगाची, योग्य आकार असलेल्या फळांची काढणी,
  • खराब, रोगग्रस्त, लहान आकारातील ८ फळे वेगळी करणे व नष्ट करणे.
  • अपक्व हिरवी फळे न तोडता झाडावर तशीच ठेवणे.
  • शुक्रवार (ता. १३) रोजी  या १९ गटांनी तयार केलेल्या रोबोटच्या चाचण्या डेट्रॉईट येथील ‘अमेरिकन सोसायटी ऑफ अॅग्रीकल्चरल अॅण्ड बायोलॉजिकल इंजिनिअर्स’ च्या फार्मवर घेण्यात आल्या. त्यांचे परीक्षण संस्थेच्या आंतरराष्ट्रीय वार्षिक बैठकीमध्ये करण्यात आले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com