गोळी खाद्यनिर्मितीबाबत माहिती....

गोळी खाद्य निर्मिती
गोळी खाद्य निर्मिती

दळलेले, योग्यप्रकारे मिक्‍स केलेले पशुखाद्य पावडर स्वरूपात काढून पॅक करता येते; परंतु ते पशुखाद्य जर गोळी पेंड स्वरूपात बनवायचे असेल तर पेलेट यंत्राची गरज असते. पेलेट मिलची क्षमता ही ग्रायंडरच्या क्षमतेनुसार असावी. ग्रायंडरची क्षमता थोडीशी पेलेट मिलपेक्षा जास्त असावी, जेणेकरून पेलेट मिलला माल कमी पडणार नाही. पेलेट मिलमधून गोळी बनविण्यासाठी त्यामध्ये डाय असते. या डायच्या आकारानुसार गोळी पेंडचा आकार बनवता येतो. उदा. ः३ मि.मी. ३.५ मि.मी.,४ मि.मी., ६ मि.मी., ८ मि.मी., १० मि.मी. आकाराची गोळी पेंड तयार करता येते. गोळी पेंड बनविण्यासाठी पेलेट मिलला वाफेची गरज असते. गोळी पेंड बनवण्यासाठी दळलेल्या व मिक्‍स केलेल्या पशुखाद्यातून वाफ जावी लागते. ही वाफ बॉयलरमधून मिळवली जाते. या बॉयलरमधून येणाऱ्या वाफेचे तापमान हे ८० ते ८५ अंश सेल्सिअस इतके असते. ही वाफ दळलेल्या व मिक्‍स केलेल्या पशुखाद्यात मिसळली जाते व त्यापासून गोळी पेंड बनवली जाते. बॉयलर हा डिझेल एलडीओ हा प्रकारच्या इंधनावर चालतो. गोळी पेंड हे ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानामुळे अति गरम असतात. त्यांना थंड करणे गरजेचे असते, त्यामुळे कुलर गरजेचे आहे. थंड झालेली गोळीपेंड नंतर चाळून त्यातील पावडर बाजूला केली जाते. त्यासाठी चाळण्या मिळतात. थंड झालेली गोळी पेंड चाळल्यानंतर पोत्यामध्ये पॅक करून शिलाई केली जाते. संपर्क : डॉ. मनोजकुमार आवारे, ०२०- २६९२६२४८ बाएफ, उरुळी कांचन, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com