नवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेले ६० दिवस दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करणाऱ्य
ताज्या घडामोडी
कोंबडीखताचा वापर कसा करावा?
मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.
मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडीखत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी; मात्र ताजे कोंबडीखत उभ्या पिकांत जमिनीत मिसळू नये.
उभ्या पिकांत कोंबडीखत जमिनीत मिसळण्यापूर्वी प्रथम त्यावर एक महिना पाणी मारून रापून किंवा थंड होऊ द्यावे म्हणजे कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर कमी होऊन त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात. कोंबड्यांच्या शेडमध्ये कोंबड्यांची विष्ठा, मूत्र, गव्हांडा किंवा भाताच्या तुसावर पडून खत तयार होते, त्यामुळे ताज्या कोंबडीखताचे कर्ब : नत्र गुणोत्तर जास्त असते. असे खत उभ्या पिकांत जमिनीत मिसळताना ओलावा असला पाहिजे. जमिनीत पुरेसा ओलावा नसेल तर पीक पिवळे पडते, त्यामुळे ताजे कोंबडीखत थेट पिकांसाठी वापरू नये.
उभ्या पिकांत पूर्ण कुजलेले कोंबडीखत वापरावे. हलक्या, जास्त निचऱ्याच्या, लालसर तांबड्या जमिनीत कोंबडीखतातील नत्र, स्फुरद, पालाश अन्नद्रव्यांव्यतिरिक्त कॅल्शिअम, मॅग्नेशिअम व सोडिअमचे प्रमाण जमिनीत मिसळले जाऊन पिकांना उपलब्ध होतात. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. शेणखतासारखा तणांचा प्रादुर्भाव कोंबडीखतातून होत नाही.
संपर्क : ०२४२६- २४३२०९
मृद्शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
- 1 of 1027
- ››