पवनऊर्जा, जैवविविधता यातील संघर्ष टाळण्यासाठी हवे अधिक प्रयत्न

पवनऊर्जा, जैवविविधता यातील संघर्ष टाळण्यासाठी हवे अधिक प्रयत्न
पवनऊर्जा, जैवविविधता यातील संघर्ष टाळण्यासाठी हवे अधिक प्रयत्न

पवन ऊर्जा प्रकल्पाची उभारणी ही शक्यतो डोंगराळ भागांमध्ये, जंगलाच्या परिसरामध्ये केली जाते. मात्र, अशी ठिकाणी ही अनेक वेळा धोक्यात असलेल्या विविध प्रजातींसाठी संरक्षित केलेली असतात. पर्यायाने स्थानिक प्रशासनासोबत पर्यावरणामध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय अधिकारी आणि कायदे यांच्याशी प्रामुख्याने झगडा होत असतो. बर्लिन (जर्मनी) येथील एका प्रकल्पामध्ये नुकतीच वटवाघळांच्या संरक्षणासाठी योग्य व पुरेशी काळजी न घेतल्याबद्दल पवन ऊर्जा कंपनीवर आक्षेप घेण्यात आला आहे. या झगड्यामागील नेमक्या तथ्यांचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने लेईब्निझ इन्स्टिट्यूट फॉर झू अॅण्ड वाईल्डलाईफ रिसर्च या संस्थेने सर्वेक्षण केले आहे. सध्या खनिज तेलाच्या तुलनेमध्ये अधिक शाश्वत पर्याय म्हणून पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, जैवइंधन या अपारंपरिक ऊर्जा स्रोतांकडे पाहिले जाते. त्यासाठी विविध देशांनी धोरणात्मक पुढाकारही घेतला आहे. अगदी जर्मनीमध्येही पवन ऊर्जा उत्पादन हा महत्त्वाचा घटक मानला जातो. मात्र, ती पर्यावरणदृष्ट्या अधिक शाश्वत असावी ही अपेक्षा असते. अशा प्रकल्पांसाठी खूप मोठ्या प्रमाणात मोकळ्या क्षेत्राची आवश्यकता भासते. त्याचे त्यांच्या फिरणाऱ्या पात्यांमुळे वटवाघळे, पक्षी यांना धोका पोचू शकतो. सध्याच्या सुरक्षाविषयक यंत्रणा पुरेशा नसल्याचे मत पर्यावरण कार्यकर्ते नेहमी करत असतात. त्याला लेईब्निझ इन्स्टिट्यूट फॉर झू अॅण्ड वाईल्डलाईफ रिसर्च यांनी जर्नल ऑफ रिन्युएबल अॅण्ड सस्टेनेबल एनर्जी मध्ये प्रकाशित केलेल्या सर्वेक्षण -संशोधनातून दुजोरा दिला आहे. या सर्वेक्षणामध्ये अपारंपरिक पवन ऊर्जा व जैवविविधता क्षेत्रातील सुमारे ५०० पेक्षा अधिक प्रतिनिधीचा, संवर्धन संस्थेसह शासकीय व अशासकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश होता. सर्वेक्षणाविषयी माहिती देताना लेऊब्निझ -आयझेडडब्ल्यू येथील विभागप्रमुख क्रिस्टिन वोईग्त यांनी सांगितले, की आम्हाला सर्वेक्षणादरम्यान लोकांमध्ये अनेक विसंगती असल्याचे दिसून आले. मात्र, वटवाघळांचे संरक्षण आणि हरित ऊर्जा यामधील संघर्षाविषयी बहुतांश लोकांचे एकमत आहे. त्यांच्या मते जागतिक हवामानासाठी हरितऊर्जा जितकी महत्त्वाची आहे, तितकीच जैवविविधताही महत्त्वाची आहे. विद्युत ऊर्जा उत्पादनासाठी कमी ते मध्यम प्रकारच्या नुकसानीसाठी संवर्धन कायद्यांमध्ये योग्य ते बदल केले पाहिजेत. त्याच प्रमाणे जैवसंरक्षणासाठी केलेल्या काही काळासाठी बंद ठेवण्यासारख्या उपाययोजनांमुळे होणाऱ्या हरित ऊर्जेच्या किंमतीमधील वाढीसाठीही लोकांनी तयार राहिले पाहिजे. पवन ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी होत असलेल्या संघर्षामुळे गेल्या काही वर्षांमध्ये अडचणी वाढत आहे. एकट्या जर्मनीमध्ये सुमारे ३० हजार प्रकल्पांना योग्य जागेच्या उपलब्धतेची समस्या भासत आहे. परिणामी वन्यजीवांसाठी संरक्षित क्षेत्र, जंगले यांच्या जवळ नवीन प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. त्यातील केवळ २५ टक्के पवनचक्क्या वटवाघळांच्या कार्यरत असण्याच्या काळामध्ये बंद ठेवल्या जातात. वाऱ्याचा वेग कमी आणि उष्ण हवेचे प्रमाण अधिक असण्याच्या स्थितीसह वटवाघळांच्या संरक्षणासाठी कायदेशीर चौकटीमध्ये बसवणे आवश्यक असल्याचे मत मार्कस फ्रित्झ यांनी व्यक्त केले. सर्वेक्षणातील महत्त्वाचे...

  • पर्यावरणाच्या दृष्टीने शाश्वत ऊर्जा उत्पादनासाठी या उद्योगातील लोकांचे पर्यावरणाशी संबंधित कार्य करणाऱ्या संस्था आणि लोकांशी सातत्याने संपर्क राहिला पाहिजे.
  • ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी ऊर्जा पद्धतींमध्ये बदलांची आवश्यकता मान्य केली.
  • शाश्वततेकडे प्रवास करताना अन्य अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाच्या तुलनेमध्ये पवन ऊर्जा क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज सुमारे ८५ टक्के लोकांनी व्यक्त केली. मात्र, पवन ऊर्जेशी संबंधित नसलेल्या (सुमारे ८६ टक्के) लोकांनी मात्र अशा वेगळ्या प्रोत्साहनाची गरज नसल्याचे मत व्यक्त केले.
  • केवळ ४ टक्के लोकांनी जैवविविधतेच्या संरक्षणापेक्षा हरित ऊर्जा अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले.
  • पवनचक्क्याच्या पात्यामध्ये येऊन मृत्युमुखी पडणाऱ्या वटवाघळांचे प्रमाण मोठे असून, वटवाघळाच्या अनेक प्रजातींची संख्या वेगाने कमी होत असल्याचे मत जर्मनीतील फेडरल एजन्सी फॉर नेचर कॉन्झर्वेशन यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. वटवाघळांच्या स्थानिक आणि स्थलांतरित जातींनाही फटका बसतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com