agricultural stories in Marathi, advers effect of solty woter on animal health | Page 2 ||| Agrowon

खाऱ्या पाण्याचा जनावरांच्या आरोग्यावर होतो परिणाम

डॉ. रणजित इंगोले
मंगळवार, 21 मे 2019

खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमतेवर परिणाम करते. मुत्रपिंडाच्या कार्यावर ताण येऊन मूत्रपिंडाचे विकार वाढतात. मूत्रपिंडासोबतच यकृत, प्लिहा, हृदय, मेंदू, आतडे, पोट (रुमेन) इत्यादींच्या पेशींवर परिणाम झालेला दिसतो.

खारे पाणी जनावरांची कार्यक्षमता, उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमतेवर परिणाम करते. मुत्रपिंडाच्या कार्यावर ताण येऊन मूत्रपिंडाचे विकार वाढतात. मूत्रपिंडासोबतच यकृत, प्लिहा, हृदय, मेंदू, आतडे, पोट (रुमेन) इत्यादींच्या पेशींवर परिणाम झालेला दिसतो.

अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यांतून पूर्णा नदी वहाते. या नदीच्या खोऱ्याचा दोन्ही कडेच्या जवळपास २५ किलोमीटर भागात जमिनीच्या भूगर्भातील पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण अधिक असल्याने याला खारपाणपट्टा असे संबोधले जाते. या खारपाणपट्टयात जमिनीच्या भूगर्भातील पाण्यात  ६००० पी. पी. एम. पर्यंत क्षार विरघळलेले असल्याचे दिसून येते. पूर्णेच्या खार पाणपट्ट्याने विदर्भातील तीन प्रमख जिल्ह्यांच्या विशिष्ट भागाचा समावेश आहे. त्यामध्ये एकूण ८९४ गावे खारपाणपट्ट्यामुळे प्रभावीत झाली आहेत. मानवी आरोग्याच्याबरोबरीने जनावरांच्यावर देखील खाऱ्या पाण्याचा परिणाम होतो. खारपाण्यामुळे जनावरातील प्रजननक्षमता तसेच उत्पादनक्षमता कमी होते.

पाण्याची गुणवत्ता महत्त्वाची

 • जनावरांची चांगली जोपासना करून त्यांच्यापासून चांगले उत्पादन मिळविण्याकरिता मुबलक व चांगल्या प्रतीच्या पाण्याची आवश्यकता असते. ज्या पाण्यामधे विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण ५०० पी. पी. एम. पर्यंत असते, असे पाणी माणसांसाठी तसेच जनावरांना पिण्यासाठी योग्य समजले जाते.
 • जनावरांना ५०० ते १००० पी. पी. एम. ऐवढे विरघळलेले क्षार असलेले पाणी पिण्यास दिले तरी चालते, परंतु १००० पी. पी. एम. पेक्षा जास्त क्षार असलेले पाणी दिले असता मात्र त्याचा विपरित परीणाम हा जनावरांच्या आरोग्यावर होऊन त्यांची उत्पादनक्षमता तसेच प्रजननक्षमता कमी होते.
 • ज्या पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण १००० पी. पी. एम. पेक्षा जास्त असते, ते पाणी खारट, खनिजयुक्‍त किंवा क्षारयुक्‍त समजले जाते. क्षारांचे प्रमाण ३००० पी. पी. एम. पेक्षा अधिक क्षार असलेले खारे पाणी जनावरांना प्यायला दिले असता त्याचा विपरीत परीणाम होतो.
 • पाण्याचा खारटपणा हा पाण्यामध्ये विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण आणि क्षारांच्या प्रकारावर अवलंबून असते. खाऱ्या पाण्यामध्ये कार्बोनेटस्‌, बायकार्बोनेटस्‌ क्‍लोराईडस्‌ आणि सल्फेट चे प्रमाण अधिक असते.

आजारांची लक्षणे

 • पाणी खूूप खारे असेल तर जनावरे ते पाणी पिणे बरेच दिवस टाळतात. परंतु, गोड्या पाण्याअभावी एखादे वेळी गरजेपेक्षा जास्त खारे पाणी एकदाच पिऊन टाकतात. त्यामुळे जनावरे लगेच आजारी पडतात, अचानक मरण पावतात.
 • आजारी जनावरे खाली पडतात, त्यांना चक्‍कर येते, तोंडातून फेस येतो.

प्रतिबंध आणि उपाययोजना

 • शक्‍यतो १००० पी. पी. एम. पेक्षा जास्त क्षार असलेले पाणी जनावरांना प्यायला देऊ नये.
 • खाऱ्या पाण्यात गोडे पाणी मिसळून जनावरांना योग्य प्रमाणामध्ये पाजावे.
 • विविध पद्धती वापरून खारे पाण्याचे नि:क्षारीकरण करून पाण्यातील क्षार कमी करावे.
 • नवीन विकत घेतलेल्या जनावराला एकदम खारे पाणी प्यायला देऊ नये.
 •  

खाऱ्या पाण्याचा परिणाम

 • पशुपालनात स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा फार मोलाचा वाटा आहे. जनावरांची पाणी पिण्याची क्षमता ही पाण्यात असणारे क्षार, जनावरांचे वर्गीकरण, जनावरांचे खाद्य, वातावरणाचे तापमान, जनावराचे वय, जनावराचे शरीरात असणारे पाणी आणि शरीराद्वारे होणारे उत्सर्जन इत्यादीवर अवलंबून असते.
 • पाण्याचा खारटपणा हा जनावरांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा व हानिकारक घटक आहे. अधिक खारे पाणी जनावरांना घातक असते. कमी अधिक प्रमाणात खारट असलेले पाणी जनावरे सुरवातीला काही दिवस पिणे टाळतात, परंतु नाईलाजास्तव काही प्रमाणात पितात. अशा जनावरांमध्ये हगवण लागते तसेच चयापचयाचे आजार होतात.
 • खाऱ्या पाण्यापासून होणाऱ्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता लहान जनावरांपेक्षा मोठ्या जनावरांमध्ये जास्त असते. वाळवंटात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या जनावरात खारे पाणी पचवण्याची क्षमता अनुवंशिक असते. इतर जनावरांपेक्षा मेंढ्यांमध्ये खारे पाणी पचविण्याची क्षमता अधिक असते.
 • दुभती जनावरे, शरीराचे तापमान वाढलेली जनावरे आणि शेती काम करणारी जनावरे यांना आवश्यकतेपेक्षा अधिक पाण्याची गरज असते. अशी जनावरे जर खारे पाणी पीत असतील तर त्यांना पचन संस्था, प्रजनन संस्था तसेच मुत्राशयाचे आजार होण्याची शक्‍यता जास्त असते.
 • सतत खारे पाणी पिणाऱ्या जनावरांची प्रजननक्षमता, पचनक्षमता, उत्पादनक्षमता, शरीरातील द्रव्यांची देवाण घेवाण, मुत्रपिंडाचे कार्य आणि रक्‍तातील घटक इत्यादी वर दुष्परिणाम होतात.
 • खारे पाणी पिणारी जनावरे नियमित चारा खात असली तरी सतत खारे पाणी पिण्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर व पोटात उपयुक्‍त असणारे जीवाणू व प्रोटोझोआचे प्रमाण कमी होऊन अन्न पचन करण्याची प्रक्रिया बिघडते. अन्नाचे उत्सर्जन योग्य प्रकारे होत नाही.
 • जनावरांची पचन शक्‍ती कमी झाल्यामुळे पोषक द्रव्यांचे योग्यरित्या पचन व शोषण होत नाही. परीणामी, दुग्धउत्पादनावर होतो.
 • खारे पाणी पिल्यामुळे जनावरांच्या शरीरातील द्रव्यघटकातील परासरण दाब वाढतो. परिणामी जनावरांचे वजन आणि उत्पादनक्षमतेत घट होते. सोबतच थाररॉइडपासून निघणाऱ्या स्त्रावाच्या प्रमाणात कमतरता होते. हा द्रव शरीरात प्रथिनांच्या उत्पत्तीसाठी आवश्यक असल्याने शरीरातील प्रथिने तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. त्याचा विपरीत परिणाम जनावरांच्या उत्पादनक्षमतेवर होतो.
 • खारे पाणी पिणाऱ्या गाई आणि नियमित गोडे पाणी पिणाऱ्या गाई यांच्या दुधाच्या उत्पादनात थंड हवामानाच्या वेळी विशेष फरक जाणवत नसला तरी उन्हाळ्यात मात्र खारे पाणी पिणाऱ्या गायीची उत्पादनक्षमता कमी होते. परिणामी खारे पाणी पिणाऱ्या जनावरांपासून कमी दूध मिळते.
 • सतत खारे पाणी पिणाऱ्या जनावरांमध्ये खनिजांचे शोषण व उत्सर्जन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. एखाद्या विशेष खनिजांचे शरीरातील साठवणीचे प्रमाण कमी होते.
 • खारे पाणी पिण्यामुळे मूत्र व विद्युत अपघटनीचे उत्सर्जनाचे प्रमाण वाढते. मुत्रात सोडियम व क्‍लोराईडचे प्रमाण वाढते, पोटॅशिअमचे प्रमाण कमी होते.
 • खाऱ्या पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुत्रपिंडामध्ये विद्युत अपघटनीचे, गाळण्याची आणि त्यामुळे परत शोषण्याची प्रक्रिया कमी होते.
 • अधिक खारे पाणी पिणाऱ्या जनावरांमधे रक्‍तद्रव्य, विद्युत अपघटनीचे प्रमाण व जास्तीचे क्षार मुत्रातून उत्सर्जित होतात. रक्‍तातील युरीया व क्रियेटीननचे प्रमाण वाढून मुत्रपिंडाच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. शेणातून पोटॅशिअमचे उत्सर्जित होण्याचे प्रमाण कमी होऊन ते त्याचे शोषणाचे प्रमाण जठर, आतड्यात वाढते.
 • खारे पाणी पिणाऱ्या जनावरांच्या रक्‍तातील हिमोग्लोबीन, ऑक्‍सिजन, रक्‍तघटक उदा. अल्बुमीन व ग्लोबुलीन प्रथिने इत्यादीचे प्रमाण कमी होते. परिणामी, जनावरांची रोगप्रतिकारक शक्‍ती कमी होऊन जनावरे विविध रोगांना बळी पडतात.

 - डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४       
(पशुविकृती शास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

 


इतर कृषिपूरक
शेळीपालनासाठी महत्वाचे मुद्दे...शेळीपालन व्यवसाय सुरू करताना पूर्वतयारी करावी....
व्यवस्थापन दुधाळ जनावरांचे...गाई, म्हशींच्या आहारात पशुखाद्याचा योग्य प्रमाणात...
जनावरांतील ताण कमी करा... उन्हाळयात अनेकवेळा तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा...
शेतकऱ्यांसाठी क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्डमुळे कर्जाचे पैसे घेण्यासाठी...
असे बनवा घरच्या घरी पशुखाद्यउन्हाळ्यात गाई, म्हशी आणि इतर जनावरांची भूक कमी...
जनावरांच्या जैवसुरक्षेबाबत जागरूक रहाजनावरांना आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर उपचाराचा...
गाई, म्हशींच्या तपासणीसाठी...पशूपालनातील प्रमुख अडचण म्हणजे गाई, म्हशी माजावर...
ब्रुसेलोसिसकडे नको दुर्लक्षएखाद्या संक्रमित जनावराचे  रक्त, द्रव किंवा...
जनावरांतील उष्माघाताचे नियंत्रणउन्हाच्या संपर्कात आल्यामुळे जनावरांच्या शरीराचे...
पशुपालनात सुरक्षितता महत्त्वाची...पशू सांभाळ, दैनंदिन निगा, चारा-पाण्याची सोय, दूध...
अनुदानाचा योग्य विनियोगअनुदानासाठीची बहुतांश प्रक्रिया बॅंकेमार्फतच...
आजारांपासून कोंबड्यांचे संरक्षणकोंबड्यांना होणाऱ्या आजारांचे वेळीच व्यवस्थापन...
बदलत्या हवामानानुसार जनावरांचे...बदलत्या हवामानानुसार जनावरांच्या आहार, गोठा,...
उत्पादन धिंगरी अळिंबीचेअळिंबीमध्ये भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत प्रथिने...
फायदेशीर पशुपालनाचे तंत्रगाई,म्हशींची उत्पादकता वाढवायची असेल तर आपल्याकडे...
गाय, म्हशींच्या आहारात बायपास फॅटचा वापरआपल्याला सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांत नफा...
स्वच्छतेतून वाढते दुधाची गुणवत्तादुधाची गुणवत्ता कमी होते. अयोग्य दुधामुळे आर्थिक...
अॅझोलाः एक आरोग्यदायी पशुखाद्य जनावरांचे दूध उत्पादन, प्रजनन, वाढ आणि...
दुधातील फॅट कमी राहण्याची कारणे,...दुधातील स्निग्धांश (फॅट) हा प्रतवारीच्या दृष्टीने...
चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छ दूध उत्पादन...स्वच्छ दूध उत्पादनासाठी स्वच्छ वातावरण आणि...