agricultural stories in Marathi, agriculture, use of biogas slurry | Agrowon

कडवंची : जमीन सुपीकतेसाठी बायोगॅस स्लरी

संतोष मुंढे
रविवार, 21 एप्रिल 2019

कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी केली आहे. या संयंत्रातील स्लरीचा वापर द्राक्ष बागांसाठी केला जातो. या स्लरीमुळे जमिनीचा भुसभुशीतपणा, ओलावा टिकवून राहण्याची क्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली आहे.

कडवंचीमधील शेतकऱ्यांनी बायोगॅस संयंत्राची उभारणी केली आहे. या संयंत्रातील स्लरीचा वापर द्राक्ष बागांसाठी केला जातो. या स्लरीमुळे जमिनीचा भुसभुशीतपणा, ओलावा टिकवून राहण्याची क्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली आहे.

बायोगॅस स्लरीच्या वापरामुळे कडवंचीमधील बहुतांश जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत झाली आहे. २००७-०८ नंतर राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रमातून कडवंची येथील शेतकऱ्यांकडे अनुदानावर बायोगॅस संयंत्र उभारण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात आली. सध्या गावात सुमारे दोनशेवर बायोगॅस संयंत्र कार्यरत आहेत. बायोगॅसमधून निघणारी स्लरी मोठ्या हौदात साठवून ठेवली जाते. मडपंपाने ही स्लरी ट्रॅक्‍टर ट्रॉलीतील टाकीत भरली जाते. एक हजार लिटर क्षमतेची ही टाकी आहे. या टाकीच्या माध्यमातून द्राक्षबाग किंवा डाळिंब बागेत ही स्लरी झाडांना दिली जाते. वर्षातून सात ते आठ वेळेस बायोगॅस स्लरी बागेमध्ये दिली जाते.

पूर्वीपासूनच गावातील शेतकरी द्राक्ष बागांना शेणापासून स्लरी तयार करून देत होते. अनेकदा ही स्लरी योग्य प्रकारे कुजतही नव्हती. स्लरी तयार करणे आणि वाहतूक करून बागेतील झाडांना देण्यासाठी वेळ, मजूर जास्त लागायचे. परंतू आता साधारणत: दीड तासात एक एकर क्षेत्राला ट्रॅक्टरचलित टाकीमुळे बायोगॅस स्लरी देणे शक्‍य होत आहे. ज्याच्याकडे बायोगॅस संयंत्र आहे, त्यातील बहुतांश शेतकरी बायोगॅस स्लरीचा वापर जमीन सुपीकतेसाठी करत आहे.

अन्नद्रव्यांची उपलब्धता
कडवंची शिवारात हलकी व मध्यम प्रकारची जमीन जास्त प्रमाणात आहे. जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी शेतकरी वेगवेगळ्या सेंद्रिय घटकांसोबतच बायोगॅस स्लरीचा वापर करतात. बायोगॅस स्लरीमुळे जमिनीचा भुसभुसीतपणा, ओलावा टिकवून राहण्याची क्षमता आणि अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली आहे. स्लरीच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या वापरात बचत झाली. याचबरोबरीने पीक उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये चांगली वाढ झाली आहे. हा फायदा लक्षात घेऊन जास्तीत जास्त सेंद्रिय खतांच्या वापरावर कल वाढला आहे.

बायोगॅस स्लरीचे फायदे

  •  स्लरीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण जास्त.
  • जमिनीचा सामू कमी होऊन पिकांसाठी अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेत वाढ.
  •  मुक्‍त क्षारांच्या प्रमाणात झाली घट.
  •  सेंद्रिय कर्बात वाढ.
  •  जमीन भुसभुशीत होण्यासह पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत वाढ होण्यास मदत

- एल. ए. शिंदे,९४२३७१२७८१
(कृषी अधिकारी,जिल्हा परिषद, जालना)

 


इतर सेंद्रिय शेती
सेंद्रीय द्रवरूप जैविक खत तयार करण्याची...पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये सूक्ष्मजिवाणू...
शाश्वत उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचे...जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता टिकवून ठेवायची असेल...
निंबोळी अर्काची निर्मिती, वापरसध्या पावसाळ्याच्या सुरुवातीला कडुनिंबाच्या...
गांडूळखत व्यवसाय विस्तारातून अर्थकारण...लोहगाव (जि. परभणी) येथील अल्पभूधारक सीताराम ऊर्फ...
ऊस पाचटातून वाढवा सेंद्रिय घटकऊस पाचटापासून कंपोस्ट खत तयार करता येते. ऊस तुटून...
जमीन सुपीकता, उत्पादकतावाढीसाठी...जमिनीतून एकापाठोपाठ विविध अन्नधान्ये पिके...
मशागतीद्वारे पीक अवशेषाचे व्यवस्थापनपीक अवशेष कुजून त्याद्वारेदेखील जमिनीमध्ये कर्ब...
गांडूळखत अर्क निर्मितीसेंद्रिय शेतीमध्ये गांडुळे व गाडूळखताचे मोठे...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
कंपोस्ट खते बनविण्याच्या पद्धतीजमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा...
कंपोस्ट खते बनवण्याच्या पद्धतीबदलते हवामान आणि जमिनीचा कमी झालेला कस हे दोन्ही...
सेंद्रिय पद्धतीने पीक पोषण सेंद्रिय शेतीमध्ये जमिनीची सुपीकता जपण्याचा विचार...
जमिनीची सुपीकता, सूक्ष्मजीवांचा अतूट...वॉक्समन यांच्या सॉईल अॅण्ड मायक्रोब्स या...
जमीन अन् सूक्ष्मजीवपूर्वीच्या रासायनिक शेतीमध्ये...
जमिनी सुपीकता, उत्पादकता वाढीसाठी शेणखत...कृषी विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रांद्वारे सर्व...
आरोग्यकार्डानुसार शेतात, व्यवस्थापनात...केवळ आरोग्यकार्डाचे वाटप झाले म्हणून...
दृश्य जीवशास्त्रांचाही विचार महत्त्वाचा...गेल्या काही भागांतून आपण आपल्या दृष्टिआड असणाऱ्या...
समजावून घ्या सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरणशाश्‍वत सुपीकतेसाठी टिकून राहणारा सेंद्रिय कर्ब...
जमिनीतील ओलावा मोजण्याच्या पद्धतीओलाव्याचे प्रमाण नेमके असल्यास पिकांची वाढ योग्य...
वाढवूया जमिनीतील सेंद्रिय कर्बसेंद्रिय कर्बांचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यासाठी...