agricultural stories in marathi, agro vision, backyard poultry rearing | Agrowon

परसबागेतील पोल्ट्रीसाठी नियमांची आवश्यकता
वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

परसबागेतील कोंबडीपालनाची लोकप्रियता वेगाने वाढत असली तरी अनेक नगरपालिकांमध्ये पक्ष्यांचे पालन व कत्तलीसंदर्भात स्पष्ट नियमावली व कायदेच नसल्याचे पुढे आले आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात सुमारे १०० नगरपालिकांमधील व चार मोठ्या शहरांतील ४२ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ही बाब पक्ष्यांचे आणि पर्यायाने माणसांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने धोका वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

परसबागेतील कोंबडीपालनाची लोकप्रियता वेगाने वाढत असली तरी अनेक नगरपालिकांमध्ये पक्ष्यांचे पालन व कत्तलीसंदर्भात स्पष्ट नियमावली व कायदेच नसल्याचे पुढे आले आहे. अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यात सुमारे १०० नगरपालिकांमधील व चार मोठ्या शहरांतील ४२ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ही बाब पक्ष्यांचे आणि पर्यायाने माणसांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने धोका वाढण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे.

बहुतांश शेतकऱ्यांच्या परसबागेमध्ये कोंबड्यांचे पालन केले जाते. त्याचा उपयोग प्रथिनांच्या उपलब्धतेसोबतच घरगुती पद्धतीने मांस मिळवण्यासाठी केला जातो. या पद्धतीमुळे महायुद्धाच्या काळात अन्नधान्यांवर नियंत्रण (रेशनिंग) असण्याच्या किंवा प्रचंड मंदीच्या परिस्थितीतही अनेक कुटुंबांना तग धरणे शक्य झाले. उपासमार टळली होती. अलीकडे ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये परसबागेतील पोल्ट्रीला पुन्हा लोकप्रियता मिळू लागली आहे.

ग्रामीण भागामध्ये कोंबड्यांचे पालन ही मुक्त संचार पद्धतीने किंवा पिंजऱ्यामध्ये केले जाते. अनेक लोक व्यावसायिक उपयोगापेक्षाही स्वतःच्या कुटुंबाच्या आहारासाठी म्हणून त्यांचे पालन करतात. मात्र, कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी या प्रकारच्या कोंबडीपालनामध्ये आवश्यक तितकी आरोग्याची काळजी घेणे, लसीकरण याकडे लक्ष देण्यात येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. व्यावसायिक पोल्ट्रीसाठी अनेक नियम असले तरी परसबागेतील कोंबडीपालनासाठी कोणतेही नियम किंवा कायदे नाहीत. या क्षेत्रामध्ये सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. परसबागेतील कोंबडीपालनाकडे अन्न किंवा आहार या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता व्यक्त केली. हे संशोधन जर्नल ऑफ कम्युनिटी हेल्थ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले.

कॅलिफोर्निया विद्यापीठातील कृषी व पर्यावरणशास्त्र महाविद्यालयातील सहायक प्राध्यापिका कॅथरीन ब्रिंकले यांच्या केलेल्या अभ्यासामध्ये ही बाब प्रकर्षाने पुढे आली आहे. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले, की स्वतःचे अन्न स्वतः पिकवणे किंवा तयार करण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. मात्र, पक्ष्यांचे व माणसांचे मूलभूत आरोग्य यात पणाला लागता कामा नये. परसबागेमध्ये केल्या जाणाऱ्या कोंबडीपालनामध्ये लसीकरण, पक्ष्यांची विष्ठा आणि खत व्यवस्थापन, पक्ष्यांचे सामान्य आरोग्य याबाबत अधिक नियमावलींची गरज समोर आली आहे.
सध्या व्यावसायिक पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांचे पालन, आरोग्य आणि मांसासाठी कत्तल या संदर्भात अनेक नियम असले तरी घरगुती कोंबडीपालनाबाबत फारसे नियम नाहीत. पर्यायाने माणसांच्या आरोग्यासाठी धोका वाढू शकतो.

संशोधकांनी कोलोरॅडो येथील १०० नगरपालिकांमधील कोंबडीपालन, पक्ष्यांचे शेड आणि अन्य उपलब्ध सांख्यिकी माहितीचा उपयोग केला. त्यांनी अमेरिकेतील डेनव्हर, लॉस एंजेलिस, मियामा आणि न्यूयॉर्क अशा तीन शहरांशी त्याची तुलना केली. या चार शहरांतील सुमारे ४२ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले.
डेनव्हर येथे परसबागेतील पोल्ट्रीला प्रोत्साहन देण्याचे प्रमाण सर्वाधिक (६२.५ टक्के) असून, या विभागामध्ये परसबागेतील पोल्ट्रीपासून मानवी आरोग्याला धोका होऊ शकतो, असे म्हणणाऱ्याचे प्रमाण सर्वात कमी (७.४ टक्के) होते.

कोलोरॅडोमध्ये २००० मध्येच पोल्ट्रीविषयक अनेक कायदे मंजूर करण्यात आले होते. शंभर वर्षाच्या तुलनेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये कायद्यामध्ये काही बदल किंवा सुधारणा करण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण ब्रिंकले यांनी नोंदवले आहे. त्यात पोल्ट्रीविषयक सामान्य नियमावलीचा प्राधान्याने कोंबड्यांसाठी खुराड्याचे आरेखन, त्याची जागा आणि पक्ष्यांच्या लिंगाचे प्रमाण यांचा समावेश होता. काही नगरपालिकांमध्ये बारा पक्ष्यांसाठी एक रुस्टर असा नियम आहे. काही नगरपालिकांमध्ये असा नियमच नाही. मात्र स्वच्छता, खेळती हवा, अन्न आणि पाण्याची उपलब्धता याविषयीच्या नियमांमध्ये समानता आहे. परसबागेतील पक्ष्यांच्या कत्तलीसंदर्भात कोलोरॅडोतील केवळ अर्ध्या नगरपालिकांमध्ये नियम आहेत. त्यातील अनेक नियम हे अत्यंत मोघम स्वरूपात केल्याचे जाणवते.

थोडक्यात कोलोरॅडो येथील अभ्यासामध्ये कोंबड्यांचे आरोग्य आणि जपणुकीविषयी योग्य आणि स्पष्ट नियमावली उपलब्ध नाहीत. केवळ दोन टक्के नगरपालिकांमध्ये पोल्ट्री आणि प्राण्यांसंदर्भातील क्रूरतेविषयीचे नियम आहेत.
 

इतर ताज्या घडामोडी
सरपंच ग्रामसंसद महासंघाच्या...अकोला  ः शेगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्य...
सातारा जिल्ह्यातील चार साखर...सातारा  : गाळप हंगामातील ऊस उत्पादकांची...
‘आदिनाथ'च्या कामगारांचे पगारासाठी ‘...सोलापूर : आदिनाथ साखर कारखान्याकडून ४१ महिने...
उजनी कालवा फुटला, पिके उद्‌ध्वस्तमोहोळ, जि. सोलापूर : उजनी धरणाचा डावा कालवा मोहोळ...
आधुनिक तंत्रांचा वापर करून स्मार्ट शेती...अकोला : ऊतिसंवर्धित हळद रोपांची निर्मिती आणि...
सांगली जिल्ह्यात अजूनही ९१ टॅंकर सुरूचसांगली  ः जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासूनच...
सिंधुदुर्गातील वृद्ध दाम्पत्यावर...सिंधुदुर्ग  ः पाळीव कुत्र्याला वाचविण्यासाठी...
पुणे जिल्ह्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदानपुणे : ‘‘विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात शहरी...
अखेर बगाजी सागर ‘ओव्हर फ्लो’धामणगाव रेल्वे, जि. अमरावती  : अमरावती आणि...
'स्मार्ट' मुख्यालयाला मिळाली नवी जागापुणे :  राज्याच्या स्मार्ट प्रकल्पाच्या...
सोलापूर जिल्ह्यात मका लष्करी अळीने केला...सोलापूर ः दुष्काळातही जेमतेम पाण्यावर यंदा...
तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पुणे ः उत्तर, दक्षिण महाराष्ट्रात कमी दाबाचे...
अकोला जिल्ह्यात तीन तालुक्यांत अतिवृष्टीअकोला ः मागील २४ तासांत अकोला जिल्ह्यात दमदार...
डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार...पुणे ः डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम...
कर्जमाफी, ऊसबिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गारनवी दिल्ली : शेतकरी कर्जमाफी, थकीत ऊसबिल,...
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी...नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना...
औरंगाबादमध्ये कांदा १५०० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
मराठवाड्यातील ११ मंडळांत जोरदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी ३८४...
`प्रक्रिया उत्पादनांवरील १२ टक्के...रत्नागिरी : कोकणातील फळ उद्योगांसाठी...
सांगली जिल्हा बॅंकेच्या ऑनलाइन परिक्षा...सांगली : जिल्हा बॅंकेतील कनिष्ठ लिपिक पदाच्या...