agricultural stories in marathi, agro vision, Climate change-induced march of treelines halted by unsuitable soils | Agrowon

झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत अयोग्य मातीचाही अडथळा

वृत्तसेवा
मंगळवार, 17 जुलै 2018

तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे होणारी झाडांची वाटचाल अयोग्य जमिनीमुळे रोखली जाण्याची शक्यता गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांच्या प्रयोगातून पुढे आली आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे होणारी झाडांची वाटचाल अयोग्य जमिनीमुळे रोखली जाण्याची शक्यता गुयेल्फ विद्यापीठातील संशोधकांच्या प्रयोगातून पुढे आली आहे. हे संशोधन ‘ग्लोबल चेंज बायोलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

हवामानातील बदलामुळे अधिक उंचावरील आणि उत्तरेकडील प्रदेशामधील तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता संशोधकांकडून व्यक्त केली जाते. या ठिकाणी झाडांची वाढ शक्य होण्यासाठी योग्य ते गुणधर्म मातीत असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कॅनाडियन रॉकीज या पर्वतीय प्रदेशातील वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास गुयेल्फ विद्यापीठातील संशोधिका इम्मा डेव्हिस व प्रो. झीव्ह गेडॉल्फ करीत आहेत. त्यांनी विविध उंचीवर स्प्रुस आणि फर झाडांच्या रोपांची वाढ करून चाचण्या घेत आहेत. या ठिकाणचे मातीचे नमुने गोळा करून त्यात वाढ कक्षामध्ये स्प्रुस रोपांची वाढ केली जात आहे.

बदलत्या वातावरणामुळे अनेक प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे. सामान्यतः संवर्धक संशोधक एकेक प्रजातीचे जतन किंवा संपूर्ण पर्यावरण प्रणालीचे जतन, अशा दोन पर्यायांवर काम करतात. गुयेल्फ विद्यापीठातील संशोधिका इम्मा डेव्हिस यांनी प्रो. झीव्ह गेडॉल्फ यांच्यासह केलेल्या पहिल्या अभ्यासामध्ये नैऋत्य कॅनडातील मातीच्या गुणधर्माचे झाडांच्या वाढीवर होणारे परीणाम तपासले. झाडांच्या ओळी अधिक उंचीकडे सरकत असल्याचा अंदाज व्यक्त केला. दर १३० किमी अंतर उत्तरेकडे सरकत गेल्यास तापमानामध्ये एक अंश सेल्सिअसने घट होते. हे प्रमाण पर्वतावर ६५ ते १०० मीटर उंचीकडे सरकरण्याएवढे आहे. भविष्यामध्ये वाढणाऱ्या तापमानामध्ये अल्पीन झाडे अधिक उंचीकडे सरकण्याचा अंदाज यातून काढता येतो.

त्याविषयी माहिती देताना इम्मा डेव्हिस यांनी सांगितले, की सामान्यतः हवामानातील बदलाकडे पाहण्याचा एक औपचारिक दृष्टीकोन असतो. मात्र, यात माणसांच्या समजापलीकडेही अनेक बाबी अत्यंत गुंतागुंतीच्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...