agricultural stories in marathi, agro vision, cost of fertiliser is major issue | Agrowon

नफ्यातील वाढीसाठी खतावरील खर्चात बचत हवी

वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून, खतांचा कार्यक्षम वापर करण्याची आवश्यकता वाढत आहे. खतांच्या कार्यक्षम वापरातून होणारी बचत ही सरळ एकूण नफा तोट्यातील फरकांशी जोडली जात असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. जमिनीवरील दूरगामी परिणाम आणि उत्पादकतेला कोणतीही बाधा न पोचवता खतांवरील खर्चामध्ये एकरी २० ते ५० डॉलरपर्यंत बचत शक्य असल्याचे त्यांचे मत आहे.

रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत असून, खतांचा कार्यक्षम वापर करण्याची आवश्यकता वाढत आहे. खतांच्या कार्यक्षम वापरातून होणारी बचत ही सरळ एकूण नफा तोट्यातील फरकांशी जोडली जात असल्याचे कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. जमिनीवरील दूरगामी परिणाम आणि उत्पादकतेला कोणतीही बाधा न पोचवता खतांवरील खर्चामध्ये एकरी २० ते ५० डॉलरपर्यंत बचत शक्य असल्याचे त्यांचे मत आहे.

मातीची तपासणी केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या खतांमध्ये बचत शक्य आहे. मात्र, सातत्याने खतांच्या खर्चामध्ये बचत केल्यास कितपत फायदा होईल, याविषयी अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असते. यातून कॅश फ्लो आणि उत्पन्नाचा ताळेबंद तातडीने सुधारत असले पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नुकत्याच झालेल्या एका वेबिनिअरमध्ये १३०० शेतकऱ्यांशी बोलताना याविषयातील तज्ज्ञ डेव्हिड कोहल यांनी शेतकऱ्यांच्या शंकाचे समाधान केले.

  • नफ्याचे अधिक प्रमाण असलेल्या शेतकऱ्यांपैकी अनेकांकडे बहुविध शेतीपद्धती आणि जनावरांचे अधिक प्रमाण असल्याचे आढळते. सेंद्रिय खतांचे अधिक प्रमाण असल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होते.
  • काही शेतकरी खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी नियोजनपूर्वक पीक बदल आणि शून्य मशागत तंत्रांचा वापर करतात. हे प्रमाण प्रदेशानुसार बदलत असून, योग्य व्यवस्थापन व दीर्घकाळ सातत्यानंतरच त्यातून नफा वाढल्याचे दिसून येते.
  • खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी रोखीने खरेदी करून सवलत मिळवण्याचा काही शेतकरी प्रयत्न करतात, तर काही शेतकरी गटाने खत खरेदी करून अधिक बचत करू पाहतात. त्याच प्रमाणे आगावू मागणी नोंदवून हंगामातील दरांमध्ये होणारी वाढीचा परिणाम रोखण्याचा प्रयत्न केला जातो. या साऱ्या प्रक्रियेतून खतावरील खर्चात २ ते ५ टक्क्यांपर्यंत बचत होते.
  • टेक्सास ए अॅण्ड एम युनिव्हर्सिटी येथील डॉ. डॅनी क्लिनेफेल्टर यांनी तयार केलेला ‘पाच टक्क्याचा नियम’ शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो. या नियमानुसार छोट्या छोट्या बदलाद्वारे कोणत्याही व्यवसायामध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. एकाच घटकांमध्ये मोठी घट करण्यापेक्षा शेतीमध्येही हे तंत्र अधिक फायदेशीर ठरू शकते.

फोटो गॅलरी

इतर अॅग्रोमनी
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
खरिपाचा पेरा सरासरी क्षेत्राच्याही पुढेनवी दिल्लीः कोरना देशात यंदा पाऊसमान चांगले...
फुलशेतीला सजावट व्यवसायाची साथकवठेपिरान (जि. सांगली) येथील अत्यल्पभूधारक अकबर...
हापूस आंब्यासाठी नव्या बाजारपेठांची गरजपोर्तुगिजांच्या काळात मुंबईच्या बाजारपेठेत हापूस...
ब्राझीलचे साखर उत्पादन वाढण्याचा अंदाजकोल्हापूर: गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनाकडे...
प्रक्रिया, सामूहिक विपणन, थेट...नाशिक: ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू...
खाद्यतेल आयातीवर निर्बंध आणा: सोपा नागपूर : देशातील नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता...
मत्स्यपालनाच्या शाश्वततेसाठी योग्य धोरण...जागतिक पातळीवर लोकसंख्या वेगाने वाढत असून,...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
देशभरात ‘नाफेड’कडून ८६ हजार टन कांदा...नाशिक: केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण निधी...
कृषी सुधारणांचा वेळोवेळी आढावा घ्याः ‘...नवी दिल्लीः केंद्र सरकार ‘पीएम-किसान’...
काश्‍मिरी केशरला भौगोलिक मानांकनजम्मू: काश्‍मिरमध्ये उत्पादीत होणाऱ्या केशरला...
देशात खरिपाचा ६५ टक्के पेरा आटोपलानवी दिल्लीः देशात खरिपाखालील सरासरी क्षेत्र १...
‘स्ट्रॉबेरी‘ला बाजारपेठ विस्ताराची गरजस्ट्रॉबेरी उत्पादक पट्यात पॅकहाउस आणि शीतकरण...
भारतातून यंदा दशकातील विक्रमी साखर...कोल्हापूर: लॉकडाउनच्या संकटानंतरही साखर...
सांगली बाजारसमितीत हळद विक्रीत पाच लाख...सांगली ः सांगली बाजार समिती हळदीच्या...
शेतीमाल निर्यातीला चीन वादाचा फटका नाहीपुणे : महाराष्ट्रातून चीनला होणारी शेतीमालाची...
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...