सेंद्रिय उत्पादनासाठी ५० लिटरच्या कुंड्यांची निवड

सेंद्रिय उत्पादनासाठी ५० लिटरच्या कुंड्यांची निवड
सेंद्रिय उत्पादनासाठी ५० लिटरच्या कुंड्यांची निवड

नेदरलॅंडसह जगभरामध्ये हरितगृहात कुंड्यांतील लागवड वाढत आहे. २०१७ पासून त्यात गटर सिस्टिम आणि उत्पादकांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्यांचा वापर वाढू लागला आहे. पूर्वी या कुंड्यांचा आकार लहान असे. मात्र अलीकडे सेंद्रिय उत्पादनासाठी मोठ्या आकाराच्या कुंड्यांची (५० लिटर क्षमतेच्या) मागणी वाढत असल्याचे नेदरलॅंड येथील प्रमुख प्लॅस्टिक कुंड्या उत्पादक जेबी हायड्रोपोनिक्सच्या प्रतिनिधीने सांगितले. नेदरलॅंडमध्ये साधारणपणे मातीमध्ये सेंद्रिय उत्पादन घेतले जाते. साध्या रोपांच्या लागवडीसाठी या कुंड्यांचा आकार फार मोठा ठरतो. मात्र कॅनडा येथील नियमांनुसार सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनांसाठी प्रति वर्गमीटरसाठी ६० लिटर क्षमतेची आवश्यकता होती. त्यानुसार कॅनडा येथील सेंद्रिय टोमॅटो उत्पादकांच्या मागणीवरून खास कुंड्यांची निर्मिती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पाण्याच्या पुनर्वापरासाठी ः स्टिल गटर प्रणालीचा गुलाब लागवडीमध्ये वापर केला जातो. अलीकडे ही पद्धत अन्य पिकांसाठी वापरण्यास सुरवात झाली आहे. त्यातून पाण्याच्या निचरा आणि पुनर्वापर चांगल्या प्रकारे होऊ शकते. कॅनडा येथील काकडी उत्पादकासाठी अशीच प्रणाली तयार केली असून, फ्रान्समधून या विषयी उत्सुकता दर्शवली आहे. प्रत्येक हरितगृहानुसार यांची लांबी व पिकानुसार रुंदी ठरवली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com