agricultural stories in marathi, agro vision, Headers may cause balance issues | Agrowon

सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी हानीकारक

वृत्तसेवा
रविवार, 15 जुलै 2018

सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला आहे. पदलालित्याबरोबरच हेडरद्वारे केलेला गोल हाही आकर्षणाचा विषय असतो. मात्र, हेडरद्वारे फटका मारणे, हे मेंदूच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकत असल्याचा इशारा डेलावरे विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे. सातत्याने डोक्यावर होणाऱ्या या आघातामुळे शरीराच्या अल्पकालीन संतुलनाची समस्या उद्भवू शकते. हे प्राथमिक निष्कर्ष असून, दीर्घकालीन परिणामाविषयी जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला आहे. पदलालित्याबरोबरच हेडरद्वारे केलेला गोल हाही आकर्षणाचा विषय असतो. मात्र, हेडरद्वारे फटका मारणे, हे मेंदूच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकत असल्याचा इशारा डेलावरे विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे. सातत्याने डोक्यावर होणाऱ्या या आघातामुळे शरीराच्या अल्पकालीन संतुलनाची समस्या उद्भवू शकते. हे प्राथमिक निष्कर्ष असून, दीर्घकालीन परिणामाविषयी जाणून घेण्यासाठी अधिक संशोधनाची गरज आहे.

प्रो. जॉन जेका यांच्या गटाने क्लब येथील फुटबॉलपटूंकडून प्रश्नावली भरून घेऊन सर्वेक्षण केले. सराव आणि प्रत्यक्ष मॅचदरम्यान कितीवेळा हेडर मारला जातो, याचा अंदाज घेतला. सरासरी २२ वयाच्या खेळाडूकडून गेल्या वर्षभरामध्ये ४५१ वेळा बॉल हेडिंग केल्याचे लक्षात आले. अशा खेळाडूंना डोळे बंद करून फोम पॅडवरून चालायला लावले. या वेळी त्यांच्या कानामागे इलेक्ट्रोड लावून व न लावता चाचण्या घेण्यात आल्या. या इलेक्ट्रोडद्वारे आंतरकर्ण आणि मेंदू यांतील चेतापेशीवरील परिणाम मोजता आला. हा भाग संतुलनासाठी काम करतो. त्यानंतर ज्या खेळाडूंनी हेडरचा अधिक वापर केला त्यांच्या चालण्यामध्ये संतुलनाची समस्या येत असल्याचे लक्षात आले. निष्कर्षाविषयी माहिती देताना प्रो. जॉन जेका यांनी सांगितले, की डोक्यावर सातत्याने होत असलेल्या आघातामुळे मेंदूतील विचार करण्याची प्रक्रिया, स्मृतीविषयक समस्या उद्भवू शकतात. संरचनात्मक पातळीवर मेंदूतील पांढऱ्या घटकांवरही परिणाम होऊ शकतो. संतुलनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी अधिक अभ्यासाची आवश्यकता आहे.


इतर ताज्या घडामोडी
कंटेनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाउन...नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक साथीमुळे २५...
राज्यातील लॉकडाउनबाबत उद्या बैठकमुंबई : केंद्र सरकारने पाचव्या लॉकडाउनचे...
नायगावात कोट्यवधीचा कापूस आगीमुळे खाक नांदेड : जिल्ह्यातील नायगाव येथील भारतीय कापूस...
शेतकऱ्यांनी न खचता सज्ज राहावे ः...परभणी : ‘‘मराठवाड्यातील शेती पुढे अनेक समस्‍या...
बीड विभागात कापसाची १६ लाख ११ हजार...बीड : कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची साथ...
जळगावात पीक कर्जवाटपाबाबत नुसत्याच...जळगाव : केंद्र व राज्य सरकार, प्रशासनातील वरिष्ठ...
मराठवाड्यात ३२४ टँकरद्वारे पाणीपुरवठा...औरंगाबाद : मराठवाड्यातील २५१ गाव व ९८ वाड्यांतील...
आधुनिक लागवड तंत्रज्ञान स्विकारा ः डॉ....अर्धापूर, जि.नांदेड : ‘‘सोयाबीन हे एक महत्त्वाचे...
खानदेशात धान्य लिलाव बंदच जळगाव : खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये धान्य...
सोलापूर जिल्हा परिषदेच्या चार...सोलापूर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा...
सोलापुरात बाहेरुन येणाऱ्या लोकांवर लक्ष...सोलापूर ः जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्या लोकांची माहिती...
‘ॲग्रो ॲम्ब्युलन्स’द्वारे पिकांवरील...नाशिक : मुक्त विद्यापीठातील कृषि विज्ञान...
सांगलीत शेतकरी अपघात विम्याचे २७३...सांगली ः शेतकऱ्यांचा अपघातात मृत्यू, अवयव निकामी...
नाशिक जिल्ह्यात पूर्वहंगामी टोमॅटो...नाशिक  : मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीत...
सोलापुरात पीककर्जाबाबत बँकांचे धिम्या...सोलापूर ः खते-बियाणे पुरेशाप्रमाणात उपलब्ध करुन...
नगरला सायंकाळीही भाजीपाला, फळांचे लिलावनगर : मुंबई, पुण्यातील बाजारात भाजीपाला, फळांची...
अकोला जिल्ह्यात पूर्वमोसमी कपाशी लागवड...अकोला ः जिल्ह्यात दरवर्षी होणारी पूर्वमोसमी...
अकोल्यात ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणी...अकोला ः भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत ज्वारी,...
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाईत वाढसातारा ः जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त तालुक्यांसह इतर...
वीज ग्राहकांचे प्रश्‍न प्राधान्याने...कोल्हापूर : सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांच्या...