सर्वाधिक लांब कृमीपासून मिळू शकेल कीटकनाशक

सर्वाधिक लांब कृमीपासून मिळू शकेल कीटकनाशक
सर्वाधिक लांब कृमीपासून मिळू शकेल कीटकनाशक

जगातील सर्वांत लांब सजीव मानल्या जाणाऱ्या बुटलेस वर्म या कृमीमध्ये विषारी घटक निर्मितीची क्षमता असल्याचे पुढे आले आहे. हे विष मेंदूच्या चलनवलनावर परिणाम करत असून, त्यात झुरळ आणि खेकडा यांना मारण्याची क्षमता असते. या विषाचा उपयोग कृषी रसायनांमध्ये प्रामुख्याने कीटकनाशक म्हणून होऊ शकतो. ग्रेट ब्रिटन, नॉर्वे आणि स्वीडनचा पश्चिम किनारा येथील थंड पाण्यामध्ये बुटलेस वर्म (शा. नाव ः Lineus Longissimus) हे कृमी आढळतात. ज्या वेळी या कृमीवर ताण निर्माण होतो, त्या वेळी म्युकससारखी घट्ट अशी द्रव्ये तो सोडतो. त्यातून पेपटाईड हे विषारी घटक वेगळे करण्यात आले असून, त्याचा वापर खेकडे, झुरळे आणि फळमाशी आणि व्हॅरोवा कोळ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी होऊ शकतो. या विषामुळे मेंदूतून स्नायूंपर्यंत पोचणाऱ्या संदेशामध्ये बाधा येते. अर्धांगवायूसारखी स्थिती तयार होते. सस्तन प्राण्यांच्या सोडीयन वहनावर विषाचा परिणाम होत असला तरी त्याची तीव्रता फार नसते. म्हणजेच ते माणसांसह अन्य सस्तन प्राण्यांसाठी धोकादायक नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com