agricultural stories in marathi, agro vision, insectious protin food for future | Agrowon

खाद्ययोग्य कीटकांवर अधिक संशोधनाची आवश्यकता

वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

कीटक हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, त्यांचा मानवी आणि पशु आहारामध्ये गेल्या अनेक शतकांपासून वापर होत आला आहे; मात्र जागतिक पातळीवरील काही देशांमध्ये हा आहार आवडीने घेतला जात असला, तरी अनेक देशांमध्ये त्याला आहार मानले जात नाही. भविष्यामध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कीटकयुक्त आहारावर अधिक प्रमाणात संशोधनाची आवश्यकता आहे.

कीटक हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, त्यांचा मानवी आणि पशु आहारामध्ये गेल्या अनेक शतकांपासून वापर होत आला आहे; मात्र जागतिक पातळीवरील काही देशांमध्ये हा आहार आवडीने घेतला जात असला, तरी अनेक देशांमध्ये त्याला आहार मानले जात नाही. भविष्यामध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने कीटकयुक्त आहारावर अधिक प्रमाणात संशोधनाची आवश्यकता आहे.

आहारामध्ये कीटक ही संकल्पनाच अनेक देशांमध्ये शिसारी आणणारी मानली जाते; मात्र कीटकांच्या शरीरामध्ये असलेल्या उच्च दर्जाच्या प्राणीज प्रथिनांमुळे जागतिक पातळीवर वाढणाऱ्या लोकसंख्येच्या पोषणासाठी आहारामध्ये कीटकांचे स्थान मोलाचे असणार आहे. अन्य पशुपालनाच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी कार्बन फूटप्रिंट असल्याने त्यांच्या वाढीचे पर्यावरणावरील परिणामही अल्प असतील; मात्र सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक अडथळ्यांचा विचार होण्याची गरज असल्याचे मत न्युट्रिशन बुलेटीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात मांडण्यात आले आहे.

नॉटिंगहॅम विद्यापीठ आणि रोथामस्टेड संशोधन संस्थेतील संशोधक दार्जा डॉबरमॅन यांनी सांगितले, की पोषकतेच्या दृष्टीने अत्यंत मोलाची असलेल्या कीटकांविषयी अधिक अभ्यास होण्याची गरज आहे. त्यातून उपलब्ध होणारी नेमकी प्रथिने आणि कार्बन फूटप्रिंट यांची विचार होण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे कीटकांचे उत्पादन वाढण्यासंदर्भात फारसा विचार कोणी केलेला नाही. त्यासंबंधीही फारशी माहिती उपलब्ध नाही. या साऱ्या घटकांचा साकल्याने विचार होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ती पोल्ट्री किंवा सोयाबीन पदार्थांची महागडी आवृत्ती ठरण्याचाही धोका आहे.

कीटकयुक्त आहाराची सद्यःस्थिती ः

  • जगभरातील शंभरपेक्षा अधिक देशांमध्ये खाण्यायोग्य कीटक प्रजातींची संख्या दोन हजारांपेक्षा अधिक होईल. मध्य आफ्रिकेतील ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहार प्रथिने ही कीटकांच्या स्वरूपात येतात. काही वेळा त्यांना अन्य प्राणीज प्रथिनांपेक्षाही अधिक किंमत मिळते.
  • या पद्धतीसाठी अनेक देशांमध्ये कोणतेही नियम ठरलेले नाहीत. त्यामुळे धोरणांची आवश्यकता आहे.
  • कीटकांचे संवर्धन करून, त्यांना योग्य प्रकारे पकडण्यासाठी अवजारे, पद्धती विकसित झालेल्या नाहीत.
  • कीटकांच्या वाढीच्या नेमक्या कोणत्या अवस्थेमध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक असते, हे माहीत नाही. त्याच प्रमाणे खाण्याच्या पद्धतीही अद्याप प्राथमिक अवस्थेत आहेत. कीटकानुसार कच्चे, तळलेले, शिजवलेले किंवा त्यांचे पीठ करून त्याचा वापर करता येऊ शकतो.

खाद्ययोग्य कीटक ः
खाद्ययोग्य कीटकांमध्ये भुंगेरे (Coleoptera, ३१%), फुलपाखरे (Lepidoptera, १८%), मधमाश्या, वास्प आणि मुंग्या (Hymenoptera, १४%), तुडतुडे, टोळ किंवा क्रिकेट (Orthoptera, १३%), किकाडा, खवले कीटक (Hemiptera, १०%), वाळवी (Isoptera, ३%), ड्रॅगनफ्लाय (Odonata, ३%), आणि विविध माश्या (Diptera, २%) यांचा समावेश होतो.
 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...